तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे-कुठे झाला आहे ते कसे तपासावे वाचा या लेखात

आपल्या आधार कार्डचा गैरवापर होतोय अशी शंका तुमच्या मनात आहे का? आपले आधार कार्ड नक्की कोण कोणत्या व्यवहारांमध्ये प्रूफ म्हणून वापरले गेले ते तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का?

असे असेल तर आपले आधार कार्ड कुठे आणि किती वेळा वापरले गेले आहे ते घरबसल्या जाणून घ्या या पद्धतीने – एका क्लीकवर ही माहिती जाणून घ्या आणि आपल्या मनातील शंका दूर करा.

सध्या सगळीकडे आधारकार्ड हा अगदी परवलीचा शब्द झाला आहे. कोणत्याही सरकारी किंवा खाजगी कामासाठी आधार नंबर ही अगदी आवश्यक बाब बनली आहे. कोणत्याही व्यक्तीचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड प्रामुख्याने वापरले जाते. बहुतेक सर्व व्यवहारांमध्ये आधार कार्डची माहिती देणे बंधनकारक केले गेले आहे.

परंतु त्याच मुळे आधार कार्डचा गैरवापर करणे देखील खूप कॉमन होत चालले आहे. वेगवेगळ्या सरकारी किंवा पैशांच्या संदर्भातील कामांमध्ये आपले आधार कार्ड देताना इतरांकडून याचा गैरवापर तर होणार नाही ना अशी शंका आपल्या मनात येत असते. आपण आपल्या आधार कार्डची झेरॉक्स दिली की ती दुसऱ्या कुणाच्या हातात पडून तिचा गैरवापर होईल का ही शंका आपल्याला भेडसावत असते.

परंतु आता मात्र आपले आधार कार्ड दुसऱ्या कोणी चुकीच्या पद्धतीने वापरले तर नाही ना अशी शंका घेण्याचे कारण नाही. कारण आपले आधार कार्ड नक्की किती वेळा, कोणत्या व्यवहारांसाठी आणि कोणाकडून वापरले गेले आहे याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. UIDAI (Unique Identification Authority of India) च्या अधिकृत वेबसाईटवर “आधार ऑथेंटिकेशन हिस्टरी“ या सर्विस अंतर्गत आधार कार्ड धारक आपल्या आधार कार्डाचा मागील सहा महिन्यांमध्ये कोणत्या प्रकारे वापर झाला आहे हे तपासून पाहू शकतात.

Unique Identification Authority of India म्हणजेच UIDAI तर्फे दिली जाणारी ही सुविधा नेमकी कशी आहे आणि त्याचा वापर कसा करायचा ?

स्टेप १

सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in ला भेट द्या. या वेबसाईटवरच आपण आपल्या आधार कार्डची मागील सहा महिन्यांची हिस्टरी घरबसल्या पाहू शकतो.

स्टेप २

वेबसाईटवरील “माय आधार“ हा पर्याय निवडा. त्यावर क्लिक करा.

स्टेप ३

इथे आधार कार्डचे सर्विस सेक्शन उघडलेले दिसेल. तिथे असणारा “आधार ऑथेंटिकेशन हिस्टरी“ हा पर्याय निवडा. तिथे आपला आधार नंबर आणि दिसणारा कॅप्चा भरा. आधार नंबर आणि कॅप्चा योग्यप्रकारे भरल्यावर एक ओटीपी तुमच्या अधिकृत मोबाईल नंबर वर पाठवला जाईल. हा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डाशी आधीपासून जोडलेला असणे आवश्यक आहे.

aadhar-card-mahiti

स्टेप ४

मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी तिथे असणाऱ्या रिकाम्या जागेत भरा. त्यानंतर तुमच्या समोर दोन पर्याय दिसतील. एक पर्याय “ऑथेंटिकेशन टाईप“ असा असेल. त्यामध्ये तुमच्या बायोमेट्रिक डिटेल्स असतील. आणि दुसरा पर्याय “डेटा रेंज“ असा असेल. जिथे सुरुवातीची तारीख आणि शेवटची तारीख भरल्यानंतर त्या कालावधीतील माहिती मिळू शकेल.

स्टेप ५

“डेटा रेंज“ हा पर्याय निवडून तुम्हाला ज्या कालावधीतील तुमच्या आधार कार्ड संबंधीच्या ट्रांझॅक्शन माहिती करून घ्यायच्या असतील त्या कालावधीची सुरुवातीची तारीख आणि शेवटची तारीख तिथे दिलेल्या जागेत भरा. तसे केल्यानंतर तुमचे आधार कार्ड सदर कालावधीमध्ये कोण कोणत्या प्रकारे वापरले गेले आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

इतक्या सोप्या पद्धतीने आपण आपले आधार कार्ड नक्की केव्हा, कुठल्या व्यवहारासाठी आणि कोणाकडून वापरले गेले हे तपासून पाहू शकतो. तर मित्रांनो, आता आपल्या आधार कार्डाचा गैरवापर तर होत नसेल ना ही शंका मनातून काढून टाका. लेखात सांगितलेल्या पद्धतीने UIDAI च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुमच्या आधार कार्डची सर्व माहिती एका क्लिक वर मिळवा.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय