पाण्याची शक्ती – काय आहेत गरम पाण्यात अंघोळ करण्याचे आश्चर्यकारक फायदे?

पाण्याचे आरोग्यदायी उपयोग असे म्हटल्यावर आपल्या मनात पाणी पिण्याचे फायदे येतात. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे तर आहेतच, परंतु पाण्याचा इतरही प्रकारे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोग होतो. कसे ते आपण पाहूया.

कोणताही मनुष्य जीव जन्माला येण्याआधी मातेच्या उदरात गर्भजलामध्ये असतो, आपल्या निद्रिस्त मनात ती आठवण सतत जागृत असते त्यामुळे पाण्याच्या नुसत्या स्पर्शाने देखील आपल्याला अतिशय ताजेतवाने आणि उत्साही वाटते.

खूप दमलेले असताना गार पाण्याने चेहरा धुतला, किंवा गरम पाण्यात पाय बुडवून बसले तरी अतिशय उत्साही वाटते, सगळी मरगळ निघून जाते. यामागे हेच कारण आहे की पाण्याशी आपल्या अंतर्मनाच्या भावना जोडलेल्या असतात.

आंघोळ करण्यामुळे शरीराच्या स्वच्छतेबरोबरच मनाचा ताजेतवानेपणा देखील राखला जातो, हे आपण सर्व जाणताच.

हल्ली जरी आपण सर्व बादलीत पाणी घेऊन किंवा शॉवरच्या सहाय्याने अंघोळ करीत असलो तरी पूर्वापार आपल्या देशात नदीत डुबकी मारून अंघोळ करण्याची पद्धत होती.

त्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत. पाण्यात स्वतःला बुडवून घेतले की त्याचा मनुष्याच्या मनावर आणि आरोग्यावर अतिशय चांगला परिणाम होतो.

कसा ते आपण आजच्या लेखात पाहणार आहोतच. महत्त्वाचे हे की या सर्व शास्त्रीय गोष्टींची माहिती आपल्या सर्व पूर्वजांना होती म्हणूनच आपल्याकडे अशा पद्धतीने अंघोळ करण्याची पद्धत होती.

आताच्या काळात सुद्धा आंघोळीच्या या पद्धतीचा फायदा घेण्यासाठी बाथटब वापरता येऊ शकतो. परंतु समजा, जागेअभावी सर्व लोकांना हे करणे शक्य नसले तरी अधून मधून कधीतरी पोहण्याचा आनंद घेऊन, टबमध्ये पाणी घेऊन त्यात पाय बुडवून किंवा नदी आणि समुद्र किनारी पाण्यात डुंबण्याची मजा घेऊन हे फायदे मिळवता येऊ शकतात.

चला तर मग, पाण्यात डुंबण्याचे कोणते शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया

१. ताण तणाव कमी होतो

पाण्याच्या नुसत्या स्पर्शाने देखील आपल्याला आलेला थकवा किंवा ताण कमी होतो याचा अनुभव आपण सर्वांनी केव्हा ना केव्हा घेतलेला असतो.

कमीत कमी वीस मिनिटे गरम पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये बसल्यास किंवा गरम पाण्याच्या बादलीत पाय बुडवून बसल्यास दिवसभराचा सगळा शीण आणि थकवा नाहीसा होण्यास मदत होते.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि कामाच्या घाईगडबडीत सर्वांनाच तणावाचा सामना करावा लागतो.

त्यामुळे काही लोकांना हृदय विकार, उच्च रक्तदाब असे आजारही होऊ शकतात. अशा या तणावापासून वाचण्यासाठी ही वॉटर थेरपी निश्चितच उपयोगी ठरते.

२. रक्ताभिसरण सुधारते

कमीत कमी वीस मिनिटे गरम पाण्यात आपले शरीर राहिल्यास आपल्या शरीराचे रक्ताभिसरण अतिशय जलद गतीने होऊ लागते.

त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांपर्यंत रक्त प्रवाह पोहोचून तो सुरळीत होण्यास खूपच मदत होते. तसेच आपल्या मेंदूपर्यंत देखील चांगल्या प्रकारे रक्त पुरवठा होतो आणि त्यामुळेच आंघोळ झाली किंवा पाण्यात डुंबले की त्यानंतर आपण अगदी ताजेतवाने होतो.

३. शरीरातील स्नायू पूर्ववत होण्यास मदत होते

गरम पाण्यात किमान वीस मिनिटे राहिल्यास त्याचा आपल्या शरीरातील मणका आणि मज्जातंतू यांवर चांगला परिणाम होतो. मणक्या पासून सर्वच स्नायूंपर्यंत होणारा रक्तपुरवठा सुधारतो.

तसेच गरम पाण्यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास खूप मदत होते. ज्या रुग्णांना स्नायू आखडलेले असण्याची समस्या असते त्यांनाही वॉटर थेरपी औषधोपचार म्हणून दिली जाते.

४. झोप सुधारते

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि दररोजच्या ताणतणावांना सामोरे जाताना निद्रानाश म्हणजेच झोप न येणे ही एक अगदी कॉमन समस्या बनली आहे.

आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात एखादी तरी निद्रानाशाला सामोरे जाणारी व्यक्ती असतेच.

या समस्येवर देखील वॉटर थेरपी उपयोगी पडते. तसेही झोपण्याआधी आंघोळ केल्यास छान झोप लागते याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला असतोच.

गरम पाण्याच्या टबमध्ये किमान वीस मिनिटे राहिल्यास झोप न येण्याच्या समस्येवर निश्चित फायदा होतो. गाढ व शांत झोप लागते आणि रात्री अधून मधून जाग येणे बंद होते.

५. शरीरातील टाकाऊ पदार्थ दूर होण्यास मदत होते

गरम पाण्यात आपले शरीर किमान वीस मिनिटे राहिल्यास त्यामुळे रक्‍ताभिसरण सुधारते हे आपण पाहिले. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे अन्न पचन झाल्यानंतर शरीरामध्ये निर्माण झालेले पोषक पदार्थ आणि ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागांपर्यंत सुरळीतपणे पोहोचवले जाते.

त्याच प्रमाणे शरीरातून टाकाऊ पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर टाकले जाण्याची प्रक्रिया देखील वेगाने होते. याचा अर्थ शरीरशुद्धीसाठी देखील वॉटर थेरपी अतिशय उपयोगी ठरते.

शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर टाकले गेल्यामुळे आणि शरीरातील चरबी वितळण्याची प्रक्रिया वेगाने झाल्यामुळे वजन उतरवण्यास देखील अशा प्रकारची थेरपी उपयोगी पडते.

६. आपापसातील नातेसंबंध सुधारतात

वॉटर थेरपीचा हा एक वेगळाच उपयोग आहे. घरातील सर्व मंडळींनी किंवा मित्र मैत्रिणींनी मिळून एखाद्या सुट्टीच्या दिवशी तरण तलावावर किंवा नदी, समुद्रकिनाऱ्यावर पोहायला जाण्याचा कार्यक्रम ठरवल्यास खूप धमाल करता येऊ शकेल.

अशाप्रकारे सर्वांनी एकत्र पाण्यात डुंबून मजा केल्यास ताजेतवाने होण्याबरोबरच घरातील लोकांचे एकमेकांबरोबरचे संबंध सुधारण्यास, नात्यामधील गैरसमज दूर होण्यास खूप मदत होऊ शकते.

शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी वॉटर थेरपीचा या अशा प्रकारे उपयोग होऊ शकतो.

तर अशाप्रकारे आज आपण पाहिले की गरम पाण्यात कमीत कमी वीस मिनिटे आपण राहिलो अथवा किमान पाय बुडवून ठेवले तरीदेखील त्याचा खूप फायदा होताना दिसतो.

दुखणारे पाय, सांधे, आखडलेले स्नायू या सर्वांवर या वॉटर थेरपीचा सकारात्मक उपयोग होतो. तसेच आपली मनस्थिती सुधारण्यासाठी देखील याचा खूप जास्त फायदा होतो.

पाश्चात्य देशात तर पाण्याच्या उपयोगीतेचे हे असे प्रयोग वारंवार केले जातातच, परंतु आपल्याही देशात पूर्वापार अशा पद्धतीने पाण्याचा वापर करून आरोग्यासाठी फायदा करून घेतल्याची उदाहरणे आहेत.

तर मित्र मैत्रिणींनो आपणही या वॉटर थेरपीचा उपयोग करून घेऊन आपले ताणतणाव, शारीरिक व्याधी दूर करूया. सर्वांनी आज सांगितलेल्या या शास्त्रीय माहितीचा जरूर वापर करा आणि तुमचे अनुभव आम्हाला कॉमेंट करून सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय