नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत। आसनांची माहिती चित्रांसह

तसं पाहिला गेलं तर वर्षभरात मृत्युमुखी पडणा-या लोकांमधले लाखो लोक हे केवळ किडनी विकाराने मृत्यू पावतात.

तुम्हांला माहिती आहेच डायबेटिस आणि ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींमध्ये किडनी खराब होण्याचं प्रमाण जास्त असतं.

खराब झालेल्या किडनीला कोणतंही औषध नाही. मात्र योगासनांच्या मदतीने तुम्ही किडनीचं कार्य सुधारु शकता.

किडनी हा आपल्या शरीरातला महत्वपूर्ण अवयव आहे.

रक्तशुद्धी आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे ही कामं किडनीद्वारे केली जातात.

डायबेटिसचा आणि हायब्लडप्रेशरचा किडनीवर मोठा प्रभाव पडतो.

त्यावर योगासनांच्या मदतीने मात करता येते.

किडनी निरोगी सुदृढ राखण्यासाठी, करता येणारी ही आसनं झोपूनही करता येतात.

किडनीला सशक्त बनवणा-या योगासनांच्या मदतीने शरीराला रिलँक्स करता येतं.

ही योगासनं पोटातल्या स्नायूंना बळकटी देतात.

ज्यामुळं किडनी रिलँक्स होऊन एनर्जेटीक बनते, आणि किडनीचं कार्य विनासायास सुरू रहातं.

1) भुजंगासन

भुजंगासन झोपून करता येण्यासारखं सोपं आसन आहे.

या आसनाच्या सरावामुळे तुमच्या पोटातील अवयव सक्रिय होतात.

प्रतिकारशक्ती वाढवणारं असं हे भुजंगासन नेमकं करायचं कसं ? चला जाणून घेऊया.

भुजंगासन करण्यासाठी योगा मँटवर पालथं पडा. हात खांद्याच्या रेषेत जमिनीवर पालथे ठेवा.

हळूहळू मान मागे वळवून पोट उचलून घ्या. काही वेळ याच स्थितीत रहाण्याचा प्रयत्न करा.

आसन हळूहळू सोडा आणि रिलँक्स व्हा.

bhujangasan भुजंगासन

2. सलंब भुजंगासन (Sphinx Pose)

सलंब भुजंगासन एका प्रकारे भुजंगासनासारखंच आहे.

या आसनाच्या नियमित सरावाने किडनीसह पोटातले स्नायू सुदृढ आणि निरोगी बनतात.

भुजंगासनाप्रमाणे सलंब भुजंगासनाच्या नियमित सरावानं तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता

सलंब भुजंगासन कसं करायचं

सलंब भुजंगासन करण्यासाठी, योगा मँटवर पोटावर पालथं झोपा.

नंतर भुजंगासनाप्रमाणे पाय मागे वळवा.

आता दोन्ही तळवे खांद्यासमोर जमिनीवर ठेवा यानंतर, शरीराला शक्य तितके मागे उचलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही काळ या स्थितीत राहावे लागेल आणि दीर्घ श्वासही घ्यावा लागेल.

salamba bhujangasan सलंब भुजंगासन

तर अशा प्रकारे योगासनांच्या. मदतीने तुम्ही किडनी निरोगी ठेऊ शकता.

शून्य खर्चात सुधारा शरीराची ठेवण, घरच्या घरी करा हे व्यायाम | आसनांची चित्रासहित माहिती

या योगासनांच्या मदतीने दूर करा ऍसिडिटी । सर्व आसने पहा चित्रांसह

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय