तुमच्या “या” सवयी टाळा, म्हणजे लोक तुम्हाला टाळणार नाहीत

या आहेत काही सवयी, ज्यामुळे तुमचा लोक रिस्पेक्ट करत नाहीत…

लेख पूर्ण वाचा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी देण्यासाठी तयार व्हा!

कधीतरी तुम्हाला असं जाणवतं का? की लोक तुम्हाला टाळायला लागलेले आहेत?

एखाद्या समारंभात ऑफिसमध्ये तुम्ही दिसला की लोक पाठ फिरवून जातात का?

कदाचित तुम्ही आधी काही चुका केल्या असतील.

कोणत्या चुकांमुळे लोक तुम्हाला टाळायला लागतात हे नीट समजून घेऊया.

1) संवादात अडथळा

एखाद्या समारंभात ऑफिसमध्ये दोन व्यक्ती एखाद्या विषयावर चर्चा करत असताना तुम्ही कधी एकदम तिथे जाऊन तुम्ही धडकला आहात का?

किंवा एखादा चर्चेत तुमच्या मनात आलेला मुद्दा तुम्ही समोरच्या व्यक्तीचा बोलणं मध्येच तोडून सांगता का?

तुमची हीच चुकीची सवय ज्यामुळे लोक तुम्हाला टाळतात.

2) ओढून ताणून विनोदनिर्मिती

विनोदाची अनेक भावंड आहेत. नर्मविनोदाबरोबरच बोचरा विनोदही असतो. ज्यामुळे लोक नाराज होऊ शकतात.

काही व्यक्तींना उगाचच प्रत्येक गोष्टीवर विनोदनिर्मिती करावीशी वाटते.

मग बऱ्याच वेळेला हा विनोद हास्यास्पद होतो, कंटाळवाणा होतो.

तुम्ही जर प्रत्येक बाबतीत हास्य निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न करायला लागलात तर लोक तुम्ही दिसताच तुमच्या पासून दूर जातील.

3) स्वतःची टिमकी वाजवणे.

ही सवय जर तुम्हाला असेल तर तुम्ही लगेच थांबवली पाहिजे.

नाहीतर तुम्ही तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना कायमचं गमावून बसाल.

प्रत्येक ठिकाणी स्वतःच कोडकौतुक, मी काय केलं याची यादी वाचणं म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अनादर करणं.

अशा कंटाळवाण्या संभाषणापासून, स्वतःच्या कौतुकात रंगणाऱ्या व्यक्तीपासून प्रत्येक जण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात.

त्यामुळे “मी” पणा नक्कीच टाळा.

4) बोलताना फोनवरती स्क्रोल करणं टाळा.

कुठेही उभं राहून आज आपण जगातल्या कुठल्याही व्यक्तीच्या कायम संपर्कात राहू शकतो.

मात्र आपल्या प्रत्यक्ष सहवासात जी व्यक्ती आहे तिचं बोलणं ऐकताना किंवा त्यांच्याशी बातचीत करताना फोनवरती दुसऱ्या व्यक्तीशी कनेक्ट होणं चुकीचं आहे.

त्यातून असं वाटतं की एक तर तुम्ही त्या व्यक्तीला कंटाळला आहात किंवा फोन मधली व्यक्ती प्रत्यक्षात त्या व्यक्तीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे.

दुखावलेली अशी व्यक्ती तुमचा सहवास टाळणारच ना?

म्हणूनच प्रत्यक्षात कुठल्याही व्यक्तीशी बोलत असताना फोन अजिबात वापरू नका.

5) मीच बरोबर हा पवित्रा टाळा

काहीवेळा अगदी सहज सुरू झालेली चर्चा वादविवादात रंगते.

अशा वेळेला मीच बरोबर असा अट्टाहास तुम्ही करू नका.

एखादा मुद्दा घेऊन तुम्ही चर्चा नक्की जिंकाल पण समोरच्या व्यक्तीचं मैत्र मात्र कायमचं गमवाल.

त्यामुळे तुमची बाजू बरोबर असली तरी समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी द्या आणि माझंच बरोबर हे ठसवणं टाळा.

6) तुलना टाळाच

तुलना ही अशी गोष्ट आहे जी कुणालाही कधीही आवडत नाही.

आपली एखादी मैत्रीण नुकतीच एखाद्या ट्रीपवरुन परत आलेली असेल किंवा आपला एखादा मित्र ट्रेकिंग वरून परत आलेला असेल आणि ते त्यांचे अनुभव सांगत असतील तर तुम्ही ट्रीपचे तुमचे अनुभव मध्येच सांगायला सुरवात करू नका.

त्या व्यक्तीचा अनुभव शांतपणे ऐका. त्याच्या अनुभवांची आपल्या अनुभवाशी अजिबात तुलना करू नका.

माझीच ट्रीप कशी स्वस्तात पडली किंवा माझं नियोजन कसं परफेक्ट होतं हे सांगून समोरच्याला कधीही कमी लेखू नका.

