आज २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिवस. त्या निमित्ताने बालकविता – पुस्तके

आज -२३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिवस.
त्यानिमित्ताने बालकविता
पुस्तके
छान गोष्टी – छान चित्र
पुस्तके असती मित्र ||
खूप सारे ज्ञान देती
ग्रंथ गुरुजन असती
अक्षर ओळख होते
हा जग ओळखू येते ||
वाचनाची लागो गोडी
खूप असो वा थोडी
वाचन सुरु केले की
थांबत नाही गाडी ||
अभ्यासाचा कंटाळा
अशावेळी एक करावे
खूप खूप वाचावे
छान असे विरंगुळा ||
पुस्तकांच्या संगतीत
ज्ञानवंत व्हावे ||
(मस्त फिरू रे मस्त फिरू- कविता संग्रहातून)

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा