या 75 वस्तुंचा विचार तुम्ही संक्रातीच्या हळदीकुंकू समारंभाला लुटण्यासाठी करू शकता.
मकर संक्रांत झाली की हळदी कुंकवाचे वेध महिला वर्गाला लागतात.
नव्या नवरीची पहिली संक्रात असेल तर वाण म्हणून हळदीकुंकूच लुटलं जातं.
काही मैत्रिणी मोजक्या 5 जणींना बोलावून हळदीकुंकू साजरं करतात.
काहीजणींच्या मैत्रीणी शंभर असतात.
काहीजणी तर घरी घाट घालायला वेळ मिळत नाही म्हणून चक्क ऑफिसमध्ये हळदीकुंकू कार्यक्रम करतात.
तिळगुळ, तिळाची वडी, याबरोबरच गाजर, ऊस, मटार, बोरं आणि गव्हाची ओटी आणि एखादं वाण देऊन संक्रांतीचं हळदी कुंकू साजरं केलं जातं.
किंक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत चालणाऱ्या या हळदीकुंकू समारंभात दरवर्षी नवं वाण काय द्यायचं हा महिला वर्गासमोर प्रश्नच असतो.
तर त्यासाठीच आम्ही तुम्हांला काही साध्या सोप्या आयडिया देणार आहोत.
जवळपास 75 वस्तूंची यादीच आम्ही तुम्हांला सुचवणार आहोत. या वस्तूंमध्ये असणार आहे आधुनिकता, पारंपरिकता आणि क्रिएटिव्हिटी!!
ती यादी वाचून तुम्हांला आणखी काही वस्तू क्लिक होतील.
चला तर मग वाण म्हणून कोणत्या गोष्टी लुटता येतील ते जाणून घेऊया.
1) सँनिटायझर
2) मास्क
3) गाळणी
4) खिसणी
5) मोबाईल होल्डर
6) उदबत्ती स्टँड
7) उदबत्ती होल्डर
8) साडी पिन
9) हेअर बन
10) हेअर पिन
11) सिंगल साडी कव्हर
12) बनाना नैवेद्य डिश
13) एअर टाईट कंटेनर
14) चंद्रकोर टिकली पाकीट
15) टिश्यू पेपर
16) सोप केस
17) चमचे
18) निरांजन
19) मोत्याची सुपारी
20) मोत्यांचे मोदक
21) पावडरचे डबे
22) ऑक्सडाईज नथ
23) मल्टीपर्पज होल्डर
24) कपड्यांच्या क्लिप
25) फ्रुट बास्केट
26) हेअर ऑईल
27) साखर
28) कुंकवाचा करंडा
29) धूपकांडी
30) पोटली / बटवा
31) कंगवा
32) रबर
33) मग
34) कापडी पिशवी
35) फुलवाती
36) वस्त्रं
37) किचन नँपकिन / किचन ऍप्रन
38) तुळशीचं किंवा शोचं रोपं
39) एम्ब्रॉयडरी रूमाल
40) तडका पँन
41) हँन्डमेड सोप
42) गुळाची ढेप
43) फ्रीज मँग्नेट
44) क्लचर
45) आरसा
46) सिंदूर
47) केमिकल विरहित कुंकु
48) चंदन टिका
49) गुलाब पाणी
50) मेहंदी कोन
51) प्लॅस्टिक बाउल
52) काचेचे बाउल
53) नँपकिन बुके
54) मोदक साचा
55) करंजी साचा
56) रांगोळी पाकीट
57) रांगोळी छाप
58) अँक्रेलिक रांगोळी
59) पीलर (सालं काढायला)
60) प्लॅस्टिक डिझाइनर कुंडी
61) अगरबत्ती
62) नारळ
63) खण पर्स
64) समोसा पाऊच
65) मोत्यांंचा गजरा
66) बास्केट
67) बांगड्या
68) मधाची बाटली
69) किचेन
70) कुल्हड
71) शुभलाभ स्टीकर
72) चपाती रूमाल
73) अत्तरं
74) भाजीची पिशवी
75) छोटे ट्रे
तुमच्या बजेट नुसार तुम्ही एखादी वस्तू निवडू शकता.
अशीच तुम्ही काही हँन्डमेड वस्तू करत असाल तर कमेंट मध्ये नक्की कळवा…
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा