२०२२ मध्ये सुरू करता येण्याजोग्या या सर्वोत्तम दहा बिजनेस स्टार्ट अप आयडिया

व्यवसाय मार्गदर्शन

हल्ली आपण स्टार्ट अप हा शब्द बरेच वेळा ऐकतो. तरुण-तरुणींमध्ये लोकप्रिय असणारी ही कन्सेप्ट नक्की आहे तरी काय?

स्टार्ट अप म्हणजे नव्याने सुरू केला गेलेला एखादा व्यवसाय.

एका व्यक्तीने किंवा तीन-चार जणांच्या ग्रुपने मिळून हा व्यवसाय सुरू केलेला असतो. स्टार्ट अप बिझनेस आयडिया ह्या नेहमीपेक्षा वेगळ्या, युनिक असतात.

सुरुवातीला या व्यवसायाचे स्वरूप अगदी छोटेसे, घरगुती असे असू शकते. परंतु जसजसा जम बसत जातो तसतशी या व्यवसायात प्रगती होऊन भरपूर पैसे कमवता येतात.

हळूहळू जम बसवून कशी प्रगती होऊ शकते ते पाहण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. पुण्यामधील “इकोकारी” या स्टार्टअप व्यवसायाची अशीच गोष्ट आहे.

“इकोकारी” तर्फे प्लास्टिक गोळा करून त्याचे रिसायकलिंग केले जाते. त्यापासून निरनिराळ्या हस्तकलेच्या वस्तू बनवल्या जातात. १९९५ मध्ये हा स्टार्टअप व्यवसाय सुरु झाला.

आता त्यांचा टर्नओवर वर्षाला ९० लाख रुपयांहून अधिक आहे. म्हणजेच हे सिद्ध होते की वेगळ्या, युनिक आयडिया घेऊन जर असा व्यवसाय सुरु केला तर त्यात नक्कीच प्रगती करता येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच दहा वेगळ्या आयडीया सांगणार आहोत. ज्यांना येत्या काळात मोठी मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

१. हॅन्डमेड दागिने तयार करणे

हल्ली पारंपारिक सोन्या चांदीच्या दागिन्यांपेक्षा नवनवीन प्रकारच्या हाताने बनवलेल्या फॅन्सी दागिन्यांची जास्त फॅशन आहे. असे वेगळे दिसणारे, रंगीत, आकर्षक दागिने महिलांच्या पसंतीस उतरत आहेत.

टेराकोटाचे दागिने, रेशमी धाग्यापासून बनवलेले दागिने, निरनिराळे मोती आणि खडे वापरून बनवलेले दागिने या सर्वांना चोखंदळ महिलांकडून खूप मागणी आहे.

असे दागिने तयार करून ते विकण्याचा व्यवसाय ही कमाईची एक उत्तम संधी आहे. हा व्यवसाय वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो.

२. पर्सनलाईज्ड (वैयक्तिक) भेटवस्तू विकणे 

कोणत्याही छोट्या अथवा मोठ्या प्रसंगी आलेल्या पाहुण्यांना काही ना काही रिटर्न गिफ्ट देण्याची पद्धत हल्ली वाढत चालली आहे.

अशावेळी सरधोपट भेटवस्तू न देता काहीतरी वैयक्तिक संबंध असणाऱ्या भेटवस्तू देण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.

उदाहरणार्थ एखाद्या बाळाचा वाढदिवस असेल तर त्या बाळाचा फोटो असणारे कॉफीचे मग, किंवा बहीण भाऊ किंवा मित्र मैत्रिणी एकत्र भेटणार असतील तर त्यांची नावे असणारे टी-शर्ट.

हल्लीच्या तरुण मुला-मुलींमध्ये पर्सनलाईज्ड कपड्यांना खूप मागणी आहे. टी-शर्टवर प्रिंट केलेले वेगवेगळे सुविचार, चित्रे, काही प्रसिद्ध वाक्य यांना खूप मागणी आहे.

अशा प्रकारच्या कपड्यांचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन दुकान तुम्ही सुरू करू शकता. ग्राहकांच्या मागणीनुसार असे कपडे तयार करून त्यावर विविक्षित प्रिन्ट करून घेऊन ते विकता येऊ शकतात.

फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया वरून याची उत्तम प्रकारे जाहिरात देखील करता येऊ शकते.

४. डाएट फूड बनवून विकणे

हल्लीची केवळ तरुण पिढीच नव्हे तर मध्यमवयीन आणि वयस्कर लोक सुद्धा डाएट कॉन्शस होऊ लागले आहेत.

पौष्टिक पदार्थ खाण्याकडे सर्वांचा कल वाढतो आहे. मात्र योग्य प्रमाणात पौष्टिक घटक असणारे पदार्थ बनवणे हे तसे किचकट काम असू शकते त्यामुळे असे पदार्थ घरी बनवणे थोडे अवघड जाते. जर तुम्ही असे उत्तम क्वालिटीचे पदार्थ तयार करून ते विकण्याचा व्यवसाय सुरू केला तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

सोसायट्यांमध्ये आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये याला भरपूर मागणी येऊ शकते. सध्याचा डायटचा ट्रेंड पाहून आणि खरोखरच पौष्टिक असणारे पदार्थ तयार करून ह्या व्यवसायात नक्की जम बसवता येऊ शकतो.

५. वाया जाणाऱ्या अन्नावर प्रक्रिया करणे

घरगुती स्तराबरोबरच व्यावसायिक स्तरावर देखील मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ वाया जात असतात. मोठी हॉटेल किंवा पदार्थ तयार करणाऱे कारखाने येथून असे अन्नपदार्थ गोळा करून त्यापासून शक्य असल्यास इतर टिकाऊ पदार्थ तयार करणे किंवा कंपोस्ट सारखे खत तयार करणे ही एक वेगळीच बिझनेस आयडिया आहे.

अशा प्रकारे वाया जाणार्‍या अन्नपदार्थांचे रिसायकलिंग करून त्यांचा योग्य वापर करता येऊ शकतो.

६. प्लास्टिक रिसायकलिंग करणे

पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा प्रश्‍न किती घातक आहे हे आपण जाणतोच. प्लास्टिकचे लवकर विघटन होत नसल्यामुळे ते कचर्‍यात फेकून देणे निसर्गाच्या दृष्टीने हानिकारक आहे.

परंतु असे प्लास्टिक गोळा करून त्याचे योग्य प्रकारे विघटन करून रिसायकलिंग करणे हा एक उत्तम व्यवसाय आहे.

यात कमाई बरोबरच निसर्गाचे संरक्षण देखील आहे. अशा प्रकारच्या रिसायकल केलेल्या प्लास्टिक पासून निरनिराळ्या हँडमेड वस्तू बनवता येऊ शकतात. त्यांच्या विक्रीतून भरपूर नफा कमावता येतो. प्लॅस्टिक रिसायकल करणारे मशीन देखील उपलब्ध आहे.

७. मोबाईल ॲप किंवा वेबसाईट डेव्हलप करणे

जर तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंट किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे शिक्षण घेतलेले असेल तर त्यातून एक उत्तम प्रकारचा व्यवसाय सुरू करता येऊ शकता.

मोबाईल ॲपचे महत्त्व तर आपण सगळेजण जाणतोच. असे ॲप तयार करणे ही तर उत्तम स्टार्टअप आयडिया आहेच.

शिवाय नव्याने सुरू होणाऱ्या व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी वेबसाईट तयार करून देणे हीदेखील चांगली व्यवसायाची संधी आहे.

८. हेल्थ केअर सर्विसेस पुरवणे 

निरनिराळ्या प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या आणि फिटनेसचे सत्र घरगुती ग्राहकांना तसेच मोठमोठ्या ऑर्गनायझेशनना पुरवणे हा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो.

अशा तपासण्या करणारे सेंटर आणि मोठे ऑर्गनायझेशन यांच्यामधील दुवा बनून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. घाऊक प्रमाणात अशा तपासण्या करण्यासाठी मिळणारी सूट यावर तुमचा या व्यवसायातील नफा ठरेल.

९. ऑनलाइन पद्धतीने शिकवण्या घेणे

सध्याच्या पॅनडेमिकच्या काळात पालक अजूनही आपल्या मुलांना घराबाहेर पाठवण्यासाठी तयार नाहीत. असे असताना घरच्या घरी राहून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या ट्युशन्स घेणे हा एक उत्तम व्यवसाय आहे. आपल्या जवळ असणाऱ्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही मुलांना वेगवेगळे विषय शिकवू शकता.

१०. इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करणारे सेंटर उघडणे 

ही एक अतिशय वेगळी आणि युनिक बिझनेस आयडिया आहे. आता इलेक्ट्रिक वाहनांचा जमाना सुरू झाला आहे. पेट्रोल-डिझेल ऐवजी इलेक्ट्रिसिटी वर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.

परंतु अशा वाहनांची बॅटरी थोड्या थोड्या काळाने चार्ज करणे आवश्यक असते. घराबाहेर पडल्यानंतर अशी बॅटरी चार्ज करणे लोकांना अवघड जाऊ शकते. तुम्ही जर असे बॅटरी चार्ज करून देणारे सेंटर उघडले तर भविष्यात हा नक्कीच एक चांगला आणि मोठा व्यवसाय बनू शकेल.

यावर अधिक माहिती गोळा करणे आणि आपल्या सेंटर साठी मध्यवर्ती ठिकाणी चांगली जागा शोधणे हा एक उत्तम पर्याय आहे.

तर मित्र मैत्रिणींनो या आहेत १० अगदी वेगळ्या, युनिक  असणाऱ्या बिजनेस स्टार्टअप आयडिया. या पैकी कोणता व्यवसाय सुरू करावासा तुम्हाला वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या जवळ काही नवीन आयडियाज असतील तर त्या आमच्याशी शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!