गंधातले फुल …..

शोधले फुल मी सखे
प्रीत आपली दडलेली
गंधात होती प्रीत ती
ह्रदयात ती फुललेली
दर्प हा बकूळीचा तो
याद देतो जीवनाचा
नाजुक तेच स्पर्श तिचा
गंधात सार जीवनाचा
वेलीवरचीं जाई जुई
शोभते ग मंडपाला
सुवास हा प्रीत फुलांचा
हेलावीतो ह्रदयाला
प्राजक्ताचा सडा अंगणी
भुरळ घालतो मनाला
फुलतो गुलाब निशिगंध तो
साद साथ ती प्रीतीला
झुळकीत प्रिये पहा तसे ती
रातराणी अंगाई गाते
देवुन सारे मदनमस्ती
जीवन सार सांगते
भेंट हीच फुल वेडी
जप वेडे जीवनात
निभव प्रीत आपली
फुल अन गंधात

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा