फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांचे उपयोग

फ्यूचर्स आणि ऑप्शन्स या विषयीची प्राथमिक माहिती आपण मागील काही लेखातून करून घेतली होती (लेखाच्या शेवटी मागील लेखांचा दुवा अभ्यासासाठी दिला आहे…) बाजारातील घटक विविध कारणांसाठी त्यांचा वापर सातत्याने करीत असतात. भांडवलबाजाराचा प्रसार आणि प्रभाव यामुळे होत असतो आणि अधिकाधीक गुंतवणूकदार येथे आकर्षित होतात. रोज कोट्यावधी रूपयांचे व्यवहार येथे होतात. यावर सरकार अत्यल्प कर आकारते. त्यातून कोट्यावधी रुपये सरकारला मिळत असतात. मोठ्या प्रमाणावर फ्यूचर्स ऑप्शन्सचे व्यवहार वित्तसंस्था ( त्यांना असलेल्या विहित मर्यादेतच), मोठें गुंतवणूकदार, सट्टेबाज यांच्याकडून केली जाते. किमान रकमेत जास्तीत जास्त फायदा मिळवणे हे गुंतवणूकदारांचे उद्दिष्ट असते. याशिवाय तोटा कमी करणे, फायद्याच्या संधी शोधणे हे हेतूही असू शकतात. एक वा अधिक तंत्रे स्वतंत्र अथवा एकत्रित वापरून या मधे काय केले की काय होवू शकते किंवा जोखीम व्यवस्थापन कसे होवू शकते, हे आपण पाहूयात.

यांच्याकडे फंड मॅनेजर असून त्याना मदत करण्यासाठी तज्ञ लोकांचीच टीम असते. हे लोक बाजारातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून असतात.

बाजारातील परिस्थिती पाहून, वेगवेगळे निकष वापरून ते अंदाज बांधत असतात. यासाठी फंडामेंटल / टेक्निकल एनालिसिसचा उपयोग त्यांना होतो. विविध सॉफ्टवेअर वापरून ते निष्कर्ष काढू शकतात. मालमत्तेची भविष्यातील किंमत ठरवण्यासाठी फ्युचर्सची निश्चित किंमत ठरण्याकरता ‘कॉस्ट टू कॅरी ‘ हे मॉडेल वापरले जाते. यात मालमत्तेची विद्यमान किंमत, ती संपादन करण्यास येणारा खर्च आणि यातून मिळू शकणारे उत्पन्न याचा विचार केला जातो. ऑप्शन्सची किंमत निश्चित करण्यासाठी ब्लेक शॉल फॉर्मुला वापरला जातो त्यात ऑप्शन्स प्रिमियम, कालावधी, मालमत्तेचा सध्याचा भाव, स्ट्राईक प्राईज, सामान्य व्याजदर, मिळू शकणारे उत्पन्न ई. अनेक गोष्टींचा उपयोग करतात. शक्यतो आर्बिट्रेशनची संधी मिळूच नये हा त्यांचा हेतू असतो. ही गुंतागुंतीची गणिती प्रक्रिया आहे. पण बाजार फक्त गणिती प्रक्रियेवर चालत नसल्याने विपरीत परिणामाने मोठे नुकसान होवू शकते. त्यामुळे काही लोक तंत्रज्ञानाच्या जोडीला व्यवहारज्ञानाचा वापर करतात. वॉल्युम आणि ओपन इंटरेस्ट, बिटा व्हॅल्यू याही लक्षात घ्याव्या लागतात. सर्वसाधारणपणे हे लोक फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांचा कसा वापर करतात ते पाहूयात.

फ्यूचर्स आणि ऑप्शन्स यांचा वापर

वित्तसंस्था, सट्टेबाज, मोठे गुंतवणूकदार यांचा बाजार वर जाईल असा अंदाज असल्यास – ते स्टॉक फ्युचर्स , इंडेक्स फ्यूचर्स , कॉल ऑप्शन्स ची खरेदी आणि पुट ऑप्शन्सची विक्री करतात. याउलट बाजार खाली जाण्याची शक्यता असल्यास फ्युचर्स, कॉल ऑप्शन्सची विक्री आणि पुट ऑप्शन्सची खरेदी करण्यात येते.

यांचे स्वतंत्र आर्बिट्रेजर असतात त्यांचे काम भावात असलेल्या फरकाचा फायदा करून घेणे एवढेच असते. संधी साधणे अशा अर्थाने संधीसाधू असतात. मोठे गुंतवणूकदार आर्बिट्रेशनसाठी फ्युचर्स ओव्हरप्राईज असल्यास स्पॉट मार्केटमधे खरेदी फ्युचर्सची विक्री करतात अथवा फ्यूचर्सचा भाव कमी असल्यास स्पॉट मार्केटमध्ये विक्री आणि फ्युचर्सची खरेदी करतात. फ्यूचर्स आणि ऑप्शन्स यांचा वापर करून भावातील चढ उताराचा धोका कमी करता येवू शकतो. यास हेजिंग असे म्हणतात यामुळे फायदा होत नसेल तरी नुकसान कमी होते. फायदेशीर नसलेली मालमत्ता विकता येते. यासाठी हेजर्स भावात मोठी चढ उतार होण्याची शक्यता असलेल्या मालमत्तेच्या फ्यूचर्सची विक्री करून किंवा पुट ऑप्शन्सची खरेदी करून यातील जोखीम बऱ्याच प्रमाणात कमी होवू शकते. बाजाराच्या एकंदर स्थिरतेसाठी गुंतवणूकदारांएवढीच सट्टेबाजांची गरज आहे. त्यामूळे गुंतवणूकदाराना जोखीम पत्करून फायदा मिळवण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

फ्यूचर्स आणि ऑप्शन्स हे व्यवहार गुंतागुंतीचे असून समजण्यास कठीण आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल आणि धाडस लागते मागील काही लेखातून याविषयी सोप्या भाषेत माहिती करून देण्याचा प्रयत्न मी केला तो कितपत यशस्वी झाला हे आपणच ठरवावे यातून प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचली असावी. यातील पहिला लेखभविष्यातील व्यवहार ( Futures Transactions) वाचून त्यातील संकल्पना स्पष्ट झाल्या तरच पुढील लेख समजणे सोपे जाईल. यातील एखादे वाक्य किंवा परीच्छेद समजला नसेल तर तो माझा दोष आहे. लक्षात आणून दिल्यास तो अधिक सोपा करून दुरुस्त करता येईल. यानिमित्ताने गुंतवणुकीच्या वेगळ्या पर्यायांची तोंडओळख आपणास करून देता आली. यासाठी केलेल्या पूरक वाचनाने मला अधिक माहिती मिळाली. माझ्या दृष्टीने ही मोठी जमेची आणि आनंददायी बाजू आहे.

फ्युचर आणि ऑपशन्स सम्बंधित इतर लेख :

ऑप्शनसंबंधी व्यव्हारातील शब्दावली
फ्यूचर्स मार्केटशी संबंधित शब्दावली
भविष्यातील व्यवहार ( Futures Transactions)
वायद्यांचे व्यवहार (Forward Transactions)
पर्याय व्यवहार (Options Trading)…….

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांचे उपयोग”

  1. धन्यवाद उदय पिंगळे…..तुम्ही सोप्या आणि नेमक्या शब्दात आणि थोडक्यात माहिती लिहीता ,त्यामुळे लेख वाचनीय होतात.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय