गृहिणी असल्याचा न्यूनगंड तुम्हाला वाटत असेल तर हे वाचा

ऑक्सफर्ड डिक्शनरीतसुद्धा HOUSEWIFE म्हणजेच ‘गृहिणी’ या शब्दाचा अर्थ ‘A MARRIED WOMAN WHOSE MAIN OCCUPATION IS CARING FOR HER FAMILY, MANAGING HOUSEHOLD AFFAIRS AND DOING HOUSEWORK.’

म्हणजेच ‘एक लग्न झालेली स्त्री जिचा मुख्य व्यवसाय कुटुंबाची काळजी घेणं, घराचे व्यवस्थापन करणं आणि घरातील कामं करणं हा आहे’ असा दिला आहे.

भारतात आशा खूप आया आहेत ज्या मुलं झाल्यांनतर आपला वेळ आपली शक्ती सगळे काही मुलं आणि आपले घर सांभाळण्यासाठी वापरतात.

बरेचदा अशा स्त्रिया ज्या नोकरी व्यवसाय करत नाहीत त्यांना त्यांच्या गृहिणी असल्याचा काहीसा न्यूनगंड असतो. कधी असा काही प्रश्न विचारला गेलाच कि तुम्ही काय करता, तर जरा नाराजीच्या सुरत ‘काही नाही मी आपली घरीच असते’ असे उत्तर त्या देतात.

कितीही साधं वाटत असलं तरी एक गृहिणी म्हणून आणि एक आई म्हणून त्या मोठं आभाळंच पेलत असतात….. ऑक्सफर्ड डिक्शनरीतसुद्धा Housewife म्हणजेच ‘गृहिणी’ या शब्दाचा अर्थ ‘A married woman whose main occupation is caring for her family, managing household affairs and doing housework.’

म्हणजेच ‘एक लग्न झालेली स्त्री जिचा मुख्य व्यवसाय कुटुंबाची काळजी घेणं, घराचे व्यवस्थापन करणं आणि घरातील कामं करणं हा आहे’ असा दिला आहे. असं डिक्शनरीच्या अर्थासहित खोलात गेल्यावर स्त्रियांना नुसतं गृहिणी असण्याचा अभिमान वाटायला काही हरकत नाही.

यावरून इथे स्वामी विवेकांनदांचा शिकागोतला किस्सा सांगावासा वाटतो. स्वामीजी शिकागोला गेलेले असतांना तिथे एका पत्रकार महिलेने त्यांना प्रश्न विचारला कि स्वामीजी मी इथे पत्रकार आहे, माझ्या काही मैत्रिणी नोकरी करतात, काही डॉक्टर आहेत अशा इथल्या आम्ही महिला सगळी कामे करतो जी पुरुष करतात. पण मी ऐकलं आहे कि तुमच्या भारतात स्त्रिया फक्त घरातली छोटी मोठी कामं करतात, यावर तुम्ही काय सांगाल?

यावर स्वामीजी म्हणतात, “तुम्हाला आमच्या देशातल्या स्त्रियांची दया येते असे काहीसे वाटते मला, पण मला तुमच्या देशातल्या लहान मुलांची दया येते. कारण या मुलांना आईचं प्रेम, त्याग हे माहीतच नाही. तुम्ही आई वडील दोघेही कामं करून मुलांना चांगले लाइफस्टाइल देत असाल पण भारतात स्त्रिया घराकडे जातीने लक्ष देऊन आपला वेळ सत्कारणी लावून मुलांचे आयुष्यच घडवत असतात” आणि म्हणूनच तुम्ही जर गृहिणी असाल तर स्वतःला कमी कधीच समजू नका.

ही एक अभिमानाची गोष्ट समजा की तुम्ही एक व्यक्तीमत्व घडवत आहात. एखाद्या वास्तुशात्रज्ञाला आपण बांधलेली वास्तू पाहून जो आनंद होतो तोच आनंद तुमचे मूल आयुष्यात यशस्वी झालेले बघून तुम्हाला होईल हे नक्की….

तुम्ही पैसे कमवण्यासाठी डिरेक्ट्ली काही काम किंवा मदत करत नसला तरी एक माणूस घडवण्यात, घराचे व्यवस्थापन करण्यात तुमचा नक्कीच हात आहे.

तुमच्या कामामुळे घराचा गाडा सुरळीत चालू आहे याची जाणीव इतरांना होण्याआधी ती तुम्हाला होणं हे आधी महत्वाचं आहे.

आणि या जवाबदाऱ्या पेलतांना सुद्धा स्त्रियांनी स्वतःचे छंद जोपासून हाती असलेला रिकामा वेळ घालवला तर त्यातून मिळणारा आत्मविश्वास आणि आनन्द, जगण्याची उर्मी वाढवेल हेही नक्की.

दुसरी आणखी एक बाजू असते की घरातली आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी काही स्त्रियांना काहीतरी छोटेमोठे काम करावे लागले.

अशा वेळी बरेचदा या आयांना मुलांना वेळ देऊ शकत नसल्यामुळे अपराधीपणाची भावना येते… या आयांनी सुद्धा आपण जे करत आहोत ते मुलांच्या आणि घराच्या भविष्यासाठी करत असल्याने अपराधी भावना मनात ठेऊच नये..

कारण आई किंवा स्त्री, गृहिणी असो किंवा काही नोकरी व्यवसाय करणारी असो स्वतः आपल्या कामावर विश्वास ठेवून असेल तरच मुलांना चांगले संस्कार आणि कॉन्फिडन्स देऊ शकेल…….

स्वतः पॉवरफुल असेल तरच मुलांना पॉवरफुल बनवू शकेल…….. तुम्ही स्वतः आपल्या आयुष्यात क्लीअर असाल तर मुलांना आपल्या भविष्याची क्लॅरिटी देऊ शकाल…

घरी राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या सगळ्याच स्त्रियांचे योगदान आपापल्या जागी श्रेष्ठ!!!

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय