सफलतेची बिजं बालपणापासूनच मुलांमध्ये कशी रोवता येतील?

सफलतेची बिजं बालपणापासूनच मुलांमध्ये कशी रोवता येतील?

आपल्याला माहितीये “ज्ञान बाटना बाहोतही आसन बात है” तर मग हेच ‘ज्ञान बाटना’ म्हणजे काही स्ट्रॅटेजी ठेऊन आपल्या मुलांमध्ये बालपणापासून हे सफलतेचे बीज रोवले तर नक्कीच ते मुल आपल्या आवडीच्या क्षेत्रात सफलता मिळवू शकेल.

या जगात लाखो, करोडो लोक राहतात. प्रत्येकजण आपापलं आयुष्य आपल्या चौकटीत जगत असतो. एवढ्या मोठ्या विश्वात प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात एक युद्धच खेळत असतो.

यात काही लोक सफल, यशस्वी होतात….. काहींना सफलता सहजासहजी हाताला लागत नाही पण एखाद्या योध्यासारखं प्रत्येक आघाडीवर ते लढत पुढे जात असतात. पण असं का होतं की यातले थोडेच लोक सफल होतात?

का बरं असं होत असेल?…. मी असफल व्हावं असं किंवा त्या दिशेने वाटचाल करावी असं तर कोणाला वाटत नसतं म्हणजे असं की आयुष्यात काहीतरी करावं हाच साधारण सर्वांचा प्रयत्न असतो. तरीही ते सर्वांना शक्य का नाही होत?…..

आयुष्यात सफल झालेले साधारण सगळेच लोक जे आहेत त्यांच्यात एक वेगळेपण दिसतं. ते असं की हे लोक गर्दीचा हिस्सा होत नाहीत.

जगराहटीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची उर्मी या लोकांना कधीच स्वस्थ बसू देत नाही. या लोकांचा नेहमी काहीतरी रचनात्मक विचार असतो.

नवीन काहीतरी करण्याचा, इतिहास बनवण्याचा उत्साह असतो कमालीची धडाडी असते. ते आपले निर्णय स्वतः घेतात आणि त्या निर्णयाचा परिणाम जो होईल तो स्वीकारण्याची तयारी ठेवतात.

आता सफलता मिळवणारे लोक आयुष्यात कधीही असफल होत नाहीत अशातलाही काही भाग नाही. पण यश आपल्या हातून हुकलं तर त्यातून शिकण्याची मानसिकता असेल तर पुढच्या प्रयत्नात माणूस जिंकतो.

प्लॅन A असफल झाला तर प्लॅन B तयार ठेवणारा माणूस आपलं इप्सित साध्य करतोच. आपल्या असफलतेची जवाबदारी दुसऱ्यावर ढकलली तर त्यातून निराशेशिवाय हाती काहीही राहत नाही.

आपण Albert Einstein एक महान शास्त्रद्न्य म्हणून ओळखतो. त्या आधीपण त्या काळाला सुसंगत असं विज्ञानाचं ज्ञान होतच कि…. मग आईन्स्टाईनच जगावेगळा सफल का ठरला?

कारण सोप्पये, त्याने चाकोरीला धरून नुसताच विज्ञानाच्या पुस्तकांचा अभ्यास नाही केला. तसेच जर नुसतं परीक्षा देण्यासाठी तो विज्ञान शिकला असता तर त्याने आपल्या अभ्यासाच्या पुढे जाऊन रचनात्मक विचार केला नसता आणि स्वतःला एक वेगळी ओळख दिलीच नसती.

खरंतर हि एक छोटीशी थेअरी आहे. काही विचार येतोय का मनात….

प्रत्येक माणसामध्ये म्हणजे माणसामध्ये किंवा स्त्रीमध्ये खरंतर हि सुप्त शक्ती कुठेतरी दडलेली असते. आणि ती शक्ती कोण जागं करू शकतं…

साहजिकचये मुलांच्या बालपणापासून त्यांचे पालक हे करू शकतात. जागरहाटीपासून काहीतरी वेगळं करण्याची उर्मी नेहमीच मुलांमध्ये जागवत राहिली पाहिजे…..

लहानपणापासून आपले छोटे-छोटे निर्णय घेण्याची सवय जर त्यांना लावली तर पुढे जाऊन मोठे निर्णय घ्यायला ते डगमगणार नाहीत.

होतं असं कि आपण प्रेरणा मिळण्यासारखं खूप काही ऐकतो, वाचतो पण प्रश्न हा पडतो हि हे सगळं आहे तर बरोबर पण आता हे इंप्लिमेंट कसं करायचं…

म्हणून ते वाचून काही वेळासाठी जोश आपल्यामध्ये येतो. आणि ‘पहिले पाढे पंचावन्न’ हे व्हायला जास्त वेळ लागत नाही.

पण आपल्याला माहितीये “ज्ञान बाटना बाहोतही आसन बात है” तर मग हेच ‘ज्ञान बाटना’ म्हणजे काही स्ट्रॅटेजी ठेऊन आपल्या मुलांमध्ये बालपणापासून हे सफलतेचे बीज रोवले तर नक्कीच ते मुल आपल्या आवडीच्या क्षेत्रात सफलता मिळवू शकेल.

प्रत्येक मुलामध्ये काहीतरी विशेष टॅलेंट हे दडलेलं असतं ते ओळखून त्याला योग्य दिशा देणं हे नक्कीच आपण करू शकतो.

मुलांना प्रयत्न करण्याचं आणि हरलं तरी न थांबण्याचं आपण छोट्या छोट्या खेळण्यांपासूनच शिकवू शकतो. खेळणं तुटलं तरी ते जोडण्याची मजा घ्यायला त्यांना शिकवलं तर मोठं होऊन यश खेचून आणण्याची जिद्द त्यांच्यात नक्कीच जागवत येईल.

वाचण्यासारखे आणखी काही…..

श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या आठ सवयी
रोजच्या जीवनात भीतीला जा सामोरे दिलदार मनाने…
उत्कृष्टतेचा ध्यास

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!