महाराष्ट्र शासनाची “लेक माझी भाग्यश्री – सुधारीत योजना “

lek-mazi-bhagyashri-Scheme
 ता.क.-  हि राजकारणाने प्रेरित होऊन केलेली पोस्ट नाही. वाचक माहितीसाठी हे वाचू शकता. 

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींचे शिक्षण व आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारी ” माझी कन्या भाग्यश्री योजना” १ ऑगस्ट २०१७ पासून सुधारीत स्वरूपात राबविण्यात येणार आहे. आता वार्षिक उत्पन्न साडेसात लाखांपर्यंत असणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

save-girl-child

राज्यात १ एप्रिल २०१६ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. तिचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील तसेच वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असणारी कुटुंबे पात्र ठरविण्यात येत होती. सुधारीत योजना मात्र साडेसात लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व घटकातील कुटुंबांना लागू असणार आहे. या योजनेअंतर्गत एका मुलीनंतर माता किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर सरकारकडून मुलीच्या नवे ५० हजार तर दोन मुलींनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नवे प्रत्येकी २५००० रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येईल. या ठेवीवरील व्याज मुलीच्या वयाच्या सहाव्या आणि बाराव्या वर्षी काढता येईल. तसेच मुद्दल आणि व्याज दोन्ही रक्कम वयाच्या १८ व्य वर्षी काढता येईल. माता किंवा पिता यांनी कुटुंबनियिजन शस्त्रक्रिया केल्यानंतरच ठेवीची रक्कम मुलीच्या नावावर जमा करण्यात येईल. जमा रकमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असणारी व्याजाची रक्कम तिला प्राप्त होऊ शकेल.

कुटुंबात पहिले व दुसरे अपत्य मुलगी असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल मात्र दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्यास त्या या योजनेस पात्र असतील. बालगृहातील अनाथ मुलींसाठीही ही योजना लागू असेल.एक मुलीच्या जन्मांनंतर एक वर्षाच्या आत तर दोन मुलींच्या जन्मांनंतर सहा महिन्याच्या आत माता किंवा पिता यांनी कुटुंबनियिजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांनाच या यिजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावर महिला व बालविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणूसमिती स्थापन करण्यात येणार आहे.

योजनेबद्दल महाराष्ट्र शासन निर्णयाचे सूचनापत्र


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप किंवा टेलिग्राम वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप / टेलिग्राम मेसेज करा.

14 COMMENTS

  1. मला सुद्धा दोन मुली आहेत आणि माझ्या पत्नीची सुध्दा शस्त्रक्रिया झाली आहे तरी मला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल

  2. मला पण दोन मुली आहेत पण योजनेची पुणॅ माहीती कोठ मिळेल ?

  3. मला पहिल्याच प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली आहेत त्या साडेचार वर्षाच्या आहेत,,तर त्या लाभ घेण्यासाठी प्रकार 1 मध्ये येतील की प्रकार 2 मध्ये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.