7) बोलताना संयम बाळगा

आज-काल संयम ही गोष्ट दुर्मिळ होत चाललेली आहे.

संवादाच्या बाबतीतही तेच होतं.

गप्पा किंवा चर्चा पूर्ण होण्याच्या आतच आपल्याला काय वाटतं, आपलं काय मत आहे हे सांगण्याची लोकांना खूप गडबड असते.

तुमची ही वृत्ती अशीच असेल तर तुम्ही स्वतःला इतरांच्या ब्लॅकलिस्टमध्ये आरामात पोहोचवत आहात हे लक्षात घ्या. आणि स्वतःला वेळीच बदला.

8) प्रत्येक चर्चेची गाडी गॉसिपकडे वळवू नका.

गप्पा मारताना तुम्ही गॉसिपकडे पटकन वळत असाल तर तुम्ही चुकत आहात.

आजकाल सोशल मीडियामुळे अफवांना वारेमाप पिक येतं आणि याच अफवांना तुम्ही संभाषणात आणत असाल, जी व्यक्ती हजर नाही त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर टीकाटिप्पणी करत असाल तर पटकन थांबण्याचा निर्णय घ्या.

जर तुमच्याकडे मुद्देसूद आणि महत्वाचं असं सांगण्यासारखं काहीही नसेल तर शांत बसण्याचा मार्ग निवडा म्हणजे तुम्ही इतरांच्या मनातून उतरणार नाही.

9) वैयक्तिक चौकशी

एखाद्या व्यक्तीचं आपल्याशी नातं काय आहे, यावर संवादाचा गप्पांचा मार्ग ठरायला हवा.

अगदी जवळच्या व्यक्ती असतील तर तुम्ही अगदी मनमोकळेपणाने बोलू शकता.

पण व्यावसायिक पातळीवर समजा पहिलीच भेट असेल तर समोरच्या व्यक्तीला अडचणीत आणणारे प्रश्न कधीही विचारू नका.

वैयक्तिक गोष्टीत नाक खूपसल्यामुळे तुमची किंमत समोरच्या व्यक्तीच्या मनात कमी होत असते.

10) वाईट प्रतिक्रिया देऊ नका

कोणाच्याही बोलण्यावर मत व्यक्त करताना ते प्रमाणशीर, आदबशीर असावं.

जात, पात, धर्म, लिंग, देश यावर आधारित पूर्वग्रह दोषांनी ग्रासलेलं आपलं मत कधीही व्यक्त करू नका.

समोरच्या माणसाचा योग्य तो मान राखा आणि सौम्य शब्दातच आपलं मत नेहमीच मांडायला शिका.

11) वास्तु निरीक्षण

एखाद्या मीटिंगसाठी हॉटेलमध्ये किंवा एखादा कॉन्फरन्स रूममध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर बोलता-बोलता त्या खोलीचं निरीक्षण करू नका.

त्यामुळं काय होतं की तुमच्या बोलण्याचा टोन बिघडतो.

बिघडलेला टोन समोरच्या माणसाला खटकू शकतो. अर्थातच तुम्ही त्या व्यक्तीच्या मनातूनही उतरू शकता.

12) त्रयस्थपणे स्वतःकडे पहा

कुणाशीही संवाद साधताना आपण योग्य मार्गाने संवाद साधतो आहे ना ते पुन्हा पुन्हा तपासलं पाहिजे.

काही वेळेला तुम्ही जे करत असता ते बरोबरच आहे असं तुम्हाला वाटत असतं.

मात्र शिष्टाचार, एटिकेट्स पाळून आपली व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रगती व्हावी असं वाटत असेल तर मात्र स्वतः कडे नीट पहा .

स्वतःला जाणवणारे दोष दूर करा

दुसऱ्यांशी आदराने प्रेमानं वागण्याची सवय स्वतःला लावून घ्या

आपल्या मित्र-मैत्रिणींशी चर्चा करून स्वतः मध्ये बदल घडवा. क्वचित व्यावसायिक मदत घ्यायला सुद्धा हरकत नाही.

आज आपण अमिताभ बच्चन यांचं संभाषण ऐकायला लागलो की ऐकतच राहावं असं वाटतं .

संस्कृतीला जपत, स्वतःला प्रगल्भ बनवून अपडेट राहून अमिताभ बच्चन यांनी स्वतःची एक सुसंस्कृत प्रतिमा जपलेली आहे.

त्यामुळे प्रत्येकाला त्यांचं बोलणं हवहवसं वाटतं.

तुम्ही पण एक उत्तम व्यक्ती आहात.

सुसंस्कृतपणा अंगात भिनवून आपली उत्तम छाप समोरच्या व्यक्तीच्या मनात सोडा. म्हणजे मग तुम्हाला कोणीही कधीच टाळणार नाही.

लोक आदर देत नाही आपण तो आदर कमवावा लागतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय