कर्णनाद / कानात आवाज येण्याची कारणे आणि उपाय

tinnitus treatment in marathi

कानात आवाज येतो म्हणजे नेमके काय होते? जाणून घ्या टिनिटस बद्दल सर्व काही

घरात सगळीकडे निरव शांतता असते, घरात तुम्ही एकटेच असता परंतु तुमच्या कानात मात्र सलग काही तरी आवाज ऐकू येत असतो.

अतिशय इरिटेट करणारा आवाज, खरखर किंवा शिट्टी वाजल्यासारखा आवाज जर सलग आपल्या कानात येत राहिला तर ते सहन करणे कसे शक्य आहे?

कानात अशा प्रकारचा आवाज ऐकू येणे ही समस्या कोणाच्याही बाबतीत उद्भवू शकते. प्रौढ आणि वृद्ध लोकांमध्ये या समस्येचे प्रमाण जास्त आढळून येते.

कानात सलग अशा प्रकारचा आवाज येणे या समस्येला टिनिटस असे म्हणतात.

आज आपण या समस्येबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत तसेच यावर काय घरगुती उपाय करता येतील हे देखील जाणून घेणार आहोत.

टिनिटस म्हणजे नेमके काय ?

टिनिटस हा खरे म्हणजे आजार नव्हे. शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता यामुळे उद्भवणारी ही एक समस्या आहे.

टिनिटसचे नेमके कारण अजून वैद्यकीयदृष्ट्या सापडलेले नाही परंतु मेंदूच्या कार्यामध्ये होणाऱ्या बिघाडामुळे अशाप्रकारे कानात आवाज ऐकू येत असतील असा या क्षेत्रातील तज्ञांचा कयास आहे.

कानात असे आवाज येणे काही लोकांच्या बाबतील सलग चोवीस तास सुरू असते, तर काही लोकांच्या बाबतीत थोडावेळ कानातून आवाज येतो आणि थोडावेळ तो बंद होतो. परंतु दोन्ही प्रकारच्या समस्येचा तितकाच त्रास होतो. कानात अशाप्रकारे आवाज येत राहणे सहन करणे अगदी अशक्य असते.

कानात आवाज येणे या समस्येवर तसा कोणताही ठोस उपाय सापडलेला नाही. परंतु सुदैवाची बाब अशी की काही घरगुती उपाय यांच्या मदतीने या समस्येवर काही प्रमाणात उपचार करता येतात आणि कानात आवाज येणे कमी करता अथवा पूर्णपणे थांबवता येते.

कानात आवाज येण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे

१. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की कानात आवाज येणे यामागे काहीतरी शारीरिक अथवा मानसिक कारण असते. हा कोणताही थेट आजार नसून वेगळ्या एखाद्या आजाराचा साईड इफेक्ट म्हणून असा दोष दिसून येतो.

२. मेंदूचे कानाशी निगडित असणारे कार्य किंवा कानाचे ऐकण्याचे कार्य यामध्ये बिघाड उत्पन्न झाला की अशी कानातून आवाज येण्याची शक्यता वाढते.

३. त्याशिवाय खूप मोठा आवाज असलेले संगीत बराच जास्त काळ ऐकणे किंवा खूप मोठा आवाज असलेल्या मशिनरीच्या जवळ बराच काळ थांबावे लागणे हे कारण देखील या समस्येसाठी असू शकते. त्यामुळे मोठ्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना उतारवयात ही समस्या जाणवू लागते.

४. या कारणांशिवाय इतरही काही कारणे या समस्ये मागे दिसून येतात. वृद्धापकाळ, थायरॉईड हार्मोन्सचे असंतुलन, सायनसची बाधा, डोक्‍याला विविक्षित ठिकाणी मार लागणे ही त्यापैकी काही कारणे आहेत.

५. टिनिटस हा बरेच वेळा शरीराच्या आतून येणारा आवाज देखील असू शकतो. अतिशय शांत जागी बसल्यानंतर हा आवाज जास्त जाणवतो.

असे आजार कमी झाले की आपोआपच कानात आवाज येणे देखील कमी होऊ शकते.

३. काही वेळा काही विविक्षित औषधांचा साइड इफेक्ट म्हणून कानात आवाज येऊ शकतो. अशी औषधे तज्ञ डॉक्टरांकडून बदलून घेणे हा या समस्येवरील उपाय असू शकतो.

टिनिटस या समस्येसाठी काही बाह्य उपचार देखील करता येतात. ते खालील प्रमाणे

कानाच्या आतून सतत येणारा आवाज कमी करण्यासाठी काही विविक्षित थेरपीज उपयोगी ठरतात.

यामध्ये कानात मोठा आवाज ऐकू येत असताना बाह्य वातावरणात एखादा सतत चालू असणारा आणि मंद आवाज चालू ठेवणे (उदाहरणार्थ पंख्याचा आवाज, एअर ब्लोअरचा आवाज, किंवा एखादे मंद संगीत इत्यादी) उपयोगी ठरते.

ऐकू कमी येणे आणि कानात सतत आवाज येत राहणे ही समस्या असणाऱ्या लोकांसाठी हीयरींग एड उपयुक्त ठरते.

मोठा आवाज असणाऱ्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांसाठी हीयरींग प्रोटेक्टर हे यंत्र कानांच्या सुरक्षेसाठी उपयोगी पडते.

कानात सतत आवाज ऐकू येऊ लागला की आपले लक्ष दुसरीकडे वळवणे काही रुग्णांच्या बाबतीत फायदेशीर ठरते. यासाठी एखादे पुस्तक वाचणे, कोणाशी तरी बोलणे, एखादे आवडीचे काम करणे यांचा उपयोग होतो.

कानात मोठ्या प्रमाणावर आवाज ऐकू येऊ लागला की हेडफोन्सच्या मदतीने मधुर संगीत ऐकणे फायदेशीर ठरू शकते.

अशा पद्धतीच्या आजारात साऊंड थेरपीचा देखील उपयोग होऊ शकतो. साऊंड थेरपीमध्ये आवाजाची कंपने म्हणजेच व्हायब्रेशन्सचा उपयोग केला जातो. अशा व्हायब्रेशन्समुळे मन शांत होण्यासाठी फायदा होतो.

ताण तणाव कमी करणारी साधने म्हणजेच योगासने, प्राणायाम यांचा कानातील आवाज कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

मेडिटेशन म्हणजे ध्यान धारणा करणे हा देखील या समस्येवरील प्रभावी उपाय आहे.

चहा कॉफी अशा कॅफिन असणाऱ्या द्रव्यांमुळे कानात आवाज ऐकू येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ही समस्या असणाऱ्या लोकांनी चहा-कॉफीचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

कानात आवाज येण्याच्या समस्येवर डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

१. बराच काळपर्यंत कानात आवाज येत राहिल्यास

२. वारंवार चक्कर येत असल्यास

३. कानात आवाज येण्याबरोबरच डोके गरगरत असल्यास

४. ऐकू येणे बंद झाल्यास अथवा कमी झाल्यास

५. कानात आवाज ऐकू येणे याबरोबरच हृदयातील धडधड वाढत असल्यास

तज्ञ डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घ्यावा.

टिनिटस या समस्येचा त्रास होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी?

१. आवाज असणाऱ्या ठिकाणी अथवा मोठ्याने संगीत लावलेल्या ठिकाणी जावे लागल्यास कानात ईयर प्लग्स घालावेत.

२. आपले कान नियमितपणे स्वच्छ ठेवावेत. परंतु त्यासाठी कोणतीही टोकदार वस्तू कानात घालू नये. आवश्यक असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३. मेंदू किंवा हृदयाशी संबंधित काही आजार असल्यास त्यावर त्वरित औषधोपचार करावेत.

तर मित्र-मैत्रिणींनो आज आपण कानात आवाज येणे म्हणजेच टिनिटस या आजाराबद्दलची माहिती जाणून घेतली तसेच त्यावरील प्रभावी उपाय देखील पाहिले. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळावी म्हणून हा लेख जरुर शेअर करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

3 Responses

 1. R.v bhandale says:

  Thank you
  तुम्ही दिलेली माहिती खूप चांगली आहे. पण जर काही आयुर्वदिक औषधांची माहिती मिळाली तर खूप आनंद होईल.

 2. shweta bodake says:

  Khup Chan mhiti

  • Rutuja says:

   माझा पण कानात आवाज येतो ते 4 year झाले चालू आहे गोळ्याने काही फरक नाही पडला काही उपाय असेल तर सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!