घराच्या गच्चीचा वापर करून, मोठा नफा मिळवण्यासाठी करता येण्याजोगे 4 बिझनेस

तुमचे स्वतंत्र घर आहे का? घराला तुमच्या मालकीची स्वतंत्र गच्ची आहे का?

असे असेल तर त्या गच्चीच्या जागेचा वापर करून तुम्ही वेगवेगळे बिझनेस करू शकता.

असे बिझनेस करून तुम्ही घसघशीत कमाई करू शकता.

जर तुमचे स्वतंत्र घर म्हणजेच बंगला असेल किंवा एखाद्या इमारतीत फ्लॅट असून त्याला स्वतंत्र गच्ची असेल (पेंट हाऊस) तर त्या जागेचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर तुम्ही करू शकता.

रिकाम्या पडून राहणाऱ्या त्या जागेचा वापर करून तुम्ही पैसे कमवू शकता. कसे ते आपण पाहूया –

१. टेरेस फार्मिंग ( गच्चीवरील शेती )

अगदी कमी खर्चात सुरू करता येण्यासारखा आणि भरपूर नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. तुमच्या गच्चीवरील जागेत तुम्ही निरनिराळी फुलझाडे, फळांची झाडे आणि भाज्यांचे वाफे तयार करू शकता.

त्यातून मिळणारी फुले, फळे आणि भाज्या यांचा वापर तुम्ही घरी तर करू शकताच परंतु त्याशिवाय तुम्ही या सर्व गोष्टी योग्य किमतीला विकू सुद्धा शकता.

अशा रीतीने सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्यांना, फळांना सध्या खूप मागणी असते. त्यामुळे या व्यवसायातून भरपूर नफा मिळवणे शक्य आहे.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगल्या प्रतीची माती, चांगली बी बियाणे आणि नैसर्गिक खत यांची आवश्यकता असते.

सुरुवातीला झाडांची निगा राखण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात. परंतु एकदा का सर्व झाडे जोमाने वाढू लागली की उत्तम फुले फळे आणि भाज्या मिळू लागतात.

मग सकाळ-संध्याकाळ थोडा वेळ गच्चीत काम केले तरी देखील पुरेसे ठरते.

त्यामुळेच माफक खर्चात आणि कमी वेळात भरपूर उत्पादन देणारा असा हा व्यवसाय आहे. यासाठीची एकमेव अट म्हणजे गच्चीत पुरेसे ऊन येत असले पाहिजे. तसेच पाण्याची देखील सोय हवी.

२. गच्चीवर जाहिरातीचे फलक लावणे

तुमचे घर जर मोक्याच्या जागेवर असेल तर तुमच्या गच्चीची जागा तुम्ही जाहिरातींच्या फलकांसाठी भाड्याने देऊ शकता.

उत्तमोत्तम कंपन्यांच्या जाहिरात फलकांसाठी जाहिरात एजन्सीज भरपूर भाडे देऊ करतात. यासाठी तुम्हाला याचा जाणीवपूर्वक शोध घ्यावा लागेल.

अशा रितीने केवळ गच्चीवर लावलेल्या होर्डिंग मधून तुम्हाला भरपूर प्रमाणात पैसे मिळू शकतात.

३. मोबाईल टॉवर उभा करणे

आजकाल खेड्यापासून ते शहरापर्यंत मोबाईलचा वापर अगदी अनिवार्य झाला आहे.

त्यामुळे मोबाइल कंपन्यांना जागोजागी त्यांचे टॉवर उभे करण्याची निकड भासते. जर तुमचे घर अगदी मोक्याच्या ठिकाणी असेल आणि घराची गच्ची उपलब्ध असेल तर तिथे मोबाईल कंपनीचा टॉवर उभा करण्यास परवानगी देऊन तुम्ही अतिशय उत्तम कमाई करू शकता.

मोबाईल टॉवर उभा करण्याच्या बदल्यात मोबाईल कंपन्या भरपूर भाडे देऊ करतात. तसेच त्यांचा भाडेकरार कमीत कमी दहा ते पंधरा वर्षांचा असतो. त्यामुळे तितका काळ तुम्हाला हमखास उत्पन्न मिळेल याची हमी असते.

आणि हो मोबाईल टॉवर च्या नावाने फसवणूक करणारे काही भामटे सुद्धा बाजारात सक्रिय आहेत. तेव्हा नीट शोध घेऊन चांगल्या कम्पनी बरोबर काम सुरू करण्याची सतर्कता घेणे मात्र गरजेचे आहे.

४. गच्चीची जागा भाड्याने देणे

तुमच्याकडे घराच्या गच्चीवर भरपूर जागा उपलब्ध असेल परंतु तुम्हाला स्वतःला तिथे काही व्यवसाय करण्याची इच्छा नसेल तर, असे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना तुम्ही ती जागा भाड्याने देऊ शकता.

असे करण्यामुळे त्या जागेचा चांगला वापर होईल, एखाद्या छोट्या व्यावसायिकाला मदत होईल आणि तुम्हालाही काही प्रमाणात नियमित उत्पन्न मिळू शकेल.

अर्थात आपली जागा भाड्याने देताना सर्व प्रकारची खबरदारी घेऊनच ती भाड्याने द्यावी. भाडेकरू, त्याचा व्यवसाय यासंबंधी सर्व कायदेशीर माहिती आधी करून घ्यायला हवी.

अशा प्रकारच्या कमाई बरोबरच तुमच्या गच्चीची जागा तुमची आर्थिक बचत देखील करून देऊ शकते. कसे ते आपण पाहूया…

१. तुमच्या गच्चीवरील जागेत तुम्ही सोलर पॅनल उभे करू शकता. असे करण्यासाठी सुरुवातीला जरी थोडा खर्च आला तरी त्यानंतर तुमच्या विजबिलात मात्र खूप मोठी बचत होऊ शकते.

त्याच बरोबर सोलर पद्धतीने पाणी गरम करणे, सोलर कुकरचा वापर करून अन्न शिजवणे अशाप्रकारे गच्चीवरील जागेचा उपयोग करून आर्थिक बचत करता येऊ शकते.

२. गच्चीवरील जागेत एखादी लहानशी खोली बांधून ती भाड्याने देणे असे देखील तुम्ही करू शकता.

अशी खोली बांधताना सुरुवातीला तुमचे काही पैसे खर्च होतील परंतु ती जागा एक तर तुम्हाला स्वतःला वापरायला मिळेल किंवा भाड्याने देऊन त्यातून कायमस्वरूपी उत्पन्न मिळवता येऊ शकेल.

तर मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घराची गच्ची जी एरवी रिकामी पडून असते तिचा चांगल्याप्रकारे सदुपयोग करून त्यातून भरपूर आर्थिक उत्पन्न मिळवू शकता किंवा आर्थिक बचत करू शकता.

याबाबतचे तुमचे अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय