थंडीच्या दिवसात आल्याचा रस नियमित घेण्याचे फायदे आणि तो कशा प्रकारे घ्यावा

थंडीच्या दिवसात आल्याचा रस नियमित घेण्याचे फायदे आणि तो कशा प्रकारे घ्यावा

जाणून घ्या थंडीच्या दिवसात आल्याचा रस नियमित घेण्याचे फायदे कोणते आहेत? आल्याचा रस कशा पद्धतीने सेवन करावा?

लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल चहामध्ये आलं घालून आम्ही वर्षानुवर्ष पीत आहोत. आल्याचं महत्व तुम्ही वेगळं काय सांगणार? पण तसे नाही, थंडीच्या दिवसात आल्याचा रस नियमित सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते. कसे ते जाणून घेऊया. त्यासाठी प्रथम पाहूया हा आरोग्यपूर्ण आल्याचा रस तयार करायची कृती

आल्याचा रस तयार करण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात आले, थोडासा लिंबाचा रस आणि चवीपुरती साखर किंवा मध लागणार आहे.

जेवढे कप आल्याचा रस हवा आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्या. एक कप पाण्यासाठी अर्धा इंच आले या प्रमाणात आले घेऊन ते स्वच्छ धुऊन घ्या. त्यावरची साले काढून टाकून आले किसून घ्या. गॅसवर एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यात किसलेले आले मिसळा. पाणी निम्मे होईपर्यंत उकळू द्या. आले पाण्यामध्ये अगदी पुर्ण मिसळले गेले पाहिजे. त्यानंतर उकळलेले पाणी गाळून घ्या. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार साखर किंवा मध मिसळा. आल्याचा रस पिण्यासाठी तयार आहे. त्याचे अगदी गरम असतानाच सेवन करा.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी अशा रसाचे सेवन करणे थंडीच्या दिवसात आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे.

आले घालून पाणी उकळवून घेऊन ते फ्रिज मध्ये स्टोअर देखील करता येऊ शकते. ऐन वेळी पुन्हा गर करून त्यात लिंबाचा रस आणि मध किंवा साखर मिसळून हवा तेवढा रस तयार करता येऊ शकतो. आठवडाभरासाठी असे पाणी तयार करून फ्रीजमध्ये ठेवता येऊ शकते.

थंडीच्या दिवसात असा आल्याचा रस पिण्याचे आरोग्यासाठी खालील फायदे आहेत.

१. आल्यामध्ये भरपूर प्रमाणात कॉपर मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असल्यामुळे आपल्याला विटामिन एस , सी आणि ई मोठ्या प्रमाणावर मिळते.

२. असा आल्याचा रस दररोज पिण्यामुळे मेटाबोलिजम वाढते. तसेच प्रतिकार शक्ती देखील खूप वाढते.

३. आले प्रकृतीने उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये असा रस पिण्याचा त्रास होऊ शकतो. परंतु थंडीच्या दिवसात मात्र असा रस पिण्याचा त्रास न होता उलट भरपूर फायदाच होतो.

४. आल्याचा रस पिण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

५. आल्याचा रस दररोज पिण्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. थंडीच्या दिवसात तहान लागत नाही त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. परंतु त्यामुळे निर्माण होणारी पाण्याची कमतरता ह्या रसाच्या सेवनाने भरून निघते.

६. आल्याचा रस नियमित पिण्यामुळे थंडीच्या दिवसात सिझन बदलल्यामुळे होणारा सर्दी-खोकला नियंत्रणात येतो.

७. पित्त प्रवृत्ती असणाऱ्या लोकांसाठी आल्याचा रस पिणे फायदेशीर ठरते.

८. दररोज असा आल्याचा रस पिण्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

तर हे आहेत थंडीच्या दिवसात गरमागरम आल्याचा रस पिण्याचे फायदे. या स्वादीष्ट आणि पौष्टिक रसाचे दररोज सेवन करा आणि त्याचे फायदे अनुभवा. ह्या बाबतचे तुमचे अनुभव आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.