हातपाय नसताना ही कष्ट करून कमावणारा दिव्यांग रिक्क्षावाला आयुष्याचा मोठा धडा तुम्हांला शिकवेल.

aanand mahindra

कृतज्ञता. हीच भावना मनात ठेवून आयुष्य साजरं करणा-या रिक्क्षावाल्याचा व्हायरल व्हिडीओ तुम्हांला आयुष्य कसं जगायचं याचा धडाच देईल.

तुम्ही म्हणाल एका रिक्क्षावाल्याकडे असं काय विशेष असणार?

हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात की तुमच्या लक्षात येईल या रिक्क्षावाल्याचं आनंदी असणं किती अवघड आहे.

बहुधा दिल्लीच्या रस्त्यावर काम करणाऱ्या एका रिक्क्षावाल्याचा हा व्हिडीओ आहे.

या रिक्क्षावाल्याला हात नाहीत, पाय नाहीत तरीही हा रिक्क्षावाला सफाईने रिक्क्षा चालवतो आहे.

यासाठी त्याने जुगाड करून वाहनामध्ये बदल करून घेतले आहेत. स्कुटीचं इंजिन वापरुन त्या व्यक्तीनं अशी रिक्शा तयार केली आहे, जी तो रस्त्यावर सफाईने चालवू शकतो.

वडील ,बायको आणि दोन मुलांची जबाबदारी पार पाडण्यासाठी या रिक्क्षावाल्यांने भीक मागण्याचा नाही तर काम करण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

त्यासाठी रिक्क्षा तयार करुन घेऊन न दमता ,न थकता गेली पाच वर्षे तो मालवाहतूक करतो.

आयुष्य आपल्या झोळीत जे दान टाकतं ते स्वीकारून जगायला हवं, हा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन प्रत्येक धडधाकट व्यक्तीला अंतर्मुख करतो.

ज्याला आयुष्य भरभरून स्वाभिमानाने जगायच़ आहे तो कितीही संकटं येवोत त्यावर मात करून आनंदाने जगतो.

एखाद्या छोट्याशा अपयशाने तुम्ही खचून गेला आहात का? एखाद्या संकटासमोर गुडघे टेकले आहेत का?मग हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पहा.

मित्रांनो कितीही संकट येवोत, इच्छा शक्तीने तुम्ही त्यातून मार्ग काढूच शकता.

गीतेत सांगितलं आहे तुम्ही तुमचं कर्म करत रहा फलाची आशा करु नका.

हा उपदेश मनात ठेवून कृतज्ञतेनं वाटचाल करण्या-या या व्यक्तीचा संघर्ष पाहूया सोशल मीडियावर अँक्टिव्ह असणाऱ्या आनंद महिंद्राने यांनी त्या व्यक्तीला शोधून काम देण्याची इच्छा प्रकट केली आहे.

आपल्या ट्विट मध्ये आपल्या लॉजिस्टिक डिपार्टमेंटला टँग करत आनंद महिंद्रा म्हणतात.

“या व्यक्तीचा व्हिडीओ आज मला पहायला मिळाला, तो किती जुना आहे याची कल्पना नाही, मात्र आयुष्याविषयी कृतज्ञ रहात या माणसानं जे धाडस केलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे ,महिंद्रा लॉजिस्टिक, तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये या व्यक्तीला सामावून घेऊ शकता का ?

अडचणींचा बाऊ न करता, अडचणींवर मात करणा-या या व्यक्तीला कंपनीच्या मालवाहतूक प्रक्रियेत सामावून घेत, नियमित उत्पन्नाचं साधन मिळवून देत मदत करण्याची इच्छा आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली.

एकदाच थोडीफार रक्कम देण्यापेक्षा नियमित काम देणं म्हणजे या व्यक्तीच्या कतृत्वाला केलेला सलामच म्हटला पाहिजे.

महिंद्रा लॉजिस्टिक डिपार्टमेंटने यावर ऑफिशियल ट्विट करत उत्तर दिलं आहे,

“आनंद, आम्ही लवकरच या व्यक्तीला शोधून काढू आणि कंपनीत सामावून घेऊ, देशांतर्गत होणाऱ्या मालवाहतूकीचा हा सुपर हिरो गणला जाईल.

तर मित्रांनो, एक लक्षात घ्या तुमच्याकडे जे काही आहे त्यातून प्रयत्न करणं सुरू करा.

तुमची मेहनत, तुमचे कष्ट पाहून एखादी सुवर्ण संधी तुमचं दार नक्की ठोठावेल.

मित्रांनो, रिक्क्षावाल्याची ही कहाणी वाचून तुम्हांला काय वाटलं आम्हांला नक्की सांगा पण या रिक्क्षावाल्याची ही दुर्दम्य इच्छा शक्ती पाहून आम्हांला मात्र गुरु ठाकूरच्या दोन ओळी आठवतात…

असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!