काय आहे नागपूरच्या काळ्या इडलीचे वास्तव आणि समजून घ्या ती खावी, कोणी खाऊ नये

सध्या सोशल मीडियावर सगळ्यांच्याच नजरेस पडलेली काळी इडली खायला तुम्हाला आवडेल का??

नागपुरात तर लोक खाण्यासाठी रांगा लावताहेत.

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर वेगळं, युनिक असं काहीतरी करायला हवं हे तुम्हाला माहिती आहे.

सध्या फुड इंडस्ट्रीला चांगले दिवस आहेत. त्यातही नव्या कल्पनांना प्रचंड प्रतिसाद मिळतो.

म्हणून तर कुमार एस. रेड्डी यांनी तयार केलेली काळी इडली लोकप्रिय ठरते आहे.

इडली हा सगळ्यांना आवडणारा दाक्षिणात्य खाद्यपदार्थ.

मऊ लुसलुशीत हलक्या गरमागरम इडली बरोबर सांबार आणि चटणी असेल तर इतका टेस्टी आणि त्याचबरोबर पौष्टिक पदार्थ कोण बरं सोडेल?

पांढर्‍याशुभ्र इडलीमध्ये काही वेळेला गाजर, वाटाणे वगैरे घातले जातात.

पण, चक्क काळी इडली!! याची तर तुम्ही कल्पना ही करू शकत नाही बरोबर ना?

अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टीही जगात घडतात. काळ्या इडलीचं हे आश्चर्य नागपुरात घडलेलं आहे.

मूळचे दाक्षिणात्य असणारे कुमार एस. रेड्डी यांनी ही काळी इडली नागपूरमध्ये लोकप्रिय केली आहे.

अशी सुचली कल्पना.

ग्राहकांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर नाविन्यपूर्ण कल्पना राबवली पाहिजे.

कुमार रेड्डी यांनी वेगवेगळे प्रयोग केले होते आणि एक वेगळा प्रयोग म्हणून त्यांनी अंडा इडली सुद्धा बाजारात आणली होती.

याला संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण कुमार एस. रेड्डी यांच्या लक्षात आलं की बरेचसे ग्राहक शाकाहारी असतात.

ते अंडा इडली सारख्या कल्पना कडे पाठ फिरवतात.

तेव्हा त्यांनी बाजरीच्या इडली वरती प्रयोग सुरु केला.

त्यावेळेला कुमार यांच्या मित्रांने त्यांना एक प्रश्न विचारला त्यामुळे त्यांचं जीवनच बदलून गेलं.

मित्रांने विचारलं की, “इडली नेहमी पांढरीशुभ्र का असते काळी का नसते? आणि कुमार अशा युनिक आयडीयावर तू विचार का नाही करत?”

खरं तर पहिल्यांदा कुमार यांना काळ्या इडलीची शक्यता पटलीच नाही. पण मनात मात्र विचारचक्र सुरू झालं.

खरंच काळी इडली का होऊ शकत नाही? आणि या प्रश्नातूनच काळ्या इडलीचा जन्म झाला.

काळी इडली करण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा कुमार यांनी शोध घेतला.

कुमार यांच्या असं लक्षात आलं की काळ्या इडलीचा पूर्वजांनी अगोदरच फक्त विचारच केला होता, असं नाही तर त्यावर प्रयोगही केला होता.

मात्र तो प्रयोग प्रकाशात आलेला नाही. मग मात्र कुमार यांनी काळ्या इडलीचा पिच्छाच पुरवला. आणि रेसिपी तयार केली.

ही काळी इडली तयार करण्यासाठी नारळाचं कवच, संत्र्याची साल, बीट ज्यूस आणि बिटाचा गर यापासून खाण्याचा काळा रंग तयार केला जातो.

ही अत्यंत थकवणारी आणि लांबलचक अशी प्रक्रिया आहे.

कारण हे सगळं साहित्य आधी खडखडीत वाळवावं लागतं.

त्यानंतर काळा रंग मिळवण्यासाठी हे साहित्य जाळण्याऐवजी भाजण्याचा पर्याय निवडला जातो.

तेल न घालता दीड इंचाच्या तव्यात भाजून या सगळ्या साहित्याची पावडर तयार केली जाते आणि हाच नैसर्गिक कोळसा म्हणजे एडीबल चारकोल, रंग म्हणून वापरुन इडली तयार केली जाते.

डिटॉक्स इडली म्हणून फेमस झाली ही इडली.

कुमार यांनी कधीच स्वतःच्या इडलीला डिटॉक्स इडली म्हटलं नाही. तरीही काळी इडली डिटॉक्स नावाने प्रसिद्ध झाली.

या इडलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या.

नागपूरकरांनी मात्र अगदी रांगा लावून या इडलीची चव चाखणं पसंत केलं.

गर्भवतींना मात्र हा खाण्यायोग्य कोळसा म्हणजे एडीबल चारकोल घातलेली इडली न खाण्याचाच सल्ला दिला जातो.

मित्रांनो, या उदाहरणावरून एकच लक्षात येतं की तुम्हाला यश मिळवायचं असेल तर आगळीवेगळी युनिक कल्पना राबवायला पाहिजे.

काळी इडली! याची कल्पनाही कुणी करू शकत नव्हतं.

मात्र आज ही काळी इडली चाखण्यासाठी सगळेच उत्सुक असतात.

वेगळी कल्पना आणि मेहनत याला पर्याय नाही.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय