मुदतीआधी होम लोनचे प्रीपेमेंट करण्याचे फायदे आणि तोटे

मुदतीआधी होम लोनचे प्रीपेमेंट करणे (मुद्दलातील काही रक्कम मुदती आधी भरणे) कितपत योग्य आहे?

जाणून घेऊया मुदतीआधी होम लोनचे प्रीपेमेंट करण्याचे फायदे आणि तोटे

बहुतेक सर्व नोकरदार मध्यमवर्गीय मंडळी होम लोन घेऊनच घर खरेदी करतात. त्या होम लोनची परतफेड दर महिन्याला ठराविक रक्कम (ई.एम.आय) बँकेला परत देऊन केली जाते.

दर महिन्याचा जो ठराविक हप्ता असतो त्यामधील काही भागातून मुद्दलाची परतफेड होते तर उर्वरित भाग हा घेतलेल्या कर्जावरचा व्याजाचा भाग असतो.

दर महिन्याला हप्ते भरल्यामुळे मुद्दल हळूहळू कमी होते. त्यामुळे त्यावर लागणारे व्याज हळूहळू कमी होऊन दर महिन्याच्या हप्त्यातील मुद्दलाचा भाग वाढून व्याजाचा भाग कमी होत जातो. परंतु अर्थात हे सर्व कर्जाच्या मुदतीवर अवलंबून असते.

त्यामुळे कर्जाच्या परतफेडीसाठी जर आपण संपूर्ण मुदत वापरली म्हणजेच जर वीस वर्ष मुदतीने होम लोन घेतले असेल आणि संपूर्ण वीस वर्ष ते होम लोन फेडण्यासाठी वापरली तर भरावे लागणारे व्याज हे जवळजवळ मुद्दलाच्या रकमे इतकेच होते.

या पार्श्वभूमीवर आज आपण मुदती आधी होम लोनच्या मुद्दलातील काही भाग बँकेला परत केला तर काय फायदे अथवा तोटे होतात ते पाहणार आहोत.

म्हणजेच दर महिन्याच्या पगाराव्यतिरिक्त एखादी मोठी अमाऊंट जर आपल्या हातात असेल, तर ती वापरून आपल्या वरील होम लोनचा बोजा कमी करावा की ती रक्कम दुसऱ्या एखाद्या पद्धतीने गुंतवावी याचा आपण आज विचार करणार आहोत.

यासाठी सर्वप्रथम आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरण दिलेल्या व्यक्तीचे नाव गोपनीयतेसाठी बदलले आहे.

३२ वर्षीय रतन कुमार सिंह यांचे सध्या रु. ५० लाख इतके होम लोन असून परतफेडीची मुदत २० वर्षे इतकी आहे.

त्यांना लागू होणारा व्याजाचा दर १० % इतका असून त्यानुसार त्यांना दरमहा रु. ४८०००/- एवढा इ.एम.आय भरावा लागतो.

त्यांना दरमहा हातात मिळणारा पगार रु. १ लाख इतका असून नुकतेच त्यांना बोनसपोटी रु. ५ लाख मिळाले आहेत.

दरमहा मिळणार्‍या पगारातून जवळजवळ निम्मी रक्कम ईएमआय भरण्यात जात असल्यामुळे श्रीयुत सिंह यांना इतर कोणतेही खर्च करण्यासाठी पैसे कमी पडतात.

एखादी ट्रिप, मनोरंजनासाठी खर्च करणे त्यांना अवघड जाते. तसेच भविष्याची तरतूद करण्यासाठी काही गुंतवणूक करण्यास देखील त्यांच्याकडे पैसे उरत नाहीत.

जरी त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता असली तरी त्यावरील कर्जामुळे त्यांच्या पगाराचा बराचसा भाग व्याजापोटी भरला जातो.

आता श्री. सिंह यांच्यासमोर असा प्रश्न आहे की मिळालेली बोनसची रक्कम होम लोनचे मुद्दल कमी करण्यासाठी वापरावी, की त्या रकमेतील काही भाग सहल इत्यादी मौजमजेसाठी वापरून काही भाग भविष्यासाठी योग्यप्रकारे गुंतवावा?

आपण तज्ञांच्या मदतीने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया….

एका गुंतवणूक विषयी फर्मचे सीईओ असणारे, राजेंद्र जोशी यांच्या मते काही लोकांच्या दृष्टीने आपल्याला मिळणारी संपूर्ण अतिरिक्त रक्कम होम लोनच्या मुद्दलाचा भार कमी करण्यासाठी वापरून टाकणे तितकेसे योग्य नसून अशी अतिरिक्त उपलब्ध असणारी रक्कम गाडी खरेदी, एखादी परदेशवारी किंवा मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने गुंतवणूक यासाठी वापरावी.

असेच बरेच लोकांचे मत असते. त्याउलट काही लोकांना आपल्या घरावर कर्ज असणे भावनिकदृष्ट्या मान्य नसते. लवकरात लवकर आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा उतरवून टाकावा असे या लोकांचे मत असते असे लोक पगाराव्यतिरिक्त मिळणारी कोणतीही घसघशीत रक्कम होम लोनचे मुद्दल कमी करण्यासाठी वापरतात.

परंतु केवळ भावनात्मक रीत्या विचार न करता प्रत्यक्ष आकडेमोड करून या दोन्ही पैकी फायद्याचे काय आहे ते आपण पाहूया.

१. कर्ज घेतलेल्या व्यक्तीने सर्वप्रथम त्याला भराव्या लागणाऱ्या व्याजाच्या रकमेचा विचार करावा. जर भरावी लागणारी व्याजाची रक्कम भरमसाठ असेल तर त्या व्यक्तीने मुद्दल कमी करण्याकडे जरूर लक्ष द्यावे.

कारण मुद्दल कमी न करता जर आपल्याकडे उपलब्ध असणारी अतिरिक्त रक्कम फिक्स करून ठेवली तर मिळणारे व्याज आणि होम लोन वर आपण भरत असणारे व्याज यामध्ये निश्चितच फरक असतो. अशावेळी मुद्दल कमी केल्यामुळे भरावे लागणारे व्याज कमी होऊन फायदा होतो.

२. होम लोनचे मुद्दल आणि त्यावर भरावे लागणारे व्याज या दोन्हीचा इन्कम टॅक्स मध्ये फायदा होतो. इन्कम टॅक्सच्या कलम ८० C च्या अंतर्गत होम लोन मधील मुद्दलाच्या रकमे पैकी रु. १.५ लाख इतकी वजावट करदात्याला थेट मिळते. तसेच इन्कम टॅक्सच्या कलम २४ अंतर्गत भराव्या लागणाऱ्या व्याजापैकी रुपये २ लाख इतकी वजावट मिळू शकते जर करदाता स्वत: त्या घरामध्ये राहत असेल. जर करदाता त्या घरामध्ये राहत नसेल तर भरावे लागणारे संपूर्ण व्याज वजावट करून घेता येते. त्यामुळे होम लोनचे मुद्दल आणि व्याज या मुळे मिळणारी इन्कम टॅक्समधील वजावट जर फायदेशीर ठरत असेल तर होम लोन चालू ठेवणे काही वेळा फायद्याचे ठरू शकते. शिवाय हातात असणारी अतिरिक्त रक्कम इतरत्र गुंतवली जाऊन त्यावर व्याज मिळू शकते. या बाबीचा देखील सर्व करदात्यांनी जरूर विचार करावा.

जर होम लोनचे मुद्दल कमी करून पार्ट प्रीपेमेंट करण्याचा विचार केला असेल तर बँक आपल्याला दोन ऑप्शन्स देते. एक तर आपला हप्ता कमी होऊ शकतो किंवा लोन फेडण्याची मुदत कमी होऊ शकते.

हा निर्णय कसा घ्यावा?

वरील उदाहरणातील श्री सिंह यांनी समजा मिळालेल्या रकमेपैकी रुपये दोन लाख होम लोनच्या पार्ट प्रीपेमेंट साठी वापरले तर एक तर त्यांचा ई. एम. आय. रु. २०००/- कमी होईल किंवा त्यांच्या कर्जफेडीची मुदत २० वर्षांवरून १८ वर्षांवर येईल.

अशावेळी आपापल्या गरजेनुसार प्रत्येकाने हा निर्णय घेतला पाहिजे. काही लोकांना ईएमआय कमी केल्यामुळे हातात खर्चासाठी जास्त रक्कम उपलब्ध होईल तर काही लोकांना सध्या भरत असलेला ई एम आय परवडत असल्यामुळे कर्ज फेडण्याची मुदत कमी करून घेऊन कमी व्याज भरणे जास्त फायदेशीर ठरू शकेल.

यावरून आपल्या असे लक्षात येते की होम लोनचे मुदती आधी अंशतः प्रीपेमेंट करणे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून असते. आपल्याला मिळणारे दरमहा उत्पन्न, आपण करत असणाऱ्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज, आणि आपल्याला भराव्या लागणाऱ्या होम लोन वरील व्याज या सर्वांचा ताळमेळ घालून सर्वात जास्त फायदेशीर असणारे पर्याय आपण निवडले पाहिजेत.

यासाठी होम लोन घेतानाच आपल्या पुढील दहा वर्षांचे आर्थिक प्लॅनिंग करून इतर गुंतवणूक देखील करून कोणताही तोटा न होऊ देता लवकरात लवकर होम लोनचा बोजा कमी करण्याकडे सर्वांचा कल असला पाहिजे.

मित्रांनो, हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि या लेखातील माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “मुदतीआधी होम लोनचे प्रीपेमेंट करण्याचे फायदे आणि तोटे”

  1. आपण दिलेली माहिती मी वाचुन बघितली खूप छान वाटली.अशीच माहिती देत रहा.धन्यवाद

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय