अवघ्या काही मिनिटातच स्वच्छ करा प्रेशर कुकरचं कळकट्ट झाकण

प्रेशर कुकर स्वच्छ करणे

प्रत्येक घरात आपल्याला प्रेशर कुकर हा दिसतोच.

वेगवेगळ्या साईजचा असेल, वेगवेगळ्या कंपनीचा असेल, पण किमान एक तरी कुकर प्रत्येक घरात असतोच.

प्रेशर कुकरमुळे वेळेची होणारी बचत फार महत्त्वाची आहे, त्याचबरोबर गॅसची सुद्धा बचत होते.

आणि म्हणूनच महिला वर्गासाठी प्रेशर कुकर किचन मध्ये असणं खूप गरजेचं असतं.

मुगाची खिचडी, पुलाव, मसालेभात, याचबरोबर रोजची आमटी-भाजी, भात करण्यासाठी, भाजी, डाळ आणि त्याच बरोबर तांदूळ सुद्धा सर्रास कुकर मध्ये शिजवून घेतले जातात.

भाजी, मसाले भात किंवा डाळ शिजताना काही वेळा ते उडून कुकरचं झाकण खराब करतात.

हा कुकर रोजच्या रोज धूतानासुद्धा जराशी ताकद लावावी लागते.

मात्र रोजच्या गडबडीत जर तो स्वच्छ धुतला गेला नाही तर हळू हळू झाकणावरती काळे थर साचायला लागतात.

हे थर हळूहळू इतके कठीण होतात की कुकर काळाकुट्ट दिसायला लागतो.

हा कुकर स्वच्छ करण्यासाठी अशा सोप्या टिप्स वापरा की काही मिनिटातच सहज तुमचा कुकर स्वच्छ होईल.

1) व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

कुकरचं झाकण जळून फारच काळपट झालं असेल तर एका टबात कोमट पाणी घेऊन व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिसळा.

आता त्यात कुकरचं झाकण पाच मिनिटे बुडवून ठेवा.

पाच मिनिटांनी शिट्टी आणि रबरी रिंग काढून स्क्रबरनी घासा.

तुमचे कुकर चे झाकण अगदी नव्या सारख चमकेल.

2) लिंबाची साल

काहीवेळा कुकरच्या आतल्या बाजूने काळे डाग अडकून राहतात ते साफ करण्यासाठी कोमट पाणी आणि लिंबाची साल तुम्ही वापरू शकता.

कुकरच्या झाकणाच्या आतल्या बाजूने लिंबाची
साल चोळून तुम्ही काळे डाग स्वच्छ करू शकता.

त्यातूनही काही डाग उरले तर कुकरच्या आत पाणी भरून त्यात लिंबाची साल घाला मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटे वाफ येऊ द्या.

त्यानंतर नेहमीच्या पद्धतीने झाकण घासून घ्या.

झाकणाचा कानाकोपरा अगदी स्वच्छ झाल्याचा तुम्हाला जाणवेल.

3) कांदा

काही वेळा कुकर लावताना पाणी कमी पडतं किंवा वाफ जाऊन पाणी कमी होतं.

अशा वेळेला गॅस सुरूच राहिला तर कुकर आतल्या बाजूने पुर्ण काळा पडतो.

असा कुकर साफ करणे फार अवघड होऊन बसतं.

त्यावेळेला कांद्याची मदत घ्या.

कांद्यातील सल्फ्यरिक ऍसिड कुकरचे हे काळे डाग दूर करायला तुम्हाला मदत करेल.

कुकर मध्ये पाणी भरून घ्या कांद्याचे पाच सहा तुकडे टाका. उकळी येऊ द्या.

एक उकळी आल्यानंतर मंद आचेवर वीस ते पंचवीस मिनिटं हे पाणी उकळू द्या.

त्यानंतर पाणी कोमट झाल्यावर स्क्रबर ने स्वच्छ घासून घ्या.

तर सख्यांनो, घरातल्या वस्तू वापरून कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी कष्टात तुम्ही कुकर चे झाकण सहज स्वच्छ करू शकता.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!