जाणून घ्या फाटक्या नोटा बँकेतून बदलून घेण्याचे नियम 

फाटक्या नोटा बँकेतून बदलून घेण्याचे नियम 

आपल्या जवळची एखादी नोट फाटली किंवा आपल्याला एखादी चिकटवलेली किंवा फाटलेली नोट मिळाली की आपल्याला आपले पैसे बुडाले असे वाटून अगदी हळहळ वाटते. कारण अशा फाटलेल्या किंवा चिकटवलेल्या नोटा बँकेतून कशा प्रकारे बदलून मिळतात याची आपल्याला पुरेशी माहिती नसते.

फाटक्या नोटा बँकांमधून बदलून मिळण्याचे काही नियम आहेत. परंतु या नियमांबद्दल अनभिज्ञ असल्यामुळे आपण सर्वसामान्य नागरिक फाटकी नोट मिळाली की हळहळतो, ती कोणाला तरी देऊन टाकण्याचा प्रयत्न करतो किंवा तशीच ठेवून देतो. परंतु आज आम्ही तुम्हाला या बाबतचे बँकांचे सर्व नियम सांगणार आहे. त्यामुळे यापुढे जर एखादी फाटकी अथवा चिकटवलेली नोट मिळाली तर ती तुम्ही बँकेतून बदलून घेऊ शकाल.

अशा फाटलेल्या किंवा चिकटवलेल्या नोटा बँकेतून बदलून मिळण्याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक नियमावली जाहीर केलेली आहे. ही नियमावली माहीत असणे सर्व नागरिकांच्या हिताचे आहे.

आपण सर्वप्रथम हे जाणून घेतले पाहिजे की फाटलेली नोट देशभरातील कुठल्याही बँकेच्या कुठल्याही ब्रांच मध्ये बदलून मिळू शकते. त्यासाठी आपल्या होम ब्रांच मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. जर बँकेने नोट बदलून देण्यास असमर्थता दर्शवली अथवा नकार दिला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते.

परंतु आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की फाटलेल्या नोटांची अवस्था जितकी अधिक वाईट तितकी तिची किंमत कमी होत जाते. त्यासाठी देखील आरबीआयने काही नियम सांगितले आहेत.

नक्की काय आहेत नोटा बदलून घेण्याचे नियम ?

१. जर तुमच्याकडे कमी किमतीच्या म्हणजे रु. ५, १०, २०, ५० अशा नोटा असतील आणि त्या फाटल्या असतील तर त्या नोटांचा कमीत कमी अर्धा भाग तरी चांगला असला पाहिजे. तरच अशी नोट बँकेतून बदलून मिळू शकेल. त्या नोटेची संपूर्ण रक्कम तुम्हाला मिळेल. परंतु अर्ध्यापेक्षाही जास्त फाटलेली नोट असेल तर अशी नोट बदलून मिळू शकत नाही.

उदाहरणार्थ जर तुमच्याकडे दहा रुपयाची फाटलेली नोट असेल तर जर ती अर्ध्यापेक्षा कमी फाटली असेल, त्यावरील नंबर , गव्हर्नरची सही, गांधीजींच्या चित्राचा लोगो जर नीट दिसत असेल तर त्या नोटेच्या बदल्यात दुसरी दहा रुपयाची नोट मिळू शकेल. परंतु ही चिन्हे दिसत नसतील आणि नोट जास्त फाटलेली असेल तर ती बदलून मिळणार नाही.

२. जर तुमच्याकडील फाटलेल्या नोटांची संख्या २० पेक्षा अधिक असेल आणि त्यांची एकूण किंमत रु. ५०००/- पेक्षा अधिक असेल तर अशा जास्त प्रमाणात नोटा बदलून घेण्यासाठी बँकेला काही फी द्यावी लागते.

मात्र जरी नोट फाटलेली असेल तरी जर त्या वरील वॉटर मार्क, नंबर आणि गव्हर्नरची सही नीट दिसत असेल तर अशी नोट बदलून देणे बँकेला बंधनकारक आहे.

३. जरी एखाद्या नोटेचे फाटून खूप जास्त तुकडे झाले असतील तरीही अशी नोट बदलून देणे बँकेवर बंधनकारक आहे. परंतु ही जास्त वेळ खाऊ प्रोसेस आहे. अशी नोट बदलून घेण्यासाठी तुम्हाला

ती आरबीआयच्या ब्रांच मध्ये पोस्टाने पाठवावी लागते. त्या नोटेबरोबरच तुमचा बँक अकाउंट नंबर, ब्रांचचे नाव, आयएफएससी कोड आणि नोटेचे डिस्क्रिप्शन अशी माहिती पाठवावी लागते. त्या नोटेची नीट छाननी करून मग त्या नोटेबद्दल पैसे दिले जातात.

अशा फाटलेल्या नोटांचे पुढे काय होते?

बँकेकडे जमा झालेल्या अशा फाटलेल्या नोटा आरबीआय चलनातून बाद करते. ह्या नोटांच्या जागी नव्या नोटा छापून त्या चलनात आणण्याची जबाबदारी देखील आरबीआयची असते. पूर्वी अशा नोटा जाळून टाकल्या जात असत परंतु आता मात्र त्याचे बारीक तुकडे करणारे, रिसायकल करणारे मशीन आले आहे त्याचा वापर केला जातो.

तर अशा पद्धतीने आपल्याजवळ जर फाटलेल्या किंवा चिकटवलेल्या नोटा चुकून आल्या असतील तर त्या बँकेतून नक्की बदलून मिळू शकतात. आपले कोणतेही आर्थिक नुकसान होत नाही.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख जरुर शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!