नोकरीचं जोखड मानेवर ठेवून तुम्ही कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी

नवीन व्यवसाय काय करावा

नोकरीचा कंटाळा आला असेल तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा. वार्षिक उत्पन्न 15 लाखांपेक्षा जास्त मिळेल.

नोकरीचं जोखड मानेवर ठेवून तुम्ही कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे….

9 ते 6 या वेळेच्या परीघात फिरुन वैताग आला असेल तर आता मुक्त व्हा, नव्या क्षेत्रात स्वातंत्र्य अनुभवा त्याचबरोबर करा लाखोंची कमाई.

नोकरी म्हणजे दुसऱ्यांची गुलामगिरी, तर व्यवसाय म्हणजे स्वतः मालक बनणे.

इतकंच नाही तर एखाद्या व्यवसायामुळे ब-याच जणांना रोजगार देता येऊ शकतो.

आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची जबरदस्त इच्छा मात्र तुमच्याकडे असली पाहिजे.

आज आपल्या आजूबाजूला आपण अशी अनेक उदाहरणं पाहतो की अनेक उच्च शिक्षीत, चांगल्या कंपनीत नोकरी करणारे तरुण व्यावसायिक संधी ओळखून शेतीकडे वळलेले आहेत.

कष्ट करण्याची तयारी असेल तर बरेच आधुनिक पर्याय आज सहज उपलब्ध आहेत.

आज आपण असाच एक फायदेशीर पर्याय जाणून घेणार आहोत.

वर्षाला लाखोंचं उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही आल्याची शेती करू शकता.

गरमागरम चहाचा स्वाद वाढवणारं आलं भाज्यांचा आणि लोणच्यांचा स्वाद वाढविण्यासाठी आवर्जुन मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.

हिवाळ्याच्या दिवसात जास्त मागणी असली तरी आल्याला वर्षभर चांगली किंमत मिळते.

म्हणूनच नोकरीपेक्षा जास्त कमावण्याची संधी देणारी आल्याची शेती करुन तुम्ही चांगली कमाई करू शकता.

शिवाय सरकारकडून शेतीला प्रोत्साहन आणि मदत ही मिळते.

नेमकी कशी करायची आल्याची शेती ?

आल्याची शेती पावसावर अवलंबून असते.
पपई किंवा दुसऱ्या उंच असणाऱ्या पिकाबरोबर आंतरपीक म्हणून आल्याची लागवड करतात.

आल्याचं पीक घेण्यासाठी एक हेक्टरला साधारण 2 ते 3 टन बियाणं लागेल.

आल्याची लागवड करण्यासाठी बेड पद्धतीचा वापर केला जातो.

आल्याच्या पीकातून पाणी व्यवस्थित निघून जाईल अशी व्यवस्था करणं फार महत्वाचं असतं.

कारण जिथं पाणी थांबून राहतं तिथं आल्याचं नुकसान होतं.

आल्याच्या शेतीसाठी जमीनाचा पी एच 6/7 असणारी जमीन निवडावी.

आल्याचं बियाणं म्हणजे आल्याच्या मोठ्या मोठ्या कंदाना तुकड्यात तोडून ते छोटे तुकडे पेरणीसाठी वापरतात.

आल्याची पेरणी

आल्याची पेरणी करताना दोन ओळीतलं अंतर 30 ते 40 सेंटीमीटर आणि रोपातलं अंतर 25 सेंटीमीटर राखलं पाहिजे.

आल्याचं बी चार पाच सेंटीमीटर खोल खड्डयात रोवल्यानंतर शेणखतानं खड्डा बुजवून घ्यावा.

अशा पद्धतीने आल्याची व्यवस्थित पेरणी करावी.

खर्चाचं गणित

आल्याची पेरणी झाल्यानंतर पीक तयार व्हायला 8 ते 9 महिने लागतात.

हेक्टरला साधारण 150 ते 200 क्विंटल आल्याचं उत्पन्न मिळू शकतं.

तर आल्याची शेती करण्यासाठी हेक्टरी 7 ते 8 लाख इतका खर्च अपेक्षित असतो.

उत्पन्न

इतके कष्ट आणि गुंतवणूक केल्यानंतर आल्याच्या उत्पन्नाचा विचार केला तर हेक्टरी 150-200 क्विंटल आल्याचं उत्पादन मिळतं हे तर आपण पाहीलं.

बाजारात आलं साधारण 80 रूपये किलोनं विकलं जातं.

60 रूपये किलोचा भाव जरी मिळाला तरी हेक्टरी 25 लाखांची कमाई होऊ शकते.

एकूण खर्च वजा करता 15 लाखापर्यंतचा फायदा आरामात हाती लागतो.

तर आयुष्यात समाधान आणि उत्पन्न देणारा व्यवसाय करायचा असेल आल्याची शेती करून तुम्ही लाखांची कमाई करू शकता.

केळी वेफर्सची निर्मिती, सोपा आणि मोठा नफा मिळवून देणारा व्यवसाय

१५०/- रूपये पगार ते १००० कोटींचा व्यवसाय असा वेगळा आलेख मांडणारा अवलिया

म्हातारपणातही उत्साहाने छंदाचं रूपांतर व्यवसायात करणाऱ्या ‘फुलों की रानी’

स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करू पाहणाऱ्यांसाठी ६ टिप्स

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!