भरपूर कमाई करून देणारे ५ साइड बिझनेस

सध्या दोन वर्षापासून कोविड पॅनडेमीकमुळे सगळ्यांच्याच नोकरी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहीजणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काहींना नोकरी असून संपूर्ण पगार मिळत नाही, काहींचे व्यवसाय दुर्दैवाने पूर्णच बंद पडले आहे किंवा काहींचे व्यवसाय कसेबसे सुरू आहेत.

अशा परिस्थितीत काहीनाकाही साइड बिझनेस करून चांगले घसघशीत उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे. तसे करण्यामुळे आपल्या घराला आर्थिक आधार तर मिळेलच त्याशिवाय ह्या अस्थिरतेच्या काळात आपली मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी देखील त्याचा उपयोग होऊ शकेल.

हे व्यवसाय फक्त आर्थिक अडचणीत असणारेच नव्हे तर कोणीही करू शकतील असे आहेत. ज्यांच्याकडे थोडा रिकामा वेळ, काही स्किल्स आहेत अशा गृहिणी, विद्यार्थी आणि सीनियर सिटीजन देखील हे व्यवसाय सहजपणे करून भरपूर कमाई करू शकतात.

चला तर मग आपण आज या व्यवसायांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

भरपूर कमाई करून देणारे साईड बिझनेस

१. ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरु करणे

जर तुम्ही शैक्षणिक विषयातील तज्ञ असाल किंवा योग, चित्रकला, हस्तकला, नृत्य इत्यादी कलांपैकी एखाद्या कलेत निपुण असाल तर संबंधित विषयाचे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरु करणे हा एक उत्तम साइड बिझनेस असू शकेल. सध्या शाळा घरून असल्यामुळे सर्व विद्यार्थी सतत घरातच बांधलेले असतात अशावेळी असा एखादा छंद वर्ग किंवा शिकवणी सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह वाढू शकेल.

तुमच्या जवळ असणारी कला अशाप्रकारे उत्तम रीतीने वापरली जाऊन तुम्हाला घसघशीत उत्पन्न देखील मिळू शकेल.

ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबरच निरनिराळ्या परकीय भाषा, बेकिंग क्लासेस, करियर गायडन्स, काउन्सेलिंग, आर्थिक व्यवस्थापन यापैकी कोणत्याही एका विषयाची निवड करता येऊ शकेल.

आपल्या प्रशिक्षण वर्गाची जाहिरात करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाईन माध्यमांचा वापर देखील करू शकता.

तसेच सुरवातीचे काही डेमो क्लासेस निशुल्क देऊन विद्यार्थ्यांमध्ये तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करू शकता. असे करण्यामुळे तुमची विश्‍वासार्हता वाढून तुमचे प्रशिक्षण वर्ग उत्तम प्रकारे चालू शकतील.

२. ट्रान्सलेटर (भाषांतरकार)

जर तुम्ही कोणत्याही एखाद्या परकीय भाषेमधील तज्ञ असाल तर भाषांतर करून देण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्या आणि व्यवस्थापनांकडून मागणी असू शकते.

जरी तुम्ही भारतीय भाषा आणि इंग्रजी या भाषेतील तज्ञ असाल तरी देखील तुम्ही भाषांतराचे काम करू शकता. जगभरातील अनेक कंपन्या इंग्रजी ही भाषा वापरत नाहीत, त्या त्या देशाची भाषा तिथे वापरली जाते. उदाहरणार्थ जर्मनी किंवा जपान.

असे असताना जर तुम्ही जर्मन भाषेचे तज्ञ असाल तर त्या देशातील कंपन्यांकडे येणारे इंग्रजीत असणारे कायदेशीर डॉक्युमेंट किंवा इतर कागदपत्र भाषांतरित करून देण्याचे काम तुम्ही करू शकाल.

अशा पद्धतीच्या कामाला जगभरात सगळीकडे भरपूर मागणी आहे. तुम्हाला जर असे काम देणार्‍या योग्य कंपन्या माहित असतील तर या पद्धतीचे काम करून तुम्ही घसघशीत साईड इन्कम कमवू शकता.

महत्त्वाचे म्हणजे या कामासाठी वेळेचे बंधन नसते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळ निवडून त्यांनी पुरवलेला मजकूर भाषांतरित करून त्यांना देऊ शकता. याचाच अर्थ अगदी घरबसल्या आपल्या वेळेच्या सोयीनुसार करण्याचा हा एक उत्तम साइड बिझनेस आहे.

३. घराचा काही भाग लहान मोठ्या कार्यांसाठी भाड्याने देणे

सध्याच्या काळात कोविडची तिसरी लाट आलेली असल्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने कोणत्याही लहान मोठ्या समारंभात 50 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असू नये असा नियम केला आहे.

