प्लॅस्टिक आधार कार्ड अधिकृत नाही….

बऱ्याचदा आपल्याला मूळ कागदपत्रांची रंगीत झेरॉक्स करून, ते लॅमिनेट करून बरोबर बाळगायची आणि मूळ कागदपत्र घरी सुरक्षित ठेवायची सवय असते. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीची कागदपत्रं अशा महत्त्वाच्या गोष्टी हरवू नयेत म्हणून आपण हा मार्ग अवलंबतो पण सगळ्याच महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल असं करता येऊ शकत नाही हे यु.आय.डी.ए.आय.(UIDAI) तर्फे जाहीर करण्यात आलेल्या नविन सूचनेवरून समजते.

युनिक आयडेन्टिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इन्डिया अर्थात यु.आय.डी.ए.आय. ह्या आधारकार्ड देणाऱ्या संस्थेने नुकत्याच घोषित केलेल्या नविन नियमाप्रमाणे

  • जर तुम्ही पी.व्ही.सी. किंवा लॅमिनेटेड आधारकार्ड वापरत असाल तर ते अधिकृत सरकारी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही.

  • अशा प्रकारे आधारकार्डची प्रिंट घेताना त्यावर असणारा क्यू.आर. कोड चुकतो किंवा बदलतो आणि त्यामुळे क्यू.आर. कोड प्रणालीचा मूळ उद्देश बिनकामाचा ठरतो.

  • क्यू.आर.कोडद्वारे तुमची मूळ व खरी माहिती ओळखण्यास मदत होते आणि आधार कार्डवर असा योग्य क्यू.आर. कोड असणेच गरजेचे आहे.

  • म्हणून साध्या कागदावर छापण्यात आलेलेच आधार कार्ड योग्य आहे आणि तेच ग्राह्य धरले जाईल असे यु.आय.डी.ए.आय. चे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले.

असे मूळ आधार कार्ड झेरॉक्स करून, ते लॅमिनेट करून विक्रीचे काम करणारे दुकानदार किंवा दलाल ह्या कामाचे कोणाच्याही देखरेखीच्या अभावामुळे त्यांच्या मनाजोगते पैसे उकळतात. शिवाय, आधार कार्डचे असे प्लॅस्टिकीकरण करताना तुमच्या खाजगी माहितीचा गैरवापरही होऊ शकतो. त्यामुळे इतर कोणत्याही कागदपत्रासारखे आधारकार्डचे लॅमिनेशन न करता शासनाकडून प्राप्त झालेली मूळ प्रत वापरणेच सोयीचे ठरेल.

हे अधिकृत आहे –

१. साध्या कागदावर आधारकार्डची रंगीत किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट

२. एम.आधारकार्ड(mAadhar)

हे अधिकृत नाही –

१. पि.व्ही.सी. आधारकार्ड

२. लॅमिनेटेड आधारकार्ड

यु.आय.डी.ए.आय. ने जाहीर केलेले सुचना तुम्हीयेथेवाचू शकता.

तुमचे आधार कुठे वापरले गेलेले आहे हे माहीत करून घेण्यासाठी 👉 Aadhaar Authentication History बघा.

वाचण्यासारखे आणखी काही…..

शेअरबाजार- आक्षेप आणि गैरसमज
तूच आहेस तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार!
पैशाचा उड्डाणपूल बांधूया

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय