अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने पुण्यात निधन

रोजच्या सवयी प्रमाणे आज उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला. सवयीनं व्हाट्सअप स्टेटसवरही नजर फिरवली.

काही तरी विशेष घडलंय का? सगळ्यांच्या स्टेटस वर आईचा फोटो आहे. स्वतःच्या आईचा नाही. या जगाच्या आईचा, अनाथांच्या आईचा सिंधुताईंचा फोटो.

सिंधूआईला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. आताही कोणतातरी मोठा पुरस्कार मिळालेला दिसतोय.

बघूया तरी कोणता पुरस्कार आहे? पुन्हा एकदा सोशल मीडिया सर्च केलं, तेव्हा कोणीतरी छानशी कविता शेअर केली होती कोणी सिंधुताईंचे फोटो शेअर केले होते.

नक्की काय झालंय कळतच नव्हतं. एका कमेंटकडं लक्ष गेल्यानंतर मात्र धक्काच बसला.

श्रद्धांजली? सिंधुताईंना श्रद्धांजली? भराभर क्रॉसचेक केलं. मनात आशा होती आपण काहीतरी चुकीचं वाचलं.

छे! असं काही नाही झालेलं. ती नजरचूक आहे, माझंच मन मलाच समजावत होतं.

पण दुर्दैवाने अशा बातम्या खोट्या नसतात. चुकीच्या नसतात.

अनाथांची आई सिंधुताई सगळ्यांना कायमचं अनाथ करून निघून गेली. निमित्त हृदयविकाराचा झटका? छे छे काहीतरीच.

ज्या बाईने हजारो मुलांना आपल्या पदराखाली घेतलं, आसरा दिला ती माऊली आपल्याच मुलांना असं पोरकं कसं करू शकते?

ही मूर्तिमंत वात्सल्याची माउली, आज खरच चटका लावून अनंताच्या प्रवासाला निघून गेली या वरती विश्वास बसणं अवघडच आहे.

14 नोव्हेंबर 1947 ला जन्मलेली ही चिंधी, हो चिंधीच, नको असणारी ही मुलगी घरच्यांसाठी चिंधी होती.

पण कदाचित त्यावेळी चिंधी म्हणून हिणवणाऱ्या लोकांना माहिती नसेल की ही चिंधी शेकडो पोरक्या मुलांच्या जखमांना मलमपट्टी करणार आहे.

वर्धा जिल्ह्यात नवरगाव मध्ये जन्मलेल्या सिंधूला शिकायचं होतं. पण गुरं राखायच्या कामात वडिलांना मदत करावी लागायची.

तरीही जिद्दीनं चौथीपर्यंत शिकलेल्या सिंधुताईंचं वयाच्या 9व्या वर्षीच लग्न लावून देण्यात आलं.

26 वर्षांनी मोठा असलेला नवरा आणि सोबतीला सासुरवास.

यातही वाचायची, नवं शिकायची जिद्द काही सिंधुताईंनी सोडली नाही.

वयाच्या अठराव्या वर्षी तीन मुलांची आई असणाऱ्या सिंधुताईंचा चौथ्या बाळंतपणात वनवास सुरू झाला.

अन्यायाविरुद्ध पेटून उठणा-या सिंधुताईं सगळ्यांच्या वतीने एका लढाईत उतरल्या.

जीवन-मरणाचीच ही लढाई होती.

त्यांच्यासारख्याच गुरं राखणारा कुटुंबातल्या बायका शेकडो गुरांचं शेण एकत्र करायच्या.

या शेणाचा लिलाव व्हायचा. पैसे मात्र धनदांडग्यांना मिळायचे.

शेण गोळा करणाऱ्या बायांच्या नशिबी उपास आणि कष्टच उरायचे.

सिंधुताईंनी याविरुद्ध आवाज उठवला, लढा दिला यशही मिळालं. पण या यशाची जबरदस्त किंमत त्यांनी मोजली.

या लढ्यात दुखावलेल्या एका जमीनदारांनं सिंधुताईंच्या उदरात वाढणारं मुल स्वतःच असल्याचा प्रचार केला.

सिंधुताईंच्या आयुष्यात मोठा झंजावात आला.

पूर्ण दिवस भरलेल्या सिंधुताईंना मारहाण करून नवऱ्यानं आणि त्यांच्या कुटुंबियांनी एवढंच नाही तर गावकऱ्यांनी हाकलून दिलं.

सख्ख्या आईनंही पाठ फिरवली.

पायाच्या घोट्यापर्यंत नऊवारी नेसणारी सिंधुताई सपकाळ नावाची ज्योत आता झंझावाताला पुरून उरण्यासाठी सज्ज झाली.

लाथा बुक्या खाऊन गाईच्या गोठ्यात अर्धमेल्या अवस्थेत एका मुलीला जन्म दिलेल्या सिंधुताई या मुलीला कुशीत घेऊन अज्ञाताच्या प्रवासाला निघाल्या.

निष्पाप मुलीचा जीव घ्यायचा नाही या इराद्याने आत्महत्येपासून मागे फिरल्या.

रेल्वे स्टेशन, स्मशानात दिवस काढून आपल्या मुलीला डोक्यावरती छप्पर मिळवून दिलं.

पण एवढ्यावरच ती माऊली संतुष्ट नव्हती.

विशाल आभाळाखाली जगात एकाकी वाढणाऱ्या अनाथ मुलांना तिने आपल्या पदराखाली घेतलं, जगवलं.

या मुलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केलं, त्यांची लग्न लावून दिली.

अनाथांना आपल्या पदराखाली घेणारी ही माऊली त्यांच्यासाठी जगापुढे पदरही पसरत होती.

आपली कहाणी सांगून या माउलीने अनाथ मुलांसाठी निधी गोळा केला.

पण हा मायेचा पदर स्वार्थासाठी कधीच स्वतःच्या डोक्यावरून घसरला नाही.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित ही माऊली पद्मश्री सिंधुताई सपकाळ होती.

ज्यांनी तिला बेघर केलं, आयुष्यात प्रचंड त्रास दिला त्यांना ही आधार देऊन ही माऊली आभाळा एवढी मोठी झाली.

आज सिंधुताई सपकाळ अनंताच्या प्रवासाला कायमच्या निघून गेल्या….

वाऱ्यावर फडफडणारी, अंधाऱ्या आयुष्यात प्रकाश शिंपणारी ही तेजस्वी ज्योत आता शांत झाली.

आयुष्यभर चाललेला संघर्ष आता संपला.

पण या आईची आठवण कुणीही विसरणार नाही. फ. मु. शिंदे यांच्याच शब्दात सांगायचं तर..

आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते.

आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही…….

सिंधुताई तुम्ही न सरणारी शिदोरी आहात….

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने पुण्यात निधन”

    • God bless you, भगवान आपको मन की शक्ति, और खुद के काम को या आपकी ख़ुद की अगर कोई वेबसाइट हो तो उसे बेहतर करने की शक्ति दें।

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय