स्कुटर/स्कुटी, यांसारख्या गाड्यांचा नीट मेंटनंन्स ठेवण्यासाठी ५ टीप्स

scooty cha mentanance ksa thevavaycha

आजच्या काळात स्वतःची दुचाकी असणे अत्यंत महत्वाचे आहे. तसे तर आजकाल अनेक प्रकारच्या वेगळ्या ढंगाच्या, विविध रंगाच्या, मॉडर्न आणि ऍडव्हान्स दुचाकी गाड्यांची फॅशन आहे.

त्यातल्या त्यात सर्व वयोगटातील लोकांना शोभेल आणि पेलवता येईल अशी स्कुटी बहुतेक लोकांकडे असते. तर आज आपण आपल्या स्कुटीची देखभाल कोणत्या प्रकारे करू शकतो हे जाणून घेणार आहोत.

कुठलीही वस्तू असेल तर त्याच्या मेंटेनन्स वर लक्ष देणे गरजेचे असते. गाडी तर एक यंत्र आहे त्यामुळे त्याची विशेष काळजी काळजी घेतली तरच कुठल्याही प्रकारचा बिघाड न होता गाडी दीर्घकाळ आपल्याला सेवा देऊ शकते.

स्कुटीच्या बाबतीत काही प्रतिबंधात्मक देखभालींचा उपयोग केला तर तुमच्या स्कुटीचे आयुष्य वाढण्यास निश्चितच मदत होते. आपण कश्या प्रकारे आपल्या स्कुटीची देखभाल करू शकतो?

या प्रश्नाचे उत्तर म्हणून आंम्ही,आजच्या या लेखामध्ये तुमची दुचाकी सुस्थितीमध्ये ठेवण्याच्या ५ टीप्स तुम्हाला सांगणार आहोत.

१. गाडीवर धूळ माती बसल्यास लगेच स्वच्छ करावी.

गाडी हि दैनंदिन वापरण्याची वस्तू असल्याने त्यावर धुळ बसने अगदी स्वाभाविक आहे. हि धूळ तुमच्या स्कूटरच्या सर्किटरीच्या कोनाड्यांमध्ये आणि क्रॅनीमध्ये प्रवेश करून गाडीला नुकसानकारक ठरू शकते.

हे टाळण्यासाठी, तुम्ही तुमच्या दुचाकीचा बाह्यभाग रोज नाही तरी आठवड्यातून एकदा पूर्णपणे स्वच्छ करावा.

दुचाकी पाण्याने स्वच्छ करताना गाडीचे इग्निशन स्विच, सायलेन्सर आणि एचटी हे भाग प्लस्टिक ने झाकलेले असावे.

तसेच स्कुटी स्वच्छ केल्यानंतर ती थेट सूर्यप्रकाशापासून दूर आणि सावलीच्या ठिकाणी उभी करावी , जेणेकरून गाडीचा रंग फिकट होणार नाही.

२. गाडीच्या टायरची नियमितपणे तपासणी करावी.

टायर्स हा गाडीचा बेस आहे. त्यामुळे टायरमध्ये योग्य वेळी हवेचे प्रमाण आणि टायरच्या दाब तपासणी आवश्यक असते.

त्याचप्रमाणे, टायरवरती कोणतेही ओरखडे किंवा किरकोळ कट नाहीत याची खात्री करून घ्यावी जेणेकरून त्यातील हवा बाहेर येऊन टायर खराब होणार नाहीत. जात तुम्हाला टायरची स्थती आणि बॅलन्स बिघडल्यासारखे आढळून आले तर लगेच गाडी सर्विस सेन्टरमध्ये जाऊन दुरुस्त करून घ्यावी.

३. वेळोवेळी गाडीचे इंजिन तेल तपासून घ्यावे.

गाडीचे इंजिने व्यवस्थित असले कि गाडी चांगली चालते. गाडीच्या आत चालणारे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी इंजिन ऑइल लेवल तपासणे फार महत्वाचे असते.

जर तुम्हाला इंजिन ऑइलची लेवल कमी होत असल्याचे लक्षात आले तर लगेच गाडीमधून तेल गळत तर नाही ना ह्याची खात्री करावी. जर तेल गळत असेल तर त्वरित गाडी चालविणे थांबवावे.

इंजिन ऑइल कमी झाल्याने इंजिनवर कार्बन चढतो ज्यामुळे गाडी बिघडते. म्हणूनच वेळोवेळी गाडीचे इंजिन ऑइल तपासून घ्यावे.

४. गाडीची नियमित सर्विसिंग करून घ्यावी.

गाडी दीर्घकाळ तंदुरुस्त असावी यासाठी खूप प्रामाणिकपणे तिला जपावे लागते.

जेव्हा आपण नवीन गाडी खरेदी करतो तेव्हा ६ महिने गाडीची सेर्विसिन्ग फ्री असते. त्यानंतरही गाडीची नियमित सेर्विसिन्ग करणे आवश्यक असते. ज्या ठिकाणाहून गाडी घेतली तिथे जाणे शक्य नसेल तर इतर कुठल्या विश्वासू सर्विस सेन्टरमध्ये आपण आपली स्कुटी नेऊ शकता.

गाडीची नियमित सर्व्हिसिंग केल्याने कार्बोरेटर आणि स्पार्क प्लग मध्ये अडकलेला कचरा निघून गाडीचा अंतर्गत भाग स्वच्छ होतो. दर १००० किलोमीटर अंतर कापल्या नंतर गाडीची सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे.

५. गाडीच्या बॅटरीची नियमित काळजी घ्यावी.

बॅटरी हा गाडीचा मुख्य भाग आहे. बॅटरीशिवाय इंजिन सुरु होणे अशक्य आहे.

म्हणून, तुमच्या स्कूटरच्या बॅटरीची नियमित देखभाल करावी.

बॅटरीवर जर गंज चढलेला असेल, बिल्ड अप किंवा गळती झाली असेल तर, ते शक्य तितक्या लवकर दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी पाठवा.

हि समस्या तेव्हाच उद्भवते जेव्हा तुमचे वाहन दीर्घकाळापर्यंत वापरण्यात आले नाही. गाडीचा बराच काळ वापर न झाल्याने बॅटरी खूप वेगाने डिस्चार्ज होऊन गाडी सुरु होण्यास वेळ लागतो.

आजकाल गाड्या ऑटोस्टार्ट होत असल्याने बॅटरीच्या समस्यांमुळे हॉर्न बंद पडून गाडी ऑटोस्टार्ट होत नाही.

याशिवाय गाडी नेहमी मेन स्टँडला उभी करावी. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात गाडीला संरक्षण मिळेल अशा ठिकाणी गाडी पार्क करावी.

गाडीला कव्हर घालावे. इत्यादी काळजी घेतल्यास आपली स्कुटी दीर्घकाळ टिकून सर्वोत्तम स्थितीमध्ये राहून आपल्याला सुविधा देऊ शकण्यास सक्षम असेल.

तर मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला जर तुमच्या स्कुटीचे योग्य मेंटेनन्स करावयाचे असेल तर नक्की या टीप्स अमलात आणून बघा आणि तुम्हाला हा लेख आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!