गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी चार नियम!!

गमावलेला आत्मविश्वास परत मिळवा!!

कोणतेही काम करताना तुम्हाला आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो का ? असे असेल तर या चार सोप्या स्टेप्सनी तुमचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवा!!

कोणतेही काम सुरू केल्यानंतर “मला हे काम जमेल का? “, “मी हे काम व्यवस्थित पूर्ण करू शकेन का?“, “हे काम करण्याची माझी पात्रता आहे का?“ अशा प्रश्नांची जर तुमच्या मनात गर्दी होत असेल तर त्याचे कारण आत्मविश्‍वासाचा अभाव हेच आहे.

बरेच वेळा अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनाला पडतात तसेच काही वेळा आपल्या आजूबाजूचे लोक असे प्रश्न आपल्याला विचारून आपला आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न करतात.

पण थांबा, असे घडणारे काही तुम्ही एकटेच नाही.. बहुतेक सर्व लोकांच्या बाबतीत केव्हा ना केव्हा आत्मविश्वासाची कमतरता दिसून येतेच.

परंतु या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढण्याची जबाबदारी आपलीच असते. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला चार अगदी सोप्या स्टेप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही गमावलेला आत्मविश्वास अगदी सहज परत मिळवू शकाल.

१. आत्मविश्वास गमावण्याचे मुख्य कारण शोधून काढा

कोणत्याही परिस्थितीत नेमक्या कोणत्या कारणामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो हे सर्वप्रथम शोधून काढा. त्यासाठी तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, तुमचे स्वतःचे वागणे, तुमचे इतरांशी असणारे नाते आणि तुमची विचार करण्याची पद्धत आणि तुमची काम करण्याची क्षमता याचा सर्वांगीण अभ्यास करा. स्वतःच्या परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करून स्वतःला खालील प्रमाणे काही प्रश्न विचारा.

१. तुम्ही रूढ अर्थाने यशस्वी मानल्या गेलेल्या लोकांशी तुमची तुलना करत आहात का ? आणि तसे करण्यामुळे यशस्वी होण्यासाठी प्रेरणा वाटण्याऐवजी तुमचा आत्मविश्वास कमी होत आहे का याचा विचार करा.

२. तुम्ही स्वतःकडून तुमच्या कुवतीच्या बाहेरच्या अपेक्षा करीत आहात का ? प्रत्येक गोष्टीत आपण परफेक्ट असावे असा तुमचा अट्टाहास असतो का ? आणि तसे करणे न जमल्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो का याचा विचार करा.

३. वाढत्या वयामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत आहे का ? वाचकांनो, लक्षात घ्या की वाढते वय हे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर जाणवू शकते. तिशीमध्ये असताना विशीत असताना करायचो तितके काम आपण करू शकत नाही असे वाटून खरेतर तरुण असणारी तिशीतली मंडळी देखील आत्मविश्वास गमावू शकतात. या बाबीचा जरूर विचार करा.

४. तुमच्या आजूबाजूचे लोक म्हणजे नातेवाईक , मित्रमंडळी, सहकारी तुम्हाला कामासाठी प्रोत्साहन न देता उलट नकारात्मक टिप्पणी करून तुमचा आत्मविश्वास खच्ची करत आहेत का याचा विचार करा.

२. आपण कोण आहोत, आपली कुवत काय याची स्वतःलाच जाणीव करून द्या

सर्वप्रथम पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितल्यानुसार आपला आत्मविश्वास कमी होण्याचे कारण शोधल्यानंतर त्यावर काम करणे आवश्यक आहे. तसे करण्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्यामध्ये किती गुण आहेत, कोणतेही काम करण्याची आपली क्षमता किती चांगली आहे हे वारंवार स्वतःला पटवून द्या. असे वागणे कदाचित उद्धटपणाचे वाटू शकते परंतु आपली स्वतःची क्षमता ओळखून त्यानुसार स्वतःबद्दल योग्य तो अभिमान बाळगणे आत्मविश्वास वाढण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असते.

मनुष्याच्या स्वभावानुसार बहुतेक वेळा सर्वजण आपल्या बाबतीत घडलेल्या नकारात्मक घटना जास्त प्रमाणात लक्षात ठेवतात. परंतु तसे केल्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. यासाठी जीवनात वेळोवेळी आपल्याबाबत घडलेल्या सकारात्मक घटना आणि आपण मिळवलेले यश याची स्वतःला वारंवार आठवण करून द्यावी. असे केल्यामुळे आपणही निश्चितपणे काही चांगले करू शकतो असा विचार मनात येऊन आपला आत्मविश्वास बळावतो.

अनेक वेळा आपल्या बाबतीत घडलेल्या अगदी लहान लहान चांगल्या गोष्टी देखील आपल्या मनाला आनंद देऊन जातात. तसेच आपला आत्मविश्वास वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे स्वतःला वेळोवेळी मिळालेल्या यशाची मनातल्या मनात सतत उजळणी करत राहावी.

३. मनाला उत्साह देणाऱ्या गोष्टी करा

आत्मविश्वासाचा अभाव असला की माणूस आपोआपच नैराश्याकडे झुकू लागतो. असे होऊ नये म्हणून आत्मविश्वासाची कमतरता जाणवू लागल्यास आपल्या मनाला उत्साह देणाऱ्या कामांमध्ये स्वतःला झोकून द्या. मनाला उत्साह देणाऱ्या कामांमध्ये चित्रकला, हस्तकला, बागकाम, गायन, नृत्य यांपैकी एखाद्या कलेचा समावेश होतो. त्याच प्रमाणे निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करणे, उत्साह आणि आनंद देणारी गाणी ऐकणे, प्रोत्साहनपर भाषणे ऐकणे या गोष्टी करण्यामुळे देखील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

अशा प्रकारचे मनाला आनंद देणारे छंद जोपासल्यामुळे ज्यांच्या आत्मविश्वासात भरपूर प्रमाणात वाढ झाली आहे अशा लोकांच्या गोष्टी वाचल्यामुळे सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळू शकते.

योगाभ्यास, प्राणायाम आणि निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम देखील मनाच्या सकारात्मकतेसाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी उपयोगी ठरतात.

४. नकार द्यायला शिका

आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पाहिलेल्या गोष्टी ज्यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्‍वासाची कमतरता निर्माण होते अशा गोष्टींना नकार द्यायला शिका. उदाहरणार्थ सोशल मीडिया वरील काही उदाहरणे वाचून प्रेरणा वाटण्याऐवजी जर तुमचा आत्मविश्वास कमी होत असेल तर अशी उदाहरणे वाचणे बंद करा.
तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचा आत्मविश्वास कमी करत असतील तर त्यांच्याशी संवाद साधणे कमी करा.

याचा थोडक्यात अर्थ असा की ज्या गोष्टींचा तुमच्या मनावर, तुमच्या आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम होतो अशा गोष्टी करणे कटाक्षाने टाळा. असे नकार देणे सुरुवातीला जड जाऊ शकते, परंतु निर्धाराने ते काम करा. सवयीने असे करणे सहज जमू लागते.

असे करण्यामुळे काही दिवसातच आपला आत्मविश्वास पूर्ववत होऊन तो वाढीस लागला आहे हे तुमच्या लक्षात येईल.

मथितार्थ

‘आत्मविश्वासाचा अभाव’ या परिस्थितीशी आपल्यापैकी प्रत्येकाने केव्हा ना केव्हा सामना केलेला असतोच. अशावेळी वरील चार सोप्या स्टेप्सचा वापर करून प्रत्येकाने आपला आत्मविश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करावा. “ माझ्या परवानगीशिवाय कोणीही माझ्यावर नकारात्मक टीका टिप्पणी करू शकत नाही. माझे मनोबल खच्ची करण्याचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही. “ असे सतत स्वतःच्या मनाशी घोकत राहावे. असे करण्यामुळे आपला गमावलेला आत्मविश्वास निश्चितपणे परत मिळू शकतो.

तर मित्र मैत्रिणींनो, लेखात सांगितलेल्या चार सोप्या स्टेप्सचा विचार जरूर करा आणि आपला कमी झालेला आत्मविश्वास वाढवा. याबाबत तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच या माहितीचा जास्तीत जास्त लोकांना उपयोग व्हावा म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 Response

  1. MY SETUP EXCEL 2021 says:

    Khup Chan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!