सोन्यात गुंतवणूक करण्याच्या विविध योजना

सोन्यासाठी भारतीयांची मानसिकता

सोने हा धातू भारतीयांच्या (विशेषतः स्त्रियांच्या) जिव्हाळ्याचा विषय आहे. जरी सोन्याऐवजी इतर अनेक धातू, प्लास्टिक, लाकुड, शिंपले कागद यापासून दागिने बनवता येत असले तरी सर्वांची पसंती ही सर्वप्रथम सोन्यास असते.

सोन्याची साठवणूक करताना असलेली जोखिम, दागिने करताना त्यात करावी लागणारी अन्य धातूंची मिसळ करण्याची आवश्यकता, दागिने मोडतांना येणारी घट आणि बी. एस. आई. या प्रामाणिकरणाची नसलेली सक्ती यामुळे आज अनेक गुंतवणूकतज्ञ सोन्यामधील गुंतवणूक फारशी लाभदायक नाही असे सांगतात.

तरीही अनेक सराफांकडील दुकानातील गर्दी पहाता यामधे नजीकच्या काळात यात फार काही फरक पडेल असे वाटत नाही.

भारतात दरवर्षी चार टन सोने उत्पादित होत असताना आपण आठशे टन सोने आयात करतो .वल्ड गोल्ड कौन्सिलच्या मतानुसार सोने आयातीत आपला देश प्रथम क्रमांकावर आहे.

आपल्या चालू खात्यात येणारी तूट म्हणजे आयात आणि निर्यात यातील फरक (Current Account Deficit ) येण्यास सोन्याची आयात हे महत्वाचे कारण आहे. भारतीयांची मानसिकता, सराफांची एकाधिकारशाही, सरकारची राजकीय अपरिहार्यता आणि अधिक कर आकारणीमुळे बेकायदा व्यवहारात होणारी वाढ यामुळे ही तूट कमी करण्यावर अनेक बंधने येतात.

भारतीयांकडे आणि येथील अनेक मोठ्या देवस्थानांकडे कित्येक टन सोने साठून राहिल्याने मोठ्या प्रमाणात भांडवल त्यात अडकून पडले आहे.

अनेक जण परंपरेप्रमाणे सणासुदीला, वाढदिवसाला, लग्नाला सोने किंवा दागिने खरेदी करतात अडीअडचणीस उपयोगी येईल म्हणून ही खरेदी केली जाते. आपल्या उत्पन्नातील सरासरी तेरा टक्के रक्कम यात अडकवली जात असून प्रत्यक्षात अगदीच नाईलाज झाला तरच त्याची विक्री केली जाते.

सहसा यातून पैसे मिळवावे हा हेतू नसतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्कम अडकून रहाते. यातून कोणत्याही प्रकारची भांडवलनिर्मिती होत नाही.

सोन्यातून भांडवलनिर्मिती करण्यासाठीच्या योजना

investment-in-gold

यामधे बदल व्हावा म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF), सुवर्ण चलनीकरन योजना (Gold Monitization Scheme), सुवर्ण सार्वभौम योजना (Gold Sovergine Scheme) आणि सोन्याचे वायदे व्यवहार (Gold Futures) यांचा सामवेश आहे.

यामुळे धातुस्वरूपात ते न घेता अमूर्त स्वरूपात साठवता येते आणि गरज पडल्यास विकताही येते. त्यावर अल्प प्रमाणात उत्पन्नही मिळते. याला टक्कर देण्यासाठी काही मोठ्या काही सराफानी बॉन्ड अथवा ई. टी. एफ. स्वरूपातील सोन्याचे यूनिट खरेदी करून त्याचे दागिने बनवण्याच्या योजनेचा चालू केल्या आहेत.

अनेकांच्या सुवर्ण खरेदीच्या योजना असून दरमाह एक ग्राम सोने खरेदी केले असता अंतिम मुदतीला बोनस म्हणून सोने दिले जाते तर अनेक सोनार रिकरिंग योजनेप्रमाणे हप्ता घेत असून व्याज म्हणून शेवटचा देत असतात. यातून जमा रकमेवर व्याज म्हणून एक हप्ता भरला जातो.

जमा रकमेचे सोने अथवा दागिने घेतले जातात. व्याज या दृष्टीने सोन्यावर व्याज म्हणून सोने मिळणाऱ्या योजना अधिक फायद्याचा आहेत. काही जणांनी स्वतःच्या खाजगी गोल्ड डिपॉजिट योजना चालू केल्या असून यावर अधिक व्याज देवू केले आहे .

आवश्यकता नसताना धातुस्वरूपात सोने खरेदी करण्याऐवजी ते ई-गोल्ड स्वरूपात खरेदी करणे हे करसवलतीच्या दृष्टीने अधिक फायद्याचे आहे. या स्वरूपातील सोन्यावर संपत्तीकर लागू नाही. दीर्घ स्वरूपातील भांडवल करावरील लाभ ई. टी. एफ. (Gold E.T.F.) ला एक वर्षानी तर ई-गोल्ड यूनिटला तीन वर्षाच्या मुदतीने घेता येतो.

फंडहाउस कस्टोडीयन अथवा डिपॉझिटरीकडे सदर यूनिट मधील सोने सुरक्षित रहात असून यास नामांकन सुविधाही उपलब्ध आहे. सोन्यातील भावात होणाऱ्या चढ उताराचा लाभ घेण्यासाठी यातील वायदे व्यवहार उपयुक्त असून यासाठी लागणारे मार्जीन (Margin) अत्यल्प आहे.

याशिवाय या व्यवहारांना एक्चेंजची हमी आहे आणि आवश्यकता असल्यास त्याची डिलिव्हरी घेण्याचा पर्यायही आहे. तेव्हा यापुढे सोने खरेदी करताना या सर्वच गोष्टींचा विचार करावा. आपल्या वाचकांना सुवर्णसंचय करण्याच्या शुभेच्छा देऊन आजचा लेख संपवतो.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “सोन्यात गुंतवणूक करण्याच्या विविध योजना”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय