पपई जास्त खाण्याने उद्भवू शकतात हे पाच धोके

पपई खाणं चांगलं पण “या” 5 लोकांनी मात्र पपई चुकुनही खाऊ नये, यामागचं कारण समजून घ्या.

पपई मुळे ब-याच रोगात आराम मिळतो. पण तरीही पपई काही व्यक्तींचं नुकसान ही करू शकते.

पपई मध्ये असे काही घटक आहेत ज्यामुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो.

फळं खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो, आणि फळांमध्ये जर तुम्ही पपईची निवड केली तर तुम्हांला चिक्कार फायदे मिळतात.

कारण पपईत फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात.

वजन कमी करण्यासाठी पपई उत्तम पर्याय ठरतेच, त्याचबरोबर काही आजारांत पपई फायदेशीर ठरते.

काही वेळेला मात्र पपई खाणं फारच त्रासदायक ठरतं. अशा कोणत्या अवस्था आहेत जेंव्हा पपई बिल्कुल खायची नाही तेच आज आपण समजून घेऊया.

पपई खाणं कुणी टाळावं

1) प्रेग्नेंट महिलांनी पपई खाऊ नये.

हे तर आपण नेहमी ऐकलेलं असतं की गर्भवतीने पपई खाऊ नये. पण त्यामागे कारण काय ?

पपईत लॅटेक्स आणि पॅपिन असतं, ज्यामुळं गर्भाशय संकुचित होतं.

पपई खाल्ली तर गर्भवती महिलांच्या लेबर पेन्स वेळेआधी सुरु होण्याची शक्यता असते.

गर्भाला सहारा देणारा पडदा पपईमुळे कमकुवत होतो, म्हणून गर्भवती महिलांना नेहमी पपई न खाण्याचा सल्ला दिला जातो.

2) हृदयरोगी

ह्रदय विकाराचा त्रास झाला तर पपई चांगले रिझल्ट देते हे तुम्ही ऐकलं असेल.

मात्र आधीपासून तुम्ही ह्रदय रोगी असाल तर पपईला हात लावू नका.

पपईत काही प्रमाणात साइनोजेनिक ग्लाइकोसाइड असतं. याच्याबरोबर एमिनो एसिड मिळालं तर पचनाच्या मार्गात हाइड्रोजन साइनाइड तयार होतं.

त्यामुळं ह्रदयरोगाची व्याधी जुनी असेल तर पपईचं सेवन करू नका.

3) लॅटेक्स ॲलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी पपई खाऊ नये.

लॅटेक्स ॲलर्जी म्हणजे नैसर्गिक रबराची किंवा फळातील काही घटकांची ॲलर्जी. हा त्रास तुम्हांला होत असेल तर तुम्ही नेहमी पपई पासून दूर रहा.

पपईतील चिटिनासेस नावाच्या एंजाइममुळे बॉडीत मध्ये क्रॉस-रिएक्शन तयार होते.

त्यामुळं अशा लोकांनी पपई टाळलेलीच बरी.

4) किडनी स्टोन

पपईत असणारं व्हिटॅमिन सी, आणि त्यातलं अँटीऑक्सीडेंट किडनी स्टोनमध्ये गुंतागुंत वाढवतात.

ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी व्हिटॅमिन सी चं अती सेवन केलं तर किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो.

5) हायपोग्लाईसमा असणारे रुग्ण

अनेक वर्षे डायबेटिसचा उपचार घेणा-या मधुमेही व्यक्तींना हायपोग्लाईसमाचा त्रास उद्भवतो.

खरं तर डायबेटिस पेशंटना पपई लाभदायक असते कारण ती शुगर कंट्रोल करते.

पण तरीही मधुमेही लोकांनी प्रमाणातच पपई खाल्ली पाहिजे, नाहीतर त्यांना हायपोग्लाईसमाचा त्रास होऊ शकतो.

अवीट गोडीची पपई प्रत्येकाला आवडतेच. मात्र ज्यांना या पपईमुळे त्रास होऊ शकतो त्यांनी पपई पासून दूर राहिलेलचं बरं.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय