घरच्या घरी कसा काढायचा होम लोनचा ई. एम. आय.? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

कसा काढायचा होम लोनचा ई. एम. आय.

होम लोन घेताना कुठली बँक निवडावी? लोन घेताना इंटरेस्ट रेट साठी निगिशिएट कसे करावे? यासाठी ई. एम. आय. कॅल्क्युलेट करण्याची प्रार्थमिक माहिती तुम्हाला पाहिजे. त्यासाठीच आजचा हा लेख, आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी.

सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होम लोन शिवाय काही पूर्ण होत नाही. तसेच होम लोनचा इन्कम टॅक्स भरताना देखील फायदा होतो. त्यामुळे बहुतेक जण घर घेताना होम लोन घेण्याचा पर्याय निवडतात.

अशावेळी किती किमतीचे घर घ्यावे हे ठरवताना नक्की किती होम लोन घेणे आपल्याला परवडेल याचा विचार करणे आवश्यक ठरते.

बँकेकडून होम लोन घेतल्यानंतर त्याची परतफेड करण्यासाठी दरमहा ठराविक रक्कम म्हणजेच इ. एम. आय. बँकेला द्यावा लागतो. किती लोन घेतले असता किती ई. एम. आय. भरावा लागेल हा होम लोनच्या बाबतीतला अगदी कळीचा मुद्दा असतो.

घर निवडताना घराच्या किमतीच्या किती टक्के भाग आपल्याला लोन म्हणून मिळू शकेल आणि त्या लोनवर आपल्याला दरमहा नक्की किती ई. एम. आय. भरावा लागेल हे जर आपल्याला आधीच कळले तर निर्णय घेणे सोपे होऊ शकते.

आज आपण होम लोन वरील ई. एम. आय. नक्की कसा कॅल्क्युलेट करायचा हे जाणून घेणार आहोत.

ई एम आय किती असेल हे ठरण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. होम लोनच्या मुद्दलाची रक्कम, परतफेडीची मुदत आणि होम लोन वर लागणारा व्याजाचा दर.

हा व्याजाचा दर सुरुवातीलाच निश्चित केलेला असेल (फिक्स्ड इंटरेस्ट) की पुढे जाऊन कमी-जास्त होऊ शकतो (फ्लोटिंग इंटरेस्ट) यावर देखील ईएमआयची रक्कम अवलंबून असते.

लोन वरील ईएमआय कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन पद्धती आहेत. त्या खालील प्रमाणे…

१. फॉर्म्युला वापरून

आपल्या होम लोन वरील ईएमआय कॅल्क्युलेट करण्यासाठी खालील फॉर्म्युला वापरता येतो.

EMI = [ P * R * (1 + R ) ^ N ] / [ ( 1 + R ) ^ N – 1 ]

ह्या फॉर्म्युला मध्ये P म्हणजे मुद्दलाची रक्कम, R म्हणजे व्याजाचा दर आणि N म्हणजे होम लोनच्या परतफेडीची मुदत. आपल्या होम लोनचे हे सर्व डिटेल या फॉर्म्युला मध्ये घातल्यास दरमहा भरावा लागणारा इ. एम. आय. कॅल्क्युलेट करता येईल.

२. ई एम आय कॅल्क्युलेटर वापरुन

फॉर्म्युला वापरून त्यामध्ये आकडे भरून त्यांची आकडेमोड करून ईएमआय कॅल्क्युलेट करणे काही जणांना अवघड वाटू शकते. अशांसाठी हल्ली इंटरनेटवर वेगवेगळे तयार ई एम आय कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या इंटरनेट साईटवरील असे कॅल्क्युलेटर वापरून आपल्याला अगदी अचूक असा ई एम आय अगदी थोड्या वेळात काढता येऊ शकतो. होम लोन देणाऱ्या सर्व बँका आणि वित्तीय संस्था ह्यांच्या अधिकृत वेबसाईटवर असे कॅल्क्युलेटर उपलब्ध असतात. स्वतः फॉर्म्युला वापरुन ई एम आय काढण्यापेक्षा असे कॅल्क्युलेटर वापरणे सोपे तर असतेच परंतु अचूक उत्तर काढण्यासाठी उपयुक्त असते.

ईएमआय कॅल्क्युलेटर वापरण्याचे नेमके काय फायदे आहेत ?

१. कॅल्क्युलेटर वापरल्यामुळे आकडेमोड करून ईएमआय काढण्याचा वेळ वाचतो.

२. ही कॅल्क्युलेटर वापरायला अतिशय सोपी आणि कोणत्याही व्यक्तीला वापरता येतील अशी असतात.

३. ही कॅल्क्युलेटर कितीही वेळा, कुठूनही वापरता येतात.

४. होम लोनची रक्कम किंवा व्याजाचा दर बदलून पुन्हा पुन्हा कॅल्क्युलेशन करणे सोपे जाते. त्यामुळे नक्की किती लोन घ्यावे किंवा किती व्याजाचा दर आकारणारी बँक निवडावी हा निर्णय घेणे सोपे जाते.

५. सदर होम लोन घेतल्यामुळे आपल्यावर दरमहा नक्की किती आर्थिक बोजा पडणार आहे हे असे कॅल्क्युलेटर वापरल्यामुळे लोन घेण्याआधीच आपल्याला समजू शकते.

तर मित्र-मैत्रिणींनो अशाप्रकारे आपण होम लोन घेण्याआधीच आपल्याला नक्की किती ईएमआय भरावा लागेल हे कॅल्क्युलेट करू शकतो. या सुविधेचा नक्की लाभ घ्या आणि त्यानुसार आपल्या लोनची रक्कम निवडा.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!