रिकाम्या पोटी सफरचंद खाण्याचे फायदे

रिकाम्या पोटी सफरचंद खाण्याचे फायदे

सफरचंद खाण्याचे प्रचंड फायदे आहेत. रोज एक सफरचंद तुम्हांला डॉक्टरांपासून दूर ठेवतं या म्हणण्यात तथ्य आहे. म्हणजे काय तर सफरचंद तुम्हाला निरोगी बनवतं, स्ट्रॉंग बनवतं.

खरतर सफरचंद रिकामे पोटी खाण्याचे सुद्धा भरपूर फायदे आहेत.

जसं की रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते.

सफरचंदात अशी काही पोषण तत्वं असतात जी दम्याशी लढायला मदत करतात.

आणखीनही बरेच फायदे आहेत जे सफरचंद रिकाम्यापोटी खाल्ल्यामुळे मिळतात त्याविषयीच आज जाणून घेऊया

सफरचंद खाताना या गोष्टी लक्षात ठेवा.

सफरचंद नेहमी सालीसकट खा. खाताना खळाळत्या पाण्यात व्यवस्थित धुवून खा. कीटकनाशकांचा एखादा थर त्यावर असू शकतो. त्यामुळेचं स्वच्छ धुऊन सफरचंद सालीसकट खाणं योग्य ठरतं.

काही जणांना सफरचंदांची किंवा त्यातील तत्त्वांची ऍलर्जी असू शकते अशा लोकांनी सफरचंद खाणं टाळावं.

ज्यांना ऍलर्जी आहे अशांनी सफरचंद खाल्लं तर गळा किंवा चेहऱ्यावरती खाज सुटते. गळा सुजतो.

पोट बिघडतं. शरीरावर बारीक बारीक पुरळ उठतात किंवा पित्ताची लक्षणं दिसतात. किंवा लूज मोशन होऊ शकतात.

सपरचंद खाताना साल जर काढून टाकलं तर बरीच पोषकतत्वं निघून जातात.

हां, अगदी लहान बाळ किंवा वयस्कर व्यक्तींना सफरचंद देताना त्याची सालं काढून मधला गर देऊ शकता.

सफरचंद खाणं तुम्हांला मनापासून आवडत असेल आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला हवा असेल तर रिकाम्यापोटी सफरचंद खायचा प्रयत्न करा.

रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यामुळं वजनावर सुद्धा तुम्ही कंट्रोल करू शकता.

सफरचंद रिकाम्या पोटी खाल्यानं त्यातील पौष्टिकतेचा जास्तीत जास्त भाग तुमचं शरीर शोषून घेऊ शकतं.

दातदुखी असेल तर साली सकट सफरचंद खाऊ नका.

या सालींचे तुकडे दातांमध्ये अडकून जास्त दातदुखी वाढण्याची शक्यता असते.

अनेक प्रकारची फळं रिकाम्या पोटी जर खाल्ली तर त्याचे बरेच फायदे तुम्हाला मिळू शकतात.

सफरचंदाच्या बाबतीतही सेम घडतं. रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यानंतर पोट व्यवस्थित भरतं आणि बराच काळ भूकही लागत नाही त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते

1) वजन कमी करायला मदत मिळते.

सफरचंदामुळे वजन कसं कमी होईल याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल.

रिकाम्या पोटी जेव्हा सफरचंद खाता तेव्हा सफरचंद पचायला जरा जास्त वेळ लागतो.

सफरचंदात 23 ग्रॅम साखर आणि 13 ग्रॅम फ्रुक्टोज असतं. त्यामुळे बराच वेळ पोट पोट भरल्याची भावना तुम्हांला जाणवते.

सफरचंद जेवणाआधी किंवा जेवणानंतर जर खाल्लं तर त्यातील पोषक तत्वांचा म्हणावा तितका लाभ तुम्हांला मिळत नाही.

म्हणूनच रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी भरपूर फायदे त्यातून तुम्हांला मिळतात.वजन कमी व्हायला मदत होते.

how many calories in an apple?

2) पोषक तत्त्वांनी युक्त सफरचंद

सफरचंदात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट व्हिटॅमिन्स आणि फायबर बरोबरच आणखीन बरेच काही पोषक घटक असतात.

रिकाम्या पोटी तुम्ही जेव्हा सफरचंद खाता तेंव्हा शरीर या पोषक घटकांना पटकन शोषून घेतं.

सफरचंद तुमच्या शरीराला आवश्यक न्यूट्रीअंसची कमतरता दूर करतं.

मध्यम आकाराच्या सफरचंदातून फायबर आणि व्हिटॅमिन सी बरोबरच पोटॅशियम चा सुद्धा लाभ मिळतो.

3) सफरचंदात असणारे पोषक घटक आणि त्यांचा शरीराला होणारा फायदा.

i) सफरचंदामध्ये असणारं फायबर ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं.

ज्यामुळे हृदयरोगाचा धोका बराचसा कमी होतो. सामान्यपणे एका व्यक्तीला दिवसभरात 13 ते 20 टक्के फायबर ची गरज असते

ii) व्हिटॅमिन सी

सफरचंदात मिळणारे व्हिटॅमिन सी हृदयरोगाचा धोका कमी करतात, त्याचबरोबर शरीराला वेगवेगळ्या संसर्गापासून वाचवतात आणि बऱ्याच आजारापासून दूर ठेवतात.

नॉर्मल व्यक्ती ला दिवसातून 9 ते 11% व्हिटॅमिन सी ची गरज असते

iii) पोटॅशियम

सफरचंदामध्ये मिळणारे पोटॅशियम रक्तवाहिन्यांना आराम देतं. हाय ब्लडप्रेशर आणि ह्रदयासंबंधी आजारापासून दूर ठेवतं.

iv) अँटिऑक्सिडंट्स

सफरचंदात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे, ते कर्करोगासारख्या रोगांचा प्रभाव कमी करतं, आणि शरीराला ऑक्सिजनच्या कमतरतेपासून वाचवतं.

v) फ्लेव्होनॉइड क्वेर्सेटिन

सफरचंदाच्या सालीमधलं फ्लेव्होनॉइड क्वेर्सेटिन हे पोषक तत्वं शरीरातील जळजळ कमी करायला मदत करतं या पोषक घटकामुळं पक्षाघाताचा धोका कमी होतो.

4) रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त

सफरचंदात व्हिटॅमिन ‘सी’ असल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.

जर तुम्ही सफरचंदाचे योग्य प्रमाणात सेवन केले तर ते मधुमेहाच्या रुग्णांसाठीही उपयुक्त ठरू शकते.

रिकाम्या पोटी सफरचंद खाण्याचे फायदे आज तुमच्या लक्षात आले आहेत, तर जेंव्हा शक्य होईल रिकाम्या पोटी सफरचंद खा आणि आरोग्याला फायदा मिळवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!