म्हाडा म्हणजे ‘द महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी’.
‘महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऍक्ट’ अंतर्गत १९७६ साली म्हाडाची स्थापना झाली. म्हाडातर्फे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध करून दिली जातात.
समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या गटापासून ते अगदी श्रीमंत असणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी वेळोवेळी म्हाडातर्फे लॉटरी सिस्टीम जाहीर केली जाते.
आज आपण याबाबतीतील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये म्हाडाची मुख्य ऑफिसेस आहेत. कोकण, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि अमरावती ही त्यातील काही प्रमुख ऑफिसेस आहेत.
या सर्व ठिकाणी म्हाडातर्फे सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात नवीन बांधकाम केलेली घरे उपलब्ध करून दिली जातात. म्हाडाने अशा घरांसाठी काही प्रकार ठरवले आहेत.
१. EWS ( इकॉनोमिकली विकर सेक्शन)- आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटातील लोकांसाठीची घरे.
या घरांची किंमत साधारणपणे रु. १५ ते रु. २० लाख इतकी असते.
२. LIG (लोअर इन्कम ग्रुप) – कमी उत्पन्न गटातील लोकांसाठीची घरे. या घरांची किंमत साधारणपणे रु. २० ते रु. ३५ लाख इतकी असते.
३. MIG (मिडल इन्कम ग्रुप) – मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठीची घरे. या घरांची किंमत साधारणपणे रु. ३५ ते रु. ८० लाख इतकी असते.
४. HIG (हाय इन्कम ग्रुप) – भरपूर उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांसाठीची घरे. या घरांची किंमत साधारणपणे रु. ८० लाख ते रु. ५.५ करोड इतकी असते.
वरील पैकी ज्या उत्पन्न गटात आपण असू त्यानुसार आपण म्हाडाच्या लॉटरीचे एप्लीकेशन भरू शकतो. त्यासाठी इतरही काही नियम आहेत.
म्हाडातर्फे घर मिळवण्यासाठी खालील पात्रता निकष आहेत.
१. म्हाडाकडे अर्ज करणारा अर्जदार किमान १८ वर्षे वयाचा असला पाहिजे.
२. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी अर्जदाराकडे महाराष्ट्र सरकारने दिलेले डोमिसाइल सर्टिफिकेट असणे अत्यावश्यक आहे.
३. अर्जदाराच्या चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला तसेच त्याला मिळू शकणाऱ्या इतर उत्पन्नाबद्दलची माहिती देणे आवश्यक आहे.
अर्जदाराला मिळणाऱ्या उत्पन्नानुसार तो कोणत्या आर्थिक गटातील आहे याची छाननी करून त्यानुसार वरील चार प्रकारांपैकी योग्य घरासाठी तो अर्ज करू शकतो.
४. अर्जदाराकडे स्वतःचे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- कॅन्सल्ड चेक
- डोमिसाईल सर्टिफिकेट
- ड्रायविंग लायसेन्स
- पासपोर्ट साइज फोटो
- बर्थ सर्टिफिकेट
- फोन नंबर आणि ईमेल आयडी
वेळोवेळी म्हाडातर्फे वेगवेगळ्या ठिकणच्या घरांच्या लॉटऱ्या जाहीर केल्या जातात.
त्यानुसार दिलेला तारखेच्या आत अर्जदाराने अर्ज करायचा असतो. म्हाडा लॉटरी साठी अर्ज करणे आता अगदी सोपे झाले आहे. म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.
त्यासाठी तिथे आपले लॉगिन तयार करून आवश्यक ती माहिती भरून अर्जाचे शुल्क भरायचे असते. त्यानंतर अर्ज सबमिट करायचा. म्हाडाची अधिकृत वेबसाइट https://lottery.mhada.gov.in/ ही आहे.
त्यानंतर म्हाडातर्फे लॉटरीची लिस्ट जाहीर केली जाते आणि पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन केले जाते.
जर म्हाडा लॉटरीमध्ये तुमचे नाव आले नाही तर सुरुवातीला बूकिंग करण्यासाठी तुम्ही भरलेले पैसे म्हाडातर्फे ७ दिवसात परत केले जातात.
म्हाडाबद्दल काही प्रश्न नेहेमी विचारले जातात. आज आपण त्यांची उत्तरे पाहूया
१. म्हाडा सरकारी आहे का खाजगी?
उत्तर – म्हाडा ही महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेली हाऊसिंग अथॉरिटी आहे. ह्या योजनेद्वारे निम्न आर्थिक गटातील लोकाना देखील घर मिळावे हा सरकारचा प्रयत्न आहे.
२. म्हाडातून घेतलेला फ्लॅट भाड्याने देता येतो का?
उत्तर – होय, म्हाडातून घेतलेला फ्लॅट भाड्याने देता येतो. त्यासाठी घरमालकाला म्हाडाकडून NOC मिळवावी लागते. त्यासाठीचे शुल्क साधारण रु. २००० ते रु. ५००० इतके असते. ही शुल्क घराच्या प्रकार आणि किमतीवरून ठरवले जाते.
त्याचप्रमाणे घरमालकास भाडेकरुशी भाडेकरार करून त्याची कागदपत्रे म्हाडाला सबमिट करावी लागतात.
३. म्हाडातून घेतलेला फ्लॅट विकता येतो का?
उत्तर- होय, म्हाडातून घेतलेला फ्लॅट विकता येऊ शकतो. परंतु कोणताही म्हाडा फ्लॅट घेतल्यापासून ५ वर्षांनंतरच विकता येतो. त्याआधी विकता येत नाही. त्यामुळे जे लोक म्हाडाचे फ्लॅट रिसेलने खरेदी करतात त्यांनी सदर फ्लॅट खरेदी करून ५ वर्षे झाली आहेत ना ह्याची खात्री करून घेणे आवश्यक असते. तसेच इतर सर्व कागदपत्रे देखील तपासून घेणे आवश्यक असते.
तर मित्र मैत्रिणींनो, ही आहे म्हाडातर्फे दिल्या जाणाऱ्या घरांबाबतची माहिती. वेळोवेळो म्हाडातर्फे जाहीर होणाऱ्या लॉटरी स्कीमवर नक्की लक्ष ठेवा आणि तुमच्या आवश्यकतेनुसार घर बूक करा. आम्ही देखील वेळोवेळी ह्या लॉटरीची माहिती तुम्हाला देऊ. त्यासाठी मनाचेTalks चे फेसबुक पेज फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि व्हाट्स ऍप चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी येथे क्लिक करा.
ह्यासंबंधी जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा.
तसेच ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा