जाणून घ्या पनीर मध्ये असलेली पोषक तत्वे

‘पनीर टिक्का’, ‘कढई पनीर’, ‘पनीर तवा’, ‘पनीर लबाबदार’……

पनीर म्हटलं की ही सगळी नावे आपल्या डोळ्यासमोर येतात आणि तोंडाला जणू काही पाणी सुटते.

हल्ली कुठल्याही लग्न समारंभात जेवणाच्या मेनूमध्ये पनीरच्या भाजीचा प्रामुख्याने समावेश असतोच असतो. शाकाहारात पनीरचा वापर बऱ्याच पदार्थांमध्ये केला जातो.

दररोजच्या त्याचत्याच भाज्यांपेक्षा पनीरची वेगळी चव असून यामध्ये पोषक तत्त्वे देखील असतात. पनीर हे दुधापासून बनविण्यात येत असल्याने यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. आज आपण याच प्रोटीनयुक्त पनीरमध्ये असणारे इतर पोषक घटक कोणते याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आपणा सर्वांना हे तर माहितच आहे की आपल्या शरीराला पोषणासाठी योग्य प्रमाणात सर्वच खनिजांची आवश्यकता असते. शाकाहारी अन्नातून सर्व प्रकारची खनिजे (मुख्यत्वे प्रोटीन) मिळत नाहीत.

मांसाहारामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असते परंतु शाकाहारी लोकांना ते सहजपणे मिळत नाही कारण आपल्या आहारात डाळी आणि कडधान्ये यांचा समावेश अल्प प्रमाणात असतो.

ही कमतरता पूर्ण करण्यासाठी पनीर उपयुक्त आहे. पनीर पूर्णपणे शाकाहारी असून पनीर मध्ये प्रोटीनसोबतच सेलेनियम आणि पोटॅशियम असल्याने आवश्यक पोषण तर मिळतेच पण त्याशिवाय इन्फर्टीलिटी संदर्भातील शारीरिक समस्या देखील दूर होतात.

त्याचबरोबर पनीरमध्ये कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील हाडांना त्यामुळे बळकटी मिळते.

आज आपण पनीरच्या ठराविक भागात (१२२ ग्राम) नेमके कोणते घटक असतात ते पाहूया, त्यामुळे पनीरमध्ये असलेल्या पोषक तत्वांची आपल्याला नेमकी कल्पना येईल.

१२२ ग्राम पनीरमध्ये खालीलप्रमाणे पोषक तत्वे असतात.

  • प्रोटिन्स – २२ ग्राम
  • कॅल्शिअम – ५३ %
  • कोलेस्ट्रॉल – ८४ मिलिग्रॅम
  • सोडियम – ९१६ मिलिग्रॅम
  • पोटॅशियम – १५७ मिलिग्रॅम
  • व्हिटॅमिन ए – २०%
  • साखर – २. ८ ग्राम
  • कॅलरी – ३६५
  • कार्ब्स – ३. ६ ग्राम
  • लोह – १.४%

आहारविषयक वैद्यकीय संशोधनात असे सांगितले गेले आहे की एखाद्या व्यक्तीचे वजन जितके किलो असेल तितके ग्राम प्रोटिन्स रोज त्या व्यक्तीच्या जेवणात असायला हवे.

उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे वजन ५५ किलो असेल तर दर दिवशी त्या व्यक्तीने ५५ ग्राम प्रोटिन्स आहारातून घायला हवे. आणि हे प्रोटीन मिळवण्याचा पनीर हा सर्वोत्तम मार्ग आहे.

पनीरमधील पोषक घटक पदार्थ आपल्याला नेमके कसे उपयोगी पडतात ते आपण पाहूया.

पनीरमध्ये कॅलरीज योग्य प्रमाणात असतात

शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी कॅलरीजची गरज असते. पनीर मधून शरीराला भरपूर प्रमाणात कॅलरीज मिळतात. १०० ग्राम पनीर मध्ये जवळजवळ २६५ कॅलरीज असतात. नियमित पनीर खाल्याने शरीरामध्ये कॅलरी लेवल मेंटेन होऊन स्टॅमिना टिकून राहण्यास मदत होते आणि थकवा जाणवत नाही.

पनीर कच्च्या स्वरूपात खाणे जास्त फायदेशीर ठरते. पनीर तेलात तळून घेतले तर त्यामध्ये असलेल्या पोषक घटकांची संख्या कमी होते. त्यामुळे शक्य तोवर पनीर हे कच्चे किंवा ग्रिल करून घ्यावे. कच्चे पनीर किसून पदार्थांमध्ये घालावे अथवा परतून वापरावे. ग्रिल केलेले पनीर देखील पौष्टिक आणि चवदार असते.

पनीरमधील फॅट्स असे उपयोगी असतात

पनीरमध्ये असलेल्या मोनोअनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड फॅट्समुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होते.

पनीर मध्ये फोलिक ऍसिड नावाचे पोषक तत्त्वं असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. याशिवाय ओमेगा -३ फॅट्समुळे हृदयाशी संबंधित विकार होत नाहीत.

पनीर मध्ये असणारे कार्बस् असे उपयोगी ठरतात

१०० गरम पनीरमध्ये ६ ग्राम कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच शिवाय पोटाचे विकार दूर होऊन तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते.

सध्या बाजारात पनीर फूल नावाचा नवीन पदार्थ आला आहे. याचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते असा दावा केला जातो.

तर असे हे अतिशय पौष्टिक असणारे पनीर. याच्या नियमित सेवनाने चवदार पदार्थ खाल्ल्याचे समाधान तर मिळतेच त्याशिवाय अतिशय उत्तम पोषण मिळते. त्यामुळे जीम मध्ये जाऊन कसरत करणाऱ्या लोकांना पनीर खाण्याचा सल्ला दिला जातो.

पनीर खाताना काय काळजी घ्यावी?

पनीरमध्ये अनेक पौष्टिक तत्त्वे असली तरी काही लोकांना पनीर खाल्याने त्रास होऊ शकतो. काहींना पनीरची ऍलर्जी सुद्धा असू शकते.

त्यामुळे पनीरचे सेवन करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. नियमित पनीरचे सेवन करण्यासाठी आहार तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तर मित्र मैत्रिणींनो आहे ना स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा पनीरची ही माहिती रंजक आणि उपयुक्त?

मग या लेखात सांगितल्याप्रमाणे आपल्या आहारात पनीरचा समावेश नक्की करा. तसेच आजचा हा लेख आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि त्यांनाही पनीरचे फायदे समजावण्यास मदत करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय