कित्येक अपयशं पचवून शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचलेला इलॉन मस्क!!

हातात घेतलेल्या कामात एकदा अपयश आले तर हात पाय गाळून बसता का तुम्ही? याचं उत्तर जर हो असेल, तर एलोन मस्क च्या जगण्याचा रोलर कोस्टर कसा होता ते तुम्ही ऐकलेच पाहिजे…

कुठल्याही अडथळ्याला न जुमानता दूरदृष्टी ठेऊन भविष्याचा विचार करणारे ‘बिजनेस मॅग्नेट’ हा इलॉन चा थोडक्यात परिचय म्हणता येईल.

लहानपणीच म्हणजे १० वर्षांपर्यंतच्या वयात इलॉन ने एवढी पुस्तकं वाचली होती, जेवढी एका साधारण ग्रॅज्युएट ने सुद्धा क्वचितच वाचली असतील.

१२ वर्षांचा असतानाच इलॉनने एक कम्प्युटर गेम बनवला आणि एका ऑनलाईन कम्पनीला तो गेम ५०० डॉलर मध्ये विकला.

आज आपण बोलूया या शतकातल्या एका क्रांतिकारी व्यक्तिमत्व इलॉन मस्क यांच्या विषयी. तर Elon Musk आहे कोण?

मोटिव्हेशन बद्दल काही बोलले जात असेल तेव्हा बरेचदा आपण हे नाव ऐकले असेल. सध्या एलोन मस्क यांनी जर कोणाबद्दल ट्विट केले किंवा एखाद्याचे ट्विट रिट्विट केले तर ती व्यक्ती सुद्धा खास प्रकाशझोतात येते.

कुठल्याही अडथळ्याला न जुमानता दूरदृष्टी ठेऊन भविष्याचा विचार करणारे ‘बिजनेस मॅग्नेट’ हा इलॉन चा थोडक्यात परिचय म्हणता येईल.

इलॉन सारखे विलक्षण लोक शतकात दोन तीनच जन्माला येतात. हे लोक भविष्याचा वेध घेऊन अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यासाठी आपली सगळी शक्ती पणाला लावतात.

लहानपणीच म्हणजे १० वर्षांपर्यंतच्या वयात इलॉन ने एवढी पुस्तकं वाचली होती जेवढी एका साधारण ग्रॅज्युएट ने सुद्धा क्वचितच वाचली असतील.

१२ वर्षांचा असतानाच इलॉनने एक कम्प्युटर गेम बनवला आणि एका ऑनलाईन कम्पनीला तो गेम ५०० डॉलर मध्ये विकला. १२ व्या वर्षीच हा भविष्यातील बिजनेसमन आपली चुणूक दाखवू लागला.

लहानपणापासूनच पुस्तकं वाचून सोल्युशन शोधणं हे इलॉनला चांगलंच जमू लागलं होतं. प्रत्येक प्राब्लेमला सोल्युशन हे असतंच फक्त ते शोधणं तुम्हाला जमलं पाहिजे हेच इलॉनला माहित होतं.

इलॉनने अक्षय ऊर्जेवर चालणारी ‘सोलर सिटी’ बनवली, प्राकृतिक अक्षय ऊर्जा घेऊन चालणारी टेस्ला मोटार बनवली आणि पेट्रोल, डिझेलचा पर्याय शोधला.

इलेक्ट्रॉनिक, ड्रायव्हर शिवाय चालणारी कार बनवण्याचा विक्रम सुद्धा इलॉन च्या नावे नोंदला गेला. उच्च दर्जाचे प्रॉडक्ट बनवणे यावरच इलॉन चा नेहमी भर राहिला.

तो प्रोग्रॅमर होता… रॉकेट साइन्टिस्ट होता… रॉकेट सायन्सचं त्याने रीतसर शिक्षण नाही घेतलं फक्त पुस्तकं वाचून वाचून त्याने रॉकेट सायन्स आत्मसात केलं.

इलॉनने लहान असताना १०-१२ तास घरात बसून पुस्तकं वाचून स्वशिक्षण घेतलं… ज्याला आपण पुस्तकी कीडा म्हणतो तसा हा इलॉन आपल्या कम्पनीत टीमच्या सिलेक्शन पासून काम पूर्णत्वास नेई पर्यंत अविरत मेहनत करत राही.

स्वतःकडून अशक्यप्राय अपेक्षा ठेऊन इलॉन सारी कामे (प्रोजेक्ट) पूर्ण करत राहिला. तो म्हणायचा ‘मला ते नाही करायचं जे शक्य आहे… मला ते करायचं जे करण्याची खरी गरज आहे.’

इलॉनच्या अखत्यारीतल्या काही महत्वाच्या कम्पन्या

इलॉन तब्बल नऊ वर्ल्ड क्लास कम्पन्यांचा मालक होता. यातल्या Tesla , Solar City, Hyper Loop या कम्पन्यांची चर्चा जगभर झाली.

मंगळावर माणसाने पाऊल ठेवावे यासाठी इलॉन नेहमीच प्रयत्नात राहिला. नुसतेच प्रयत्न नाही पुढे लवकरच त्याने ते सत्यात पण आणलं.

१९९५ मध्ये आपला भाऊ किम्बल बरोबर त्याने ‘झिप-२’ या कम्पनीची सुरुवात केली. लवकरच त्याने यात गुंतवणूक घ्यायला सुरुवात केली. आणि त्याची विलक्षण योजना पाहून त्याला गुंतवणूकदार मिळतही गेले.

डिरेक्टर बोर्डाची वाढ होत गेली. पुढे जाऊन डायरेक्टर बोर्डाला वाटू लागले कि हा इतका तरुण मुलगा आपला C E O नको म्हणून त्यांनी इलॉनला हटवले.. पण इलॉनने त्याचा प्रवास थांबवला नाही.

पुढे जाऊन आणखी खूप कल्पनांना त्याला मूर्त रूप द्यायचं होतं.

सन २००० मध्ये टेक्नॉलॉजी च्या क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे बोर्ड ऑफ डायरेक्ट ने झिप-२ विकण्याचा विचार पुढे आणला. आणि संगणक उद्योगात नावाजलेल्या Compaq ला झिप-२ विकली.

तेव्हा यातला ७% इक्विटी म्हणजे २२ मिलियन डॉलर लगोलग इलॉनला मिळाले.

यातून पुढे गुंतवणूक करणं इलॉनने चालू केलं. आणि लगेच चालू केली X.Com हि ऑनलाइन ट्रान्सॅक्शन करणारी ऑनलाइन बँकिंग कम्पनी होती पुढे Confinity कम्पनी बरोबर मर्ज होऊन या कम्पनीचे नाव पडले PayPal….. हेच PayPal जगभर ऑनलाई ट्रांसक्शन साठी आज नावारूपाला आलं.

कम्पनीचा CEO आणि कम्पनीच्या CTO बरोबर त्याचे काही कामकजी विषयात मतभेद झाले. त्यावेळी इलॉनचं नुकतंच लग्न झालं होतं.

तो हनिमूनला गेला असताना CTO ने इतर डायरेक्ट ना आपल्या बाजूने वळवून इलॉनला कम्पनीतून बाहेर काढलं…..

पुन्हा एकदा स्वतःच्याच निर्मितीतून बाहेर पडण्याची वेळ इलॉनवर आली…. पण तोपर्यंत इलॉनचा शेअर बराच मोठा झाला होता…

१६५ मिलियन डॉलर घेऊन यावेळी इलॉन बाहेर पडला… पण थांबला नाही…

आता एलोनची योजना होती मंगळ ग्रहावर जीवन सुरु करण्याची… आणि त्याने ‘Space X’ कम्पनी चालू केली.

हल्लीच आपण Space X चं नाव मंगळावर टेस्ला कार नेण्याच्या संदर्भात ऐकलंच आहे. (याबद्दलचा लेख- Falcon Heavy Rocket नेत आहे मंगळाच्या कक्षेत टेस्लाची गाडी!) अंतरळाची यात्रा कमर्शिअली शक्य करण्याचा मूळ विचार यात होता.

इथे इलॉनने बालपणी तासन्तास पुस्तकं वाचून मिळवलेलं रॉकेट सायन्स उपयोगात आणलं.

पुस्तकं वाचून, इंटरनेट वरील माहिती खंगळून माणूस काय ज्ञान मिळवू शकतो हेच यातून सिद्ध होतं. NASA, ISRO तसेच इतर देशांच्या संस्था space travel चे काम करतात पण प्रायव्हेट संस्था हि पहिलीच…

पण दुर्दैवाने यात इलॉनला अपयश आले आणि बँकरप्ट इलॉनला आता थांबण्याचा इशारा सगळेच गुंतवणूकदार देऊ लागले.

पण थांबेल ती इलॉन कसला… आणि त्याने पुन्हा पुढची घोषणा केली आणि त्यात तो सफल झाला…. आता त्याला NASA ने आपल्याबरोबर काम करण्यासाठी बोलावलं.

Reusable Rocket हि संकल्पना इलॉनने जगासमोर आणली. तसेच NASA चे इक्विपमेंट, कार्गो आणि सॅटेलाइट स्पेस मध्ये पोहोचवण्याचे काम Space X करतं.

त्याचबरोबर टेस्ला मोटर्स मध्ये गुंतवणूक करून इलॉन तिथलाही CEO झाला. आणि येथेसुद्धा काही अपयश पचवत टेस्लानेही त्याच्या देखरेखित नवनवे उच्चांक मोडले.

इतके अपयश आले तरी दर वेळी इलॉन उसळी मारून पुन्हा उभा राहिला. तो म्हणतो ‘Failure is an option but you got to bounce back’.

आज २० बिलयन डॉलर पेक्षा जास्त त्याची नेटवर्थ आहे. आपल्याकडे भारतात खुपशे तरुण स्टार्ट अप चालू करण्याच्या विचाराने भारावलेले आहेत.

नवे काम चालू करतांना या तरुणांना अपयश हे येतच राहणार. अशा प्रत्येक तरुणाने एलोनचे जीवन अभ्यासलेच पाहिजे. यशस्वीपणे अपयश पचवण्याची कला आपल्या एकट्याचंच आयुष्य नाही तर जग सुद्धा बदलू शकते हेच एलॉनने दाखवून दिले..

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “कित्येक अपयशं पचवून शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचलेला इलॉन मस्क!!”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय