बेंबीत (नाभीत) हळद लावल्यामुळे या 5 फायद्यांचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

बेंबीत (नाभीत) हळद

बेंबीत (नाभीत) हळद लावल्यामुळे या 5 फायद्यांचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

कधी आणि कशा प्रकारे या हळदीचा वापर करायचा चला आज जाणून घेऊया.

हळदीचे बरेच औषधी उपयोग तुम्हांला माहिती असणारच.

आरोग्यासाठी आहारात, त्वचेसाठी फेसपँकमध्ये हळदीचा वापर नेहमी केला जातो.

त्याचबरोबर बेंबीत (नाभीत) हळदीचा लेप लावल्यामुळेसुद्धा खूप फायदे होतात.

या उपायामुळं ब-याच आजारांपासून दूर राहता येतं.

हळद औषधी असते. तिच्यात कॅल्शियम, फॉस्फरस, सोडिअम, पोटँशिअम आणि आयर्न सारखी महत्वाची पोषक तत्वं असतात.

अँटीबँक्टेरियल, अँटी इंफ्लेमेटरी गुणांनी युक्त हळद पचनशक्तीपासून त्वचेच्या समस्येपर्यंत प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडते.

पण कदाचित तुम्हांला बेंबीत (नाभीत) हळद लेप लावल्यानं काय फायदे होतात याची माहिती नसेल, तर आज हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

1) इंफेक्शनपासून बचाव.

हळदीत अँटीबँक्टेरियल, अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात जे हिवाळ्यात होणाऱ्या व्हायरल आजारांवर मात करायला तुम्हांला मदत करतात.

हळद आणि मोहरीचं तेल एकत्र करून नाभीवर लावलं तर अनेक आजारांपासून बचाव होतो.

हळदीच्या या लेपामुळे सर्दी खोकल्यापासून लवकर सुटका होते.

2) पचनशक्ती वाढवायला लाभदायक

परीपूर्ण आरोग्यासाठी पचनक्रिया व्यवस्थित सुरू असणं गरजेचं आहे.

तुमच्या आहाराचं पचन जर व्यवस्थित झालं नाही तर अनेक आजारांना आमंत्रण मिळतं.

हळदीमध्ये फायबर असतं ज्यामुळं आहाराचं पचन सुरळीत होतं.

तुम्हांला जर कधी अपचनाचा त्रास जाणवला तर बेंबीत (नाभीत) हळद लावून पहा, लगेचच फरक जाणवेल.

3) मासिकपाळीच्या वेदनेतून आराम

महिलांना मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटात वेदना होत असतात.

या वेदनेमुळे हे दिवस काही महिलांसाठी जीव नकोसा करतात.

काहीवेळा पोटात मुरड पडूनही पोट दुखतं. अशावेळी महिलांनी बेंबीत (नाभीत) हळदीचा लेप लावावा.

या उपायामुळे मासिक पाळीतल्या वेदनांपासून सुटका होईल.

4) पोटात सूज आली किंवा घाव बसला असेल तर हळदीचा वापर करा.

बद्धकोष्ठतेमुळे पोटात वेदना होत असतील किंवा पोटात सूज आली असेल, तर हळदीत थोडसं खोबरेल तेल मिसळून बेंबीत (नाभीत) लावा.

यामुळं पोटातली सूज कमी होऊन तुम्हांला आराम मिळेल.

याशिवाय पोटावर किंवा बेंबीच्या आसपास काही जखम झाली असेल तर बेंबीलाही (नाभीला) ही हळदीचा लेप लावा.

या उपायामुळं जखम लवकर भरून यायला मदत होईल.

5) रोगप्रतिकारकशक्ती बळकट व्हायला मदत होते.

हळदीत अँटीऑक्सीडेंट आणि अँटीबँक्टेरियल गुण सामावलेले असतात जे आजारांशी दोन हात करतात, आणि तुमची प्रतिकारशक्ती बळकट करतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचा उपयोग करताना रात्री झोपताना बेंबीत हळदीचा लेप आवर्जुन लावा.

वजन कमी करण्यासाठी ही बेंबीत (नाभीत) हळद लावण्याचा उपाय करता येतो

कोणत्या कोणत्या वेळी आपण बेंबीत हळद लावू शकतो हे पाहिलं, आणि आता महत्वाची गोष्ट जाणून घेऊया की ही हळद लावायची कशी?

तर हा उपाय करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या साठी थोडासा वेळ मात्र हवा. कारण असे नैसर्गिक किंवा घरगुती उपाय हे, वेळ नाही या कारणामुळे करायचे राहून जातात.

साधारण 1 ते 2 तास मोकळा वेळ हातात असेल तर हळदीच्या लेपाचा उपाय तुम्ही करू शकाल.

कारण हळदीचा लेप लावून तो वाळायला एक ते दोन तास तरी द्यायला हवेत, तरच शरीराकडून हळदीचे सगळे गुण शोषले जातील.

जर हळदीत असणाऱ्या सगळ्या औषधी गुणांचा फायदा करून घ्यायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी बेंबीत (नाभीत) आठवणीने हळद लावावी.

समजा तुम्ही दिवसा हळदीचा उपयोग करणार असाल तर एक दोन तासाचा मोकळा वेळ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.

कारण बेंबीत (नाभीत) हळद लावल्यानंतर तो लेप तिथं टिकण्यासाठी तुमचं शरीर आडव्या स्थितीत असणं गरजेचं आहे.

हळदीचा लेप लावून तुम्ही कामं करु शकणार नाही कारण जसाजसा तो लेप वाळेल तसतसा तो खाली पडायला सुरवात होईल.

त्यामुळं हळदीचा लेप बेंबीत (नाभीत) लावताना झोपण्याची स्थिती आवश्यक आहे.

मोहरीच्या किंवा खोबरेल तेलात हळद मिक्स करून या लेपाचे गुण तुम्ही आणखी वाढवू शकता.

कधीतरी थंडीनं किंवा इतर काही कारणानं पोटात दुखत असेल तर हळदीचा लेप लावून हलक्या हातानं मालिश करा फरक तुमच्या लगेच लक्षात येईल.

हळदीचा लेप बेंबीत (नाभीत) लावल्यामुळं बरेच फायदे होतात हे आता तुमच्या लक्षात आलं असेल, तर तुम्ही सुद्धा या लेपाचा वापर करून बघा, आणि तुमच्या मित्रमंडळीना सुद्धा याचे फायदे नक्की सांगा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

3 Responses

  1. जयंत बुवा says:

    उत्तम माहिती दिली धन्यवाद!

    • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

      मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      मनाचेTalks फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalks/

      मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

  2. suvarna gurav says:

    हळदीचे लोणचे खाल्ले तर चालेल का

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!