त्यामुळे मोठी मोठी कार्यालय घेऊन लग्न मुंजी सारखे समारंभ करण्यापेक्षा लोकांचा कल छोट्या जागेत समारंभ करण्याकडे आहे.

जर तुमच्याकडे असे कार्य पार पडू शकेल अशा पद्धतीची जागा उपलब्ध असेल तर ती भाड्याने देऊन तुम्ही चांगले उत्पन्न कमवू शकता.

इतरही लहान मोठे कार्यक्रम, काही प्रदर्शने, किंवा कोचिंग क्लासेस यांना तुमच्याकडे उपलब्ध असणारी जागा भाड्याने देऊन तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकेल.

जर तुमचे घर मोठे असेल आणि तुमच्याकडे एखादी जास्तीची खोली उपलब्ध असेल तर ती एखाद्या विद्यार्थ्याला भाड्याने देऊन देखील तुम्ही साईड इन्कम मिळवू शकता. अर्थातच अशा पद्धतीने आपले घर किंवा घराचा काही भाग भाड्याने देण्याआधी संपूर्ण खबरदारी घेऊन आणि क्लायंट अथवा भाडेकरूची संपूर्ण माहिती मिळवून मगच हा व्यवहार करावा. अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता असते.

४. तुमची कार भाड्याने देणे

जर तुम्ही सध्या वर्क फ्रॉम होम करत असाल आणि तुमची गाडी पार्किंगमध्ये नुसतीच उभी असेल तर तुम्ही ती गाडी भाड्याने देण्याचा विचार करू शकता.

वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांना आपली गाडी भाड्याने देऊन चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकेल. त्याच प्रकारे जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्ही चांगले ड्रायव्हिंग करू शकत असाल तर तुम्ही स्वतः देखील टूर अँड ट्रॅव्हल्सचा छोटेखानी व्यवसाय करू शकता.

लोकांच्या आवश्यकतेनुसार त्यांना गाडी आणि ड्रायव्हर पुरवणे हा एक उत्तम साइड बिझनेस असू शकतो. असे करण्यामुळे तुमची गाडी वापरात देखील राहील आणि तुम्हाला काही उत्पन्न देखील मिळू शकेल.

परंतु अर्थातच हे करताना कोविडसंबंधीचे सर्व प्रोटोकॉल्स पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशी सर्व खबरदारी अवश्य घ्या.

५. घरगुती पदार्थ, डबे किंवा ताज्या भाज्या आणि फळे पुरवणे

सध्या कुटुंबातील सर्व माणसे आजारी असणे किंवा घरातील कर्ती माणसे आजारी पडल्यामुळे घराची घडी कोलमडणे असे प्रसंग वारंवार उद्भवत आहेत.

अशा अडचणीत असणाऱ्या कुटुंबांना स्वच्छ आणि पौष्टिक पद्धतीने तयार केलेला जेवणाचा डबा पुरवणे हा एक उत्तम घरगुती साइड बिझनेस आहे.

त्याच प्रकारे काही इतर घरगुती टिकाऊ पदार्थ जसे भाजण्या, तयार पीठे, लाडू-वड्या इत्यादी तयार करून विकणे आणि घाऊक प्रमाणात ताज्या भाज्या आणि फळे आणून मागणीनुसार लोकांना पुरवणे हादेखील एक उत्तम साइड बिझनेस होऊ शकेल.

निवडलेल्या भाज्या आणि ताजी उत्तम प्रतीची फळे यांना घरोघरी खूप मागणी असते. जर तुम्ही घाऊक भाज्या मिळणार्‍या मार्केटमध्ये जाऊन भाजी आणि फळे आणली आणि तुमच्या परिसरातील लोकांना ती मागणीनुसार पुरवली तरी यातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकेल.

सकाळी अथवा संध्याकाळी फावल्या वेळात हा व्यवसाय होऊ शकतो. त्यामुळे दिवसभरातील इतर कामे सांभाळून हा व्यवसाय सहज करता येईल.

स्वच्छता आणि क्वालिटी यांचा दर्जा जर चांगला राखला तर अशा व्यवसायामध्ये लोकप्रियता मिळण्यास वेळ लागत नाही.

तर मित्र मैत्रिणींनो हे आहेत असे पाच व्यवसाय जे तुम्हाला फावल्या वेळात घसघशीत साईड उत्पन्न मिळवून देऊ शकतात.

तुम्ही आर्थिक अडचणीत असाल किंवा नसाल तरीही हे व्यवसाय सुरू करण्या संबंधी जरूर विचार करा आणि चांगले आर्थिक उत्पन्न मिळवा.

याबाबतीतले तुमचे अनुभव आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख जरुर शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय