तिन यशस्वी मुले घडवणाऱ्या एलोन मस्कच्या आईने सांगितलेले ‘यशस्वी पालकत्त्वाचे रहस्य’

एलॉन मस्कच्या आईनं सांगितलं यशाचं रहस्य

“यशस्वी मुलांना घडवताना मी त्यांना लहान मुलांसारखे वागवले नाही किंवा त्यांना कमी लेखलं नाही…

माझं माझ्या मुलांवर प्रेम आहे आणि त्यांनी जे जगाला करून दाखवलं त्याचा मला अभिमान आहे.

माझा सर्वात मोठा मुलगा एलॉन, पर्यावरण वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक कार तयार करतो त्याचबरोबर रॉकेट ही लाँच करतो.

माझा मधला मुलगा, किंबल, त्यानं फार्म-टू-टेबल रेस्टॉरंट सुरू केले.

ज्या शाळांमध्ये कमी सुविधा उपलब्ध आहे तिथं मुलांना फळं आणि भाजीपाला बागा तयार करायला ही तो शिकवतो.

टोस्का, माझी सर्वात लहान मुलगी, ती तिच्या स्वतःच्या मनोरंजन कंपनीच्या माध्यमातून चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करते.

अशा यशस्वी मुलांची आई म्हणून नेहमीच लोक मला विचारतात की मी या मुलांचं यशस्वी करीयर कसं घडवलं?”

एलॉन मस्कच्या आईने याचं रहस्य उलगडताना सांगितलं “मी मुलांना कठोर परिश्रम करायला शिकवलं आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू दिल्या.”

मुलांना पुढच्या आयुष्यात यशस्वी वाटचाल करण्यासाठी त्यांच्या काही टिप्स.

1) तुमच्या मुलांना लहान वयातच काम करू द्या.

“आईसारखे दैवत सा-या जगतामध्ये नाही” अशी आपली ठाम श्रद्धा आहे.

आई भारतीय असो की परदेशी मुलांना चांगलं वळण लागावं म्हणून प्रसंगी ममता बाजूला ठेवून ती कठोर बनते.

एलॉन मस्क च्या आईने म्हणजे माए मस्क यांनी सुद्धा आई हीच मुलांची पहिली गुरू असल्याचे सिद्ध केलं आहे.

वयाच्या ३१ वर्षी एलॉन मस्कच्या आईच्या माए मस्क यांच्या पदरी तीन मुलं होती.

एकटीने आपल्या मुलांचं संगोपन करताना माए मस्क यांनी कधीच धीर सोडला नाही.

कधीही जबाबदारी टाळली नाही की कधी कामाचा, कष्टाचा कंटाळा केला नाही.

मुलांसाठी पोटभर अन्न, उबदार कपडे आणि डोक्यावर छप्पर मिळवण्यासाठी माए मस्क यांनी खूप मेहनत केली.

वयाच्या आठव्या वर्षी काम सुरू करणा-या माए मस्क यांनी स्वतःच्या वडिलांच्या मासिकाची एक जबाबदारी उचलत तासाला 5 सेंट अशी कमाई करायला सुरुवात केली.

भारतात लहान वयात मुले काही यश संपादन करत असतील, तर काही लोकांकडून किंवा नातेवाईकांकडून सुद्धा ‘मुलांकडून काम करवून घेता’ अशी टीका केली जाते.

यामागे, आपली मुले असे यश संपादन करू शकत नाहीत याची असूया सुद्धा असू शकते. पण एक पालक म्हणून, हे कधीही विसरू नका की, एपीजे अब्दुल कलाम असो किंवा मार्क झुकरबर्ग, एलोन मस्क या सर्वांनी लहान पणा पासूनच यशाकडे झेप घेतली होती.

शिक्षण हे फक्त शालेय शिक्षण न राहता, जगण्याचे शिक्षण झाले तरच मुले स्वावलंबी होऊ शकतात.

2) आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, पण त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्या.

माए लहान असतानाच त्यांनी वडिलांच्या व्यवसायात मदत करायला सुरुवात केली होती.

वडिलांचा मणक्यांवरती उपचार करणारा दवाखाना होता, आणि त्याच्या शेजारीच हे कुटुंबीय राहायचे.

दर महिन्याला वडिल एक अहवाल प्रसिद्ध करायचे.

या अहवालाचा मजकूर वडील सांगायचे आई शॉर्ट हँन्डमध्ये लिहून घेऊन टाईप करायची.

माए आणि त्यांचे जुळी बहीण काए स्टेन्सिल्स वरून अहवाल तयार करायच्या मग हे अहवाल दुमडून पाकिटात घालून या पाकिटाला स्टँम्प लावायच्या.

महिन्याला साधारण एक हजार अहवालांचं काम या दोघी बहिणी मिळून करायच्या.

लवकरच म्हणजे वयाच्या 12 व्या वर्षापासून दोघी बहिणी वडिलांच्या दवाखान्यात रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम करायला लागल्या.

दोघी आळीपाळीनं रुग्णांच नावं लिहायच्या, चहा तयार करायच्या, एक्स-रे काढायच्या.

थोडक्यात वडील तपासाला येण्यापूर्वी रुग्णाची सगळी प्राथमिक तयारी या दोघीकरून ठेवायच्या.

एखाद्या प्रौढ व्यक्तीवरती विश्वासाने जबाबदारी सोपवावी तशी माए आणि काए यांच्यावर त्यांच्या पालकांनी जबाबदारी सोपवली.

याचा प्रभाव माए यांच्या पालकत्वावर ही दिसतो.

आहारतज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या माए यांच्या कामांमध्ये तिन्ही मुलांनी लहानपणापासून मदत केली.

टोस्काने डॉक्टरांना पत्र लिहिण्याच्या कामात मदत केली तर एलॉननं कम्प्युटरचं काम समजावून देण्यात मदत केली. किंबलनेही आपल्या मदतीचा वाटा उचललाच.

माए यांनी स्वतःच्या आठ वर्षाच्या मुलीला टोस्काला काम करायला प्रोत्साहन दिलं.

स्वतःच्या मॉडलिंग आणि इमेज स्कूलमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना चालायचं कसं, वागायचं कसं याचे धडे द्यायला टोस्काला उभं केलं.

टोस्काने माए यांच्या शोसाठी म्हणजेच आईसाठी शोमध्ये ड्रेसर म्हणूनही काम केलं.

2) मुलांना त्यांचे मार्ग निवडू द्या

एलॉन मस्कची आई माए मस्क सांगतात की मुलांची जबाबदारी उचलू नका, त्यांना त्यांचे मार्ग निवडून द्या.

फक्त त्यांना कठोर परिश्रम आणि चांगल्या गोष्टीचं महत्त्व पटवून द्या. लहान आहेत असे गृहीत धरून त्यांच्याशी वागू नका.

तर ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत याची खात्री बाळगा.

अभ्यास किती करायचा कसा करायचा होमवर्क पूर्ण करायचा की नाही ही पूर्णतः मुलांची स्वतःची जबाबदारी आहे. ती त्यांना पूर्ण करू द्या.

माए मस्क यांनी सांगितलं की मोठं होताना स्वतःचे निर्णय घेत माझी मुलं मोठी झाली, त्यामुळे माझ्या मुलांचा फायदा झाला.

“माझ्या मुलांनी मला जगण्यासाठी संघर्ष करताना पाहिलं होतं” त्याचा ही त्यांना फायदाच झाला.

माए मस्क यांनी स्वतःच्या मुलांच्या कॉलेज जीवनाबद्दल सांगताना म्हटलं की त्यांचं कॉलेज लाईफ त्यांनी गरिबीत काढलं.

जमिनीवरती गादी अंथरूण झोपायचं सहा सहा रूममेट, अनंत अडचणी पण बाऊ न करता माए यांची मुलं शिकली.

माए म्हणतात मुलांना चैनीची सवय लावली नाही तर ती आरामात जगतात. त्यांची काळजी करू नका, फक्त ते सुरक्षित आहेत याची खात्री करून घ्या.

अनेक पालक मुलांचा ताण स्वतःवरती घेतात, आणि स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात, मुलांच्या करियर मागे धावतात.

आहारतज्ञ म्हणून माए यांनी अशा अनेक पालकांना पाहिलेलं आहे.

त्या सर्व पालकांना माए एवढंच म्हणतात की मुलांना त्यांची जबाबदारी उचलू दे कॉलेज एडमिशन साठी त्यांची कागदपत्रे त्यांना हाताळू दे, त्यांना नोकरी करायची असेल तर नोकरी करु दे, करायची नसेल तर त्यांचं पूर्ण ऐकून घ्या त्यांना विश्वासात घेऊन योग्य सल्ला द्या, आणि प्रोत्साहन द्या.त्यांच्या व्यवसायाला पाठिंबा द्या.

मुलांवर फक्त चांगले संस्कार करा त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांचे निर्णय घेऊ द्या.

एलॉन मस्क या जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाची आई माए मस्क स्वतः एक आंतरराष्ट्रीय मॉडेल आहेत.

आहारतज्ञ आहेत. “अ वूमन मेक्स अ प्लँन” या पुस्तकाच्या लेखिका ही आहेत.

अनेक प्रतिथयश मासिकांच्या मुखपृष्ठ वर झळकलेल्या माए मस्क तीन यशस्वी मुलांची आई सुद्धा आहेत.

पालकत्व निभावताना नेमकं काय केलं पाहिजे याविषयी अगदी थोडक्यात त्यांनी जे सांगितलं आहे ते खूपचं महत्त्वाचं आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “तिन यशस्वी मुले घडवणाऱ्या एलोन मस्कच्या आईने सांगितलेले ‘यशस्वी पालकत्त्वाचे रहस्य’”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय