एसबीआय क्रेडीट कार्ड वापरून ई एम आय वर खरेदी करणे आजपासून महागणार

एसबीआय क्रेडीट कार्ड वापरून ई एम आय वर खरेदी करणे 1 डिसेंबरपासून महागणार. नक्की कसे ते जाणून घ्‍या या लेखात

एसबीआय क्रेडीट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता क्रेडीट कार्ड वापरून ई. एम. आय. वर वस्तू खरेदी करणे आता थोडे महागात पडणार आहे.

कारण एसबीआयने त्यांच्या क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या सर्व ग्राहकांना ई-मेल द्वारे असे कळवले आहे की १ डिसेंबर २०२१ पासून एसबीआय क्रेडीट कार्ड वापरून केलेल्या आणि ई एम आय मध्ये कन्व्हर्ट केलेल्या सर्व व्यवहारांना आता प्रोसेसिंग फी लागणार आहे. म्हणजे नक्की काय ते आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया.

क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या सर्व ग्राहकांना हे तर माहीत असेलच की क्रेडीट कार्ड वापरून एखादी मोठी खरेदी केली तर त्या रकमेची परतफेड करताना क्रेडिट कार्डवर ई. एम. आय. म्हणजेच काही हप्त्यात ती रक्कम परत करण्याची सुविधा दिलेली असते. या सुविधेसाठी क्रेडिट कार्ड पुरवणाऱ्या बँका ग्राहकाकडून व्याजापोटी काही रक्कम घेतात.

परंतु एस बी आय ने ई-मेल द्वारे असे कळवले आहे की १ डिसेंबर २०२१ पासून क्रेडीट कार्ड वापरून केलेल्या आणि ई एम आय द्वारे परतफेड करण्याची सुविधा निवडलेल्या सर्व व्यवहारांना रु. ९९ + टॅक्सेस असे अतिरिक्त चार्जेस लागणार आहेत.

एखादी खरेदी ई. एम. आय. मध्ये कन्व्हर्ट करण्यामुळे भराव्या लागणाऱ्या व्याजाच्या रकमे व्यतिरिक्त ही प्रोसेसिंग फी असेल.

याचाच अर्थ १ डिसेंबर पासून एसबीआय कार्ड द्वारे कोणतीही खरेदी केली आणि ती रक्कम ईएमआय द्वारे परतफेड करण्याचा पर्याय ग्राहकाने निवडला तर त्या ग्राहकाला रु. ९९ + टॅक्सेस हा अधिकचा भुर्दंड पडणार आहे.

एसबीआय क्रेडीट कार्ड वापरून केलेल्या सर्व ऑनलाईन खरेद्या तसेच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स वेबसाइट करून केलेल्या खरेद्या यांना हे नियम लागू आहेत.

ही प्रोसेस नेमकी समजावून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया….

समजा तुम्ही कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइट वरून एसबीआय क्रेडिट कार्ड वापरुन रु. १६००० इतक्या रकमेची वस्तू खरेदी केली आणि या रकमेची परतफेड करण्यासाठी तुम्ही ८ ईएमआय भरण्याचा पर्याय निवडला तर सदर रकमेची परतफेड ८ ईएमआय वापरून करण्याबद्दल तुम्हाला जे काही व्याज भरावे लागेल त्याव्यतिरिक्त सुरुवातीलाच या व्यवहाराची प्रोसेसिंग फी म्हणून तुम्हाला रु. ९९ + टॅक्सेस असे चार्जेस भरावे लागतील. याचाच अर्थ रकमेची परतफेड करताना बँकेच्या नियमाप्रमाणे लागू पडणारे व्याज अधिक ही प्रोसेसिंग फी एवढी रक्कम ग्राहकाला भरावी लागेल.

जर तुमच्या बिलातील रकमेचे ईएमआय कन्वर्जन कॅन्सल झाले तर सदर प्रोसेसिंग फी तुम्हाला परत मिळू शकेल. परंतु काही ईएमआय भरून झाल्यावर जर तुम्ही उरलेली रक्कम एक रकमी भरली म्हणजेच प्री क्लोजर केले तर मात्र प्रोसेसिंग फी परत मिळू शकणार नाही.

ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही व्यवहाराच्या सुरुवातीलाच ही प्रोसेसिंग फी आणि त्याची संपूर्ण माहिती दिसू शकेल.

ही प्रोसेसिंग फी १ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार असल्यामुळे त्याआधीच्या म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंतच्या कोणत्याही व्यवहारांवर अशी फी लागू होणार नाही.

तर एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या सर्व मित्रमंडळींनो, या नव्या नियमांची नोंद घ्या आणि त्यानुसार आपले आर्थिक व्यवहार करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय