भेटली ती पुन्हा……

Maggy

एकदा असंच आई घरी नसताना तिला आणलं. ती गरम पाण्याने अंघोळ करत होती आणि मी तिची आतुरतेने वाट पाहत होतो. आई घरी यायच्या आत सगळं उरकून घ्यायचं हो होतं.

मला अजूनही आठवत आहे की काही वर्षांपूर्वी तिच्या चारित्र्यावर अनेकांनी शिंतोडे उडविले होते, त्यानंतर ती गायब झाली होती..

मधून मधून तिची आठवण यायची तसं पाहायला गेलं तर तिचा राग मलाही येऊ लागला होता. तिनं सर्वांचा विश्वासघात केला होता.

याआधी प्रत्येक वेळी माझ्या संकटकाळी माझ्यासाठी धाऊन आली होती पण मी देखील इतरांच्या सांगण्यावरून तिच्यावर संशय घेतला.

त्यादिवसापासून आई देखील तिचा राग करू लागली होती. तिचं घरी नाव घेण देखीलं वर्ज्य होतं. घरी आणणे तर राहिले दूर.!!

हॉस्टेल वर होतो तेव्हा आणायचो तिला कधी कधी रूमवर !! त्या वाईट प्रसंगानंतर मला तिचा खूप राग येत होता पण खरं सांगू का! मला तिची आठवण खूप यायची पण शेवटी आईपुढे मी नमलो..!

मला ती अजिबात आवडत नव्हती हे जरी खरं असलं तरी आता ती पुन्हा आली आहे आणि मी तिला केव्हाच माफ केलं आहे. ती पुन्हा आवडू लागली आहे कारण आता तिच्याशिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाही.

शेवटी दोन मिनिटात तिने मन जिंकल होतं..!! आईने तिला अजिबात माफ केले नाही. राग करते. पण आई जेव्हा बाहेर जाते तेव्हा पूर्वीसारखं आताही तिला घरी आणतो. तिच्यासोबत बसून TV पहाणे मला अजूनही खूप आवडतं..!

एकदा असंच आई घरी नसताना तिला आणलं. ती गरम पाण्याने अंघोळ करत होती आणि मी तिची आतुरतेने वाट पाहत होतो. आई घरी यायच्या आत सगळं उरकून घ्यायचं होत. सुगधं दरवळत होता आणि मला विरघळवत होता.

शेवटी ती वेळ आली, ती बाहेर आली तेव्हा अगदी हळद लावलेल्या नवरीप्रमाणे दिसत होती. तिला पाहून मी एकदम सुखावलो…. मला राहवलं नाही म्हणून मागचा पुढचा विचार न करता पहिला घास तोंडात घेतला..🍝

अगदी मनापासून…..

Maggie !! I love you So Much❤


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

2 Responses

  1. Mrunal says:

    Hahahahahaha…Kay apratim lihalay…Mala adhi veglach vatala ..hheheeh pan nantar ti Maggie asel vatlach nahi

  2. Deepak says:

    Kharokhar lajavaab,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!