करियरसाठी सॉफ्ट स्किल गरजेचे का आहे?

आयुष्यामध्ये तुमच्याकडे शिकत राहण्याची वृत्ती असेल तर कुठल्याही संकटावर करायला तुम्ही शिकताच.
हाच आशावाद अधोरेखित केला आरतीने तिने नेमकं काय केलंय चला जाणून घेऊया.
चासनळी गावात राहणारी आरती गाडे ही 21 वर्षाची तरुणी, वडील शेतकरी, एकमेव कमावते, महिन्याची कमाई जेमतेम आठ हजार रुपये.
अशा स्थितीत वडिलांना आरतीच्या शाळेची फी भरणं सुद्धा मुश्कील होतं…
त्यासाठी तिला बरेच वेळेला वर्गामध्ये शिक्षा सुद्धा करण्यात आली.
शाळेची फी कशीबशी भरू शकणारे तिचे वडील आरतीच्या कॉलेजसाठी पदरमोड करू शकतच नव्हते.
सुदैवानं तिच्या काकांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली.
आरती पदवीच्या तिसऱ्या वर्षाला असताना covid-19 ने जगभर धुमाकूळ घातला.
अशा परिस्थितीत आरतीची पदवी पूर्ण होईल की नाही हीच शंका उपस्थित झाली.
तरीही नेटानं आरतीने ऑनलाइन पद्धतीने आपली पदवी पूर्ण केलीच.
या वर्षाकडे बघताना आरती म्हणते की “हे आयुष्यातलं सगळ्यात अवघड वर्ष होतं”.
पण याच वर्षानं तिला स्वावलंबी होण्याची प्रेरणाही दिली.
पदवी घेतल्यानंतर तिने नोकरीसाठी बारा कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या.
पण बारा वेळा ती अपयशी ठरली. आरती लाजाळू होती आणि प्रत्येक वेळी मुलाखतकाराच्या समोर बसून प्रश्नांची उत्तरं देताना, काही कौशल्यं कमी पडल्यामुळं भीतीने तिचे पाय थंड पडत.
आरतीच्या बहिणीने, तिला एका कार्यक्रमासाठी नावनोंदणी करायला सुचवलं.
मॉक इंटरव्ह्यूनं आरतीला नोकरी मिळवण्यासाठी प्रश्न सोडवायला तयार केलं.
प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर, आरतीने नोकरीच्या 3 ऑफर मिळवल्या.
आज पुण्यातल्या एका नामवंत कंपनीमध्ये आरती अगदी आत्मविश्वासानं आपला जॉब करते आहे.
बारा ठिकाणांहून नाकारलं जाण्यापासून तीन ठिकाणी उत्तम जॉब ऑफर्स इथपर्यंत तिच्या यशाचा आलेख चढता आहे.
तिने घेतलेल्या सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणामुळे तिच्या यशाला कोणीही अडवू शकलं नाही.
आरतीची स्वप्नं अजूनही संपलेली नाहीत. जॉब करत तिने तिच्या कुटुंबाच्या जगण्याला हातभार लावलेला आहे.
यापुढे आरतीला जॉब करत करत पुढचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, आणि लेक्चरर म्हणून काम करायचं आहे.
आरतीला असं ठामपणे वाटतं की तिच्यात असणारी शिकण्याची वृत्ती तिला आज इथपर्यंत घेऊन आलेली आहे.
आरतीला आता पक्कं उमगलेलं आहे की प्रत्येक समस्येला उपाय हा असतोच.
आयुष्यात स्वावलंबी बना, नव्या अनुभवातून नवा धडा शिकाच, पण प्रगती करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची मदत ही घ्या.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा