TCS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, मिळू शकेल ७.३ लाख रुपये पगार 

Jobs in IT Sector

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! TCS कंपनीत मिळू शकेल सुमारे ७.३ लाख रुपये पगार

आयटी क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी (Jobs in IT Sector) एक अतिशय चांगली बातमी आहे. टीसीएसने (टाटा कन्सलटंसी सर्विसेस) नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जदारांना नोकरीचा थोडा अनुभव असणं आवश्यक असेल. पगारदेखील चांगला दिला जाणार आहे.

जाणून घेऊया ह्या संधी विषयी अधिक सविस्तर माहिती

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. ह्या कंपनीने सध्या पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आणली आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services TCS) त्यांच्या ‘ऑफ-कॅम्पस डिजिटल हायरिंग’ (Off-Campus Digital Hiring) ह्या कार्यक्रमासाठी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सकडून (engineering graduates job) अर्ज मागवत आहे.

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन टेस्ट आणि मुलाखतीसाठी (online test and personal interview) हजर राहावं लागेल आणि कंपनीकडून लवकरच त्या तारखा जाहीर केल्या जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.

निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार पगार मिळेल. पदवीधरांना वार्षिक ७ लाख रुपयांचं पॅकेज मिळेल, तर ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन (post-graduation) म्हणजेच मास्टर्स झालंय, त्यांना वार्षिक ७.३ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

नेमकी कशी आहे ही सुवर्णसंधी?

ह्या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार बॅचलर किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) किंवा (M.Tech) / बॅचलर किंवा मास्टर ऑफ इंजिनीअरिंग (BE) किंवा (ME)/ मास्टर ऑफ कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (MCA)/ मास्टर ऑफ सायन्स (M.Sc) यांपैकी कोणतीही पदवी मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठामधून प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे सदर उमेदवाराने ही पदवी २०१९, २०२०, २०२१ मध्ये प्राप्त केली असेल तरच तो किंवा ती ह्या नोकरीसाठी पात्र असेल.

अर्ज करण्यासाठी पात्रतेचे आणखी काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे 

१. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आयटी क्षेत्रात किमान ६ ते १२ महिन्यांचा कामाचा अनुभव असावा, ही एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. म्हणजेच ही संधी पूर्णत: नवख्या उमेदवारांसाठी नसून काही अनुभव असणाऱ्या लोकांसाठी आहे.

२. याशिवाय उमेदवारांनी इयत्ता १० वी, १२ वी डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किमान ७०% एकूण गुण मिळवलेले असावेत.

३. उमेदवारांचा कोणताही बॅकलॉग नसावा. त्यांनी निर्धारित अभ्यासक्रम दिलेल्या कालावधीत पूर्ण केलेला असावा. म्हणजेच उमेदवार कधीही कोणत्याही विषयात नापास झालेला असू नये.

४. सर्व उमेदवारांना शिक्षणात गॅप (gaps in education) असेल तर तसे जाहीर करणं बंधनकारक आहे. (म्हणजेच उमेदवाराने आपले शिक्षण सलग पूर्ण न करता कोणत्याही कारणाने मध्ये गॅप घेतली असेल तर त्याने तसे जाहीर करणे आवश्यक आहे. ) तसेच उमेदवाराचा शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकूण गॅप २४ महिन्यांपेक्षा जास्त नसावा, असं नमूद करण्यात आलं आहे.

५. त्याचबरोबर उमेदवारांचे केवळ फुल टाइम कोर्सेस (full-time courses) गृहीत धरले जातील आणि त्यांचा विचार केला जाईल. अर्धवेळ (part time) कोर्सेस किंवा इतर कोणतेही अभ्यासक्रम ग्राह्य धरले जाणार नाहीत.

उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी असेल?

१. उमेदवाराने दिलेल्या मुदतीत अर्ज केल्यानंतर कंपनी तर्फे त्या अर्जांची छाननी केली जाईल. पात्र उमेदवारांना कंपनी कडून ई मेल पाठवला जाईल.

२. त्यानंतर कंपनीद्वारे आयोजित लेखी परीक्षा घेतली जाईल. ही पहिली परीक्षा ऑनलाइन लेखी परीक्षा असेल. लेखी परीक्षा रिमोट पद्धतीने घेतली जाईल आणि त्यात advanced quantitative aptitude (४० मिनिटे ), verbal ability (१० मिनिटे ), advanced coding (६० मिनिटे ) या विभागांचे प्रश्न असतील.

३. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी (इंटरव्ह्यु) बोलवले जाईल.

४. मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाईल.

ह्या नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

ह्या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. TCS कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन हा अर्ज करता येईल.

हा अर्ज (https://nextstep.tcs.com/campus ) येथे भरावा लागेल. तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर, ‘डिजिटल ड्राइव्ह’साठी येथे अर्ज करा’ (apply for the ‘Digital Drive’ here) ही एक महत्त्वाची स्टेप पूर्ण करणे आवश्यक आहे.

महत्वाची बाब अशी की एकाच उमेदवाराने अनेक वेळा अर्ज केल्यास ते अपात्र ठरतील, असंही सांगण्यात आलं आहे.

जर वर दिलेले पात्रतेचे निकष तुम्ही पूर्ण करत असाल तर ही नोकरी म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. ह्याचा जरूर लाभ घ्या.

अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२२ आहे हे लक्षात घेऊन वेळीच अर्ज करा आणि ह्या उत्तम संधीचा लाभ घ्या. तसेच ही माहिती आपल्या मित्र मैत्रिणींना कळून त्यांनाही ह्या संधीचा लाभ घेता यावा म्हणून हा लेख जरूर शेयर करा.

अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना मनाचेTalks कडून हार्दिक शुभेच्छा!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

4 Responses

  1. Preity tambe says:

    Please help me out for the registration

  2. Karishma tande says:

    I am interested for job

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!