डोक्यावरील केस दाट होण्यासाठी ही दोन आसनं करा | सर्व आसनांची चित्रांसहित माहिती

yoga asanas for hair growth

केस गळती सुरु झाली की प्रत्येकाचा जीव हळहळतो. तुम्ही त्यावर अनेक उपाय करून बघता.

मात्र कोणताही उपाय काम करत नाही, तेंव्हा तुम्ही हतबल होता.

स्त्री असो की पुरुष दोघांनाही आपले केस घनदाट असावेत असंच वाटत असतं.

आजच्या या प्रदूषणामुळे, धावत्या आयुष्यामुळे केस प्रचंड प्रमाणात गळतात.

अगदी लहान मुलांच्यातसुद्धा ही केसगळती आता दिसून येते.

व्यस्त जीवनशैलीतला व्यायामाचा अभाव ह केसगळतीमागचं एक प्रमुख कारण आहे.

पुरेसा व्यायाम नसल्यामुळे शरीरातला रक्तप्रवाह सुरळीत नसतो, त्यामुळे होतं काय की केसांच्या मुळांना हवं ते पोषण मिळत नाही यामुळं हळूहळू टक्कल पडायला सुरुवात होते.

नियमित व्यायाम हा शरीर आणि मनाबरोबरच केसांना ही फायदेशीर ठरतो.

योगासनांचा अभ्यास नैसर्गिकरित्या अनेक समस्या दूर करतो.

केस गळणं, टक्कल पडणं थांबवणं यासाठी तर फक्त एकच आसन प्रभावी पद्धतीनं काम करतं

केसगळती साठी जे आसन आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत त्याच्या नियमित सरावानं केसांची मुळं मजबूत होतील, केसांच्या वाढीचा वेग सुधारेल, गळून गेलेल्या केसांच्या ठिकाणी नवे केस येतील.

1) सर्वांगासन 

सर्वांगासन हे ते आसन आहे ज्यानं टक्कल कमी होतं त्याचबरोबर मानसिक ताण कमी होतो.

मेंदूला ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा करुन शरीरातला रक्त प्रवाह सुरळीत करणारं सर्वांगासन कसं करायचं? चला पाहुया.

1) योगामँटवर झोपा

2) दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना जोडा

5) पाय इतके वर उचला की शरीराचा भार खांद्यावरती पडावा.

6) काही वेळ या स्थितीत राहून पाय सावकाश खाली घ्या.

Sarvangasana

2) सेतुबंधासन

या आसनामुळे ही मेंदूतला रक्तप्रवाह उत्तम पद्धतीने चालतो.

त्यामुळे केसांना मजबुती मिळते.

केसांबरोबर हे आसन पोट आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवतं.

1) सेतुबंधासन हे आसन करण्यासाठी योगा मँटवर पाठीवर झोपा. पाय गुडघ्याशी दुमडून जमिनीला समांतर ठेवा.

2) त्यानंतर हातावर जोर देऊन पोट आणि मांड्या उचला.

3) दीर्घ श्वास घ्या आणि बाहेर सोडा. काही वेळ या स्थितीत राहून सावकाश आसन सोडा.

4) सेतुबंधासन हे आसन करताना यातली शरीरस्थिती एखाद्या पूलासारखं दिसते. म्हणून या आसनाच नाव सेतू बंधासन.

काही वेळ या स्थितीत राहिल्यानंतर हळूहळू पुर्व स्थितीत येऊन रिलँक्स व्हा.

setubandhasana

तर मित्रांनो आणि मैत्रीणींनो महागडे शाम्पू, तेल किंवा हेअर ट्रीटमेंटपेक्षा आपल्या केसांचं आयुष्य वाढवण्यासाठी घरच्या घरी सहज रित्या करता येणारी योगासनं नियमित करा.

अशा साध्या सोप्या पण प्रभावी टीप्स जाणून घेण्यासाठी मनाचे Talks पेजला नियमित भेट ही द्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!