पन्नाशी नंतर स्मृतीभ्रंश टाळण्यासाठी तरुणपणीच या ९ सवयी स्वतःला लावून घ्या

डिमेन्श‌यिा : निदान व उपचार

आयुष्यभर तुम्ही अनेक अनुभव घेता कधी सहज तर कधी हट्टानं, सुखाचे, दुःखाचे अनेक क्षण अनुभवता.

त्यातून तुमचं स्वतःचं एक व्यक्तिमत्त्व घडतं.

मात्र आरोग्याच्या काही चुकीच्या सवयी तुमच्या या व्यक्तिमत्वाला जबरदस्त तडा देतात.

आयुष्याच्या एखाद्या अनपेक्षित वळणावर तुमच्या मन:पटलांवरच्या सगळ्या स्मृती पुसून तुमच्या मनाचा फळा कोरा होऊ शकतो.

ही अवस्था जितकी तुमच्यासाठी भयावह आहे, तितकीच ती तुमच्या बरोबरीच्या व्यक्तींसाठी दुःखद आणि त्रासदायक ठरते.

यासाठी सुरुवातीपासूनच आरोग्याच्या चांगल्या सवयी लावून घ्या.

लक्षात घ्या एकदा स्मृतिभ्रंश झाला की त्यावरती उपचार जवळजवळ अशक्य आहे.

त्यामुळे स्मृतीभ्रंश होऊच नये याची आधीच काळजी घ्या.

आज आम्ही तुम्हाला अशा 9 सवयीबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही स्वतःला लावून घेतल्यात तर स्मृतीभ्रंश किंवा डिमेन्शियाला तुम्ही नक्की टाळू शकता.

1) सामाजिक वर्तुळात मिसळा.

तुम्हाला जर एकटं रहायची सवय असेल तर ती तुमच्यासाठी घातक ठरेल.

आधी ही सवय मोडा. आपल्या परिवारातील सदस्यांशी, नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी नेहमी संपर्क साधा. शक्य तितके, योग्य तितके बोला, त्यांच्याबरोबर वेळ घालवा.

याच्यामुळे एकटेपणा, चिंता, नैराश्य भावना कमी होईल आणि डिमेन्शियाचा धोकाही कमी होऊ शकेल.

2) बुद्धीचा खेळ

तंत्रज्ञानामुळे एक तोटा झाला की आपल्याला बुद्धीचा वापर कमी करावा लागतो.

कॅलक्युलेटर, मोबाईल यामुळे पाढे गणितं, फोन नंबर, पत्ते, वाणसामानाची यादी काही म्हणजे काही लक्षात ठेवावे लागत नाहीत.

तर मित्रांनो स्मृतीभ्रंशाचा धोका उद्ववू नये म्हणून बुद्धीला वेळोवेळी थोडसं खाद्यं द्या.

सूडोकू, चेस, शब्दकोडी सोडवा किंवा काही अवघड गेम खेळा आणि बुद्धी तल्लख ठेवा.

पाढे पाठ करणं, स्तोत्रं पाठ करणं हा ही एक चांगला पर्याय ठरू शकतो.

3) पुरेशी झोप.

मन आणि शरीराचा समतोल साधून तुम्हाला सुदृढ व्यक्ती बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ठरते ते पुरेशी झोप.

गाढ ,पुरेशा झोपेमुळे मेंदूमध्ये छान स्वच्छता होते ,शिस्त निर्माण होते.

ही शिस्त आणि पुरेशी झोप स्मृतीभ्रंश आणि अल्झायमर या दोन्हींचा धोका कमी करते. मनाचेTalks वर बौद्धिक कसरत हे सदर आम्ही त्याचसाठी देत असतो.

4) संगीत साधना.

संगीत हे प्रत्येकालाच आवडतं. प्रत्येकाला संगीताचे वेगवेगळे प्रकार आवडत असतील कदाचित, पण संगीत सगळ्यांनाच रिलॅक्स करतं.

संगीत सगळेच ऐकतात. पण आरोग्य सांभाळण्यासाठी संगीत शिकायला लागा.

तुमचं वय काय आहे? हा काही फारसा महत्त्वाचा मुद्दा नाही. महत्त्वाचा हे आहे की तुम्ही भावगीत, सुगमसंगीत असं व्होकल संगीत शिकू शकता किंवा हार्मोनियम, गिटार यासारखं तुमच्या आवडीचं एखादं वाद्यं शिकू शकता.

तुमची ही संगीत साधना तुमच्या बुद्धीला ताजीतवानी ठेवेल आणि स्मृतिभ्रंशाचा धोका ही दूर करेल.

5) मोकळ्या हवेत वावरा.

मोकळा हवेमध्ये काही काळ फिरणं गरजेचं आहे, तुमच्या एकूणच आरोग्यासाठी पोषक ही आहे.

शुद्ध ताज्या हवेमुळे तुमचे विचार सकारात्मक होतात रक्तदाब स्थिर राहतो.

रोगप्रतिकारक शक्ती सुधारते त्यामुळं मेंदूचा ताण कमी होतो.

त्यामुळे मोकळ्या हवेत रोजच्या रोज काही वेळ तरी फेरफटका माराच.

6) प्राणायाम.

प्राणायामचे फायदे नव्याने सांगायची गरज नाही. आज प्रत्येकाला प्राणायामचं महत्त्वं माहिती आहे.

तनमनाच्या उत्तम आरोग्यासाठी प्राणायाम हे वरदानच आहे.

सातत्याने पुरेशी ताजी हवा फुफ्फुसात भरून घेतल्यामुळे तुमचा मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो आणि स्मृतिभ्रंशाची शक्यता मावळते.

7) पौष्टिक आहार.

हा तर प्रत्येकाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गरजेचा असतो.

पाश्चात्य आहाराच्या अंधानुकरणच्या नादात आपला स्वाभाविक पौष्टिक आहार नाकारून तुम्ही अन् हेल्दी पदार्थांचा शरीरावर मारा करता.

हे गोष्ट चुकीची आहे. ठरवून ताजा, सकस, घरात केलेला स्वच्छ आहार तुम्ही निवडा.

या आहारामुळे तुमचे हृदय निरोगी बनेल आणि निरोगी हृदय मेंदूचा ताण कमी करेल.

8) व्यायाम.

व्यायाम करण्यासाठी भरपूर पैसा आणि भरपूर वेळ हवा असं तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची अत्यंत चुकीची कल्पना आहे.

दिवसातला काही वेळ खर्च करून तुम्ही काही मिनिटं फिरून जरी आला तरी व्यायाम होतो.

दिवसातला काही वेळ व्यायामासाठी राखून ठेवाच. नियमित व्यायाम करा.

सकस आहाराला व्यायामाची जोड दिली तर वयानुरूप येणाऱ्या स्मृतिभ्रंशाचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.

9) आकलन शक्ती वाढवा.

तुम्ही तुमच्या स्मरणशक्तीचा किती वापर करता?

आपल्या स्मरणशक्तीला ताण द्या.

बाग काम करा, कोडी सोडवा, स्वयंपाक करा ज्या गोष्टी तुम्ही करतच नाही त्यासाठी वेळ राखीव ठेवा आवर्जून स्मरणशक्तीला काम द्या.

आकलनशक्ती वाढवण्यासाठी काही थेरपी आहेत त्यांचीही मदत तुम्ही घेऊ शकता.

जाणीवपुर्वक आकलन वाढवा, छंद जोपासा आणि एकटेपणा टाळून निराशा टाळा.

तर मित्रांनो, इतक्या साध्या सोप्या गोष्टी नियमित करून तुम्ही स्मृतीभ्रंशाचा याचा धोका सहज टाळू शकता.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

2 Responses

  1. Sudhir Nimgaonkar says:

    Thank you for the guidance.

  2. Vijay S. Bhosale says:

    Very important information

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!