आयुष्यात कायम आनंदी राहायचं असेल तर या १० बंधनातून मुक्त व्हा

marathi-prernadayi-lekh

आयुष्य आनंदात मजेत जगायला काय लागतं हो?

कोणीतरी तुमच्यावर मनापासून भरभरून प्रेम करावं, आयुष्यात एखादं ध्येय असावं, आणि तुमच्या मनात आशेचं झाड सदा बहरलेलं असावं, बस्स, और क्या चाहिए जीने के लिए?

पण दोस्तांनो इतकं सोपं नसतं ना सगळं?

कित्येकदा आपणच अनेक बंधने उगाचच लादून घेतो आणि मग दुःखी होतो.

म्हणूनच आनंदाच्या डोहात चिंब भिजण्यासाठी अशा १० बंधनातून मुक्त होण्याचा ध्यास घ्या….

मित्रांनो, महापुरात किंवा या करोना काळात अनेकांना प्रचंड त्रास झाला. मात्र कुटुंब पाठीशी उभं राहिल्यावर अनेक जणांनी “काय गेलं” यापेक्षा “हातात काय आहे?” याचा विचार केला.

जॉब गेला, पण हातात स्कील आहे. छोटा उद्योग उभा करण्याचे धाडस आहे.

जे आहे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत कितीतरी जणांनी आपलं आयुष्य सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

तर मग तुम्ही आम्ही उगीच का दुःख उगाळत बसायचं?

आनंदी होण्यासाठी कशाकशाची गरज नाही त्याची लिस्ट एकदा नीट लिहून काढा.

तुमच्या लक्षात येईल अरे खरंच या गोष्टी सोडून दिल्या तर आपण अगदी सहज आनंदी होऊ शकतो.

चला तर मग आज बघुया काय काय सोडल्यानंतर आपला आनंद कायम राहू शकतो.

1) एक प्रत्येकाला खुश ठेवण्याचा अट्टहास

नातं टिकवण्यासाठी इतकीही तडजोड करू नका की तुमचं स्वतःचं अस्तित्व मिटून जाईल.

प्रत्येकाच्या मनासारखं वागायला गेलात तर तारेवरची कसरत करावी लागेल. शाबासकी तर कुणी देणार नाहीच, उलट त्या तारेवरून तोल जाऊन तुमचंच नुकसान होईल.

त्यामुळे नाती जपा पण स्वतःशी तडजोड न करता….

आणि प्रत्येकाला खुश करण्याचा हट्ट सोडून द्या

2) सोप्या सोप्या गोष्टी निवडू नका.

आयुष्य सरळसोट असेल तर मजा काय?

अहो सोन्याला ही आगीत भाजून घ्यावं लागतं तेव्हा त्यातून उत्तम, मनमोहक दागिना घडतो.

तुमचं व्यक्तिमत्त्व सुंदर घडवण्यासाठी थोडासा अवघड मार्ग निवडा.

सोपे पर्याय सहज उपलब्ध असतात पण अवघड गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाला कणखर बनवतात.

शिक्षण घेताना सोपं क्षेत्र निवडण्यापेक्षा जरा कठीण क्षेत्र निवडा, अभ्यास करा, मेहनत घ्या.

“मला सांडगे, पापड तयार करता येतात पण मार्केटिंग करता येत नाही, त्यामुळे विकता येत नाही” असं म्हणणाऱ्या महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आल्या आणि आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करायला लागल्या तेव्हा कीर्ती आणि पैसा दोन्ही त्यांना मिळालंच.

त्यामुळे आवर्जून अवघड मार्ग निवडा.

सोप्या रस्त्याला Bye म्हणून अवघड रस्त्याकडे वळा.

सोप्या गोष्टी करणे म्हणजे प्रगतीला बंधनