विजयपथ सिंघानिया यांचा चुकलेला निर्णय!

रेमण्डचे मालक विजयपथ सिंघानिया यांनी सर्व आई-वडिलांना आपल्या अनुभवातून दिलेला सल्ला

रेमंड हे नाव आपल्याला नवीन नाही… कुणालाही कापड खरेदी करायचा असेल तर चला रेमंड मध्ये जाऊया असे आपण नक्कीच ऐकेल असेल.

अगदी आजच्या घडीलाही भारतातल्या अनेक शहरांमध्ये रेमंड कपड्यांचे मोठे शोरूम्स दिमाखात उभे आहेत; आपली गुणवत्ता कायम राखून लोकांना योग्य दरात अप्रतिम वस्तू प्रदान करण्यासाठी.

आज आपण याच रेमंड कंपनीच्या कर्त्या धरत्या मालकाचा एक चुकलेला निर्णय यावर चर्चा करणार आहोत.

ज्या मनुष्याने जीवनात सुरुवातीपासून संघर्ष करत भलीमोठी कंपनी उघडली आणि त्यात सातत्याने स्वतःला झोकून देऊन काम केले त्या माणसाचा निर्णय कसा काय चुकला असेल?

विजयपथ सिंघानिया हे रेमंड या कंपनीचे भूतपूर्व सर्वेसर्वा ज्यांचे नाव भारतातल्या सर्वात मोठ्या व्यवसायिंकामधे गणले जात होते त्यांनी आपल्या आत्मकथेच्या माध्यमातून आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली त्यावर प्रकाश टाकलेला आहे.

यासोबतच त्यांच्या वैय्यक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गोष्टींचा उलगडा त्यांनी “An Incomplete Life” या त्यांच्या आत्मकथेत केला आहे.

एक व्यावसायिक होण्यासोबतच विजयपथ सिंघानिया हे एक वैमानिक देखील आहेत. वयाच्या ६७व्या वर्षी सिंघानिया यांनी हॉट एअर बलूनमधून सर्वाधिक उंची मिळवण्याचा जागतिक विक्रम केला.

सिंघानिया यांनी 1988 मध्ये यूके ते भारतापर्यंत एकट्या मायक्रोलाइट फ्लाइटचा जागतिक विक्रमही केला आहे. सिंघानिया यांना 5,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. 1994 मध्ये, त्यांनी 24 दिवसांच्या 34,000 किमी अंतराच्या फेडरेशन एरोनॉटिक इंटरनॅशनल एअर रेसमध्ये सुवर्णपदक जिंकले.

2003 मध्ये, त्यांना भारत सरकारकडून तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, 2005 मध्ये त्यांना रॉयल एरो क्लबचे सुवर्ण पदक आणि 2006 मध्ये, पद्मभूषण, भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री. सिंघानिया यांचे बालपण सावत्र आईजवळ गेलं असल्याने थोडे कठीण होते. वयाच्या १२व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. चुलत भावांसोबत त्यांनी अनेक लहान मोठे उद्योग केले. प्रगतिची पावले पुढे टाकत त्यांनी रेमंड कंपनी प्रस्थापित करून यशाची शिखरं गाठली.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेव्हा वडील एखाद्या पदावरून निवृत्त होतात तेव्हा ते सर्व आर्थिक व्यवहार मुलांना सुपूर्त करून उतारवयात असलेले आयुष्य समाधानाने जगतात. ही परंपरा वर्षो न गणती चालत आलेली आहे.

सिंघानिया यांनीही तेच केले. रेमंड मधून बाहेर पडून आपल्या जवळ असलेले ३७.१७ % शेअर्स २०१५ साली त्यांनी त्यांचा धाकटा मुलगा गौतम यास बहाल केले.

साल २०००-२००१ पासून व्यवसाय संबंधी सिंघानिया आणि त्यांच्या कुटुंबातमध्ये बरेच वाद झाले. ते वाद संपुष्टात आणण्यासाठी बरेच प्रयत्न केल्या गेले. जेव्हा गोष्टी अति बिघडत गेल्या तेव्हा मात्र कष्टाने उभारलेले साम्राज्य रसातळाला जाऊ नये म्हणून श्री. सिंघानिया याना ठाम निर्णय घ्यावा लागला.

बिघडलेल्या परिस्थितींसोबत व्यवसाय करणे अवघड होऊन बसले होते.

व्यवसायिक आणि कौटुंबिक वादावादी टाळण्यासाठी श्री.सिंघानिया यांनी रेमंडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून राजीनामा देण्याचे ठरविले जी त्यांची घोडचूक ठरली.

याहून वाईट असे कि सिघनीया यांनी राजीनामा दिला तेव्हा ते लंडनमध्ये होते. त्यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांचा राजीनामा स्वीकारल्या गेला. आणि त्यानंतर जेव्हा पिता पुत्र समोरा समोर आले तेव्हा त्या बाबतीत त्यांच्यात कुठलाही संवाद झाला नाही. हे अत्यंत मन दुखावणारे होते.

त्यानंतर सिंघानिया यांची रेमंडचे ‘अध्यक्ष एमेरिटस’ म्हणून कंपनीच्या सेवांसाठी बोर्डाने नियुक्ती केली.

त्यानंतर त्यांना जाणीव होऊ लागली कि किती त्यांचे दुर्भाग्य असावे. आपल्याच पोटच्या गोळ्याने विश्वासघात केल्याची भावना त्यांच्या मनात घर करून गेली.

जेव्हा त्यांनी आपले सर्व शेअर्स गौतम यांना देण्याचे ठरविले होते, तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना निर्णय बदलण्याचा सल्ला नक्कीच दिला होता, पण एका बापाचा मुलावर असलेला विश्वास इतका दृढ होता कि त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही.

श्री. सिंघानिया हे अत्यंत स्वाभिमानी आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या धाडसी स्वभावाचे दर्शन त्यांच्या गगन भरारीतून आपणास लक्षात येईल.

तारुण्यापासून आता वार्धक्याकडे सुरु असलेला प्रवास आणखी खडतर होतो आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात असुरक्षितपणाची भावना घिरट्या घालते आहे. तारुण्याच्या संघर्षापासून ते वार्धक्याच्या वाटेवर आलेल्या अनेक परिस्थितींचा जीवनपट आज त्यांच्या डोळ्यांसमोरून जसा तरळतो आहे तसे त्यांना आणखी वाईट वाटत असावे.

घराघरात रेमंड चे नाव पोहोचले होते. सिंघानिया यांनी रक्ताचे पाणी करून या कंपनीची नुसतीच पायाभरणी केली नाही तर तिला वाढवले, जपले. आणि आज मात्र त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली.

आपण मूर्ख ठरलो आणि आपल्याच मुलाकडून फसवल्या गेलो म्हणून त्यांचा आत्मविश्वास आता डगमगू लागला आहे.

वैकुंठ दिशेने जाण्याचा मार्ग आणि वेळ इतकी खेदजनक असेल त्यांना कधीच वाटले नव्हते.

तरुण पिढीला संधी नक्कीच द्यावी, निर्णय घेण्याचे अधिकारही द्या पण कुणालाही मरेपर्यंत आर्थिक व्यवहार संपूर्ण सुपूर्त करू नये हे त्यांनी या त्यांच्या आत्मकथेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मुलांवर विश्वास ठेवू नये असे आमचे मुळीच सांगणे नाही.

पण तो कितपत ठेवावा आणि व्यवहाराच्या बाबतीत कोणत्या सोयी किंवा तरतुदी करून ठेवाव्यात याचा विचार मात्र प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. स्वतःचा विचार करून मग पुढच्या पिढीचा विचार करावा. त्यातून त्यांनाही संघर्षाची सवय आणि माय बापानी घेतलेल्या कष्टांची जाणीव होईल.

बागबान या चित्रपटाची आठवण करून देणारी श्री सिंघानिया यांची कहाणी खरोखरच विचार करण्यास भाग पडणारी आहे. एका प्रतिष्ठित कर्मयोग्याची त्याला भोवलेली चूक किती वेदनादायी असू शकते हे यातून स्पष्ट झाले. आपल्याला हा लेख आवडला असेल तर नक्की आपल्या मित्र मैत्रिणीसोबत सामायिक करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “विजयपथ सिंघानिया यांचा चुकलेला निर्णय!”

  1. Once detached don’t think over it if so,you will ahead otherwise couldn’t move on. And this is the proper way of to be happy 😊

    Reply
    • कितीही विश्वास असला तरीही स्वतः सर्वकाही मुलाना देऊ नये, स्वतः साठी ठेवणे जरुरी आहे,

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय