हे सहा वास्तू शास्त्राचे नियम तुमच्या घरात धन-समृद्धी वाढवतील

vastu shastra for money in marathi

संपत्ती मिळवण्यासाठी, घरात सकारात्मक बदल करण्यासाठी काही वास्तु विषयक टिप्स

पैसा किंवा साधनसंपत्ती हे काही सर्वस्व नाही असे म्हटले जाते. ही गोष्ट जरी खरी असली तरी आपण हे ही मान्य केले पाहिजे की या जगात पैसा महत्वाचा आहे कारण आपल्या दररोजच्या जगण्याला पैसाच आवश्यक आहे. काहीही झालं तरी “पैसा बोलता है“ हेच खरं.

चांगल्या प्रकारची जीवनशैली मिळवण्यासाठी तसेच आपल्या कुटुंबीयांना आरामदायक जीवन देण्यासाठी पैसा मिळवणे महत्त्वाचे असतेच.

भारतीय जीवन पद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व आहे. वास्तूतील स्पंदने तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात, असे बऱ्याच अंशी मानले गेले आहे.

बऱ्याच लोकांचा वास्तुशास्त्राचा अभ्यास असतो आणि त्या शास्त्रानुसार असे सिद्ध झाले आहे की वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदित तर ठेवतेच शिवाय घरामध्ये येणाऱ्या धन, संपत्ती, पैसा यामध्ये वाढ देखील करू शकते.

आपण रहात असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी या विषयातील तज्ञ लोकांकडून काही मार्गदर्शन केले जाते. असे कोणते उपाय आहेत ते आज आपण पाहू या.

१. उत्तर दिशा ही धनसंपत्तीचा मालक असणाऱ्या कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेचा शासक कुबेर आहे अशी मान्यता आहे.

त्यामुळे या दिशेच्या शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसे, संपत्ति ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे. ह्या लॉकरचे किंवा कपाटाचे दार उत्तर दिशेला उघडेल अशी रचना असावी.

तसेच घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्यावा. घरातील पूर्व, उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी त्यामुळे सकारात्मक लहरी मध्ये कोणताही अडथळा न येता घरात भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते.

२. घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरात प्रवेश करते. त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असू नये. घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणतेही देवाचे चित्र असावे. तसेच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणतीही अडगळ नसणारे आणि सुशोभित केलेले असावे. घराच्या प्रवेश द्वाराला उंबरा जरूर असावा. प्रवेशद्वाराजवळ तुळस किंवा एखादे फुलांचे झाड असावे. अशी झाडे सकारात्मक स्पंदने पकडून ती घराकडे प्रस्थापित करतात. त्यामुळे अशा झाडांचे दारात असणे शुभ मानले जाते.

३. घरामध्ये मनी प्लांट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. ते घरात उत्तर दिशेच्या कोपर्‍यात असावे. तसेच घरात निरनिराळ्या फुलांच्या फुलदाण्यांचे सुशोभीकरण केलेले असावे. यामुळे वास्तूमध्ये शुभ स्पंदने निर्माण होतात.

४. घरातील एखादा नळ गळत असणे हे हळूहळू वित्तीय हानी होत असल्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे घरातील सर्व नळांची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी.

५. घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे ठेवणे शुभ मानले जाते. घरात अशा प्रकारचा पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत असतात.

६. करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी, उडणारे विमान, रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शवणारे पेंटिंग शुभ मानले जाते.

७. पाण्यात ठेवलेले धातूचे कासव, बुद्धांची मूर्ती किंवा गणपतीची बसलेली मूर्ती घराला स्थिरता देतात तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात. तसेच घरात शांतता आणि आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास मदत करतात. अशा मूर्ती घरात जरूर ठेवाव्यात.

तर या आहेत काही वास्तु विषयक टिप्स ज्यामुळे आपण आपल्या घरात भरपूर धनसंपत्ती कशी येईल यासाठी प्रयत्न करु शकतो. तुम्हाला तुमच्या वास्तूबद्दल आणखी काही शंका असतील तर वास्तुविषयक तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. काही छोट्या छोट्या उपायांनी वास्तुदोष घालवणे सहज शक्य असते.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख जरुर शेअर करा. तसेच तुम्हाला माहित असलेल्या वास्तुविषयक टिप्स आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Manachetalksसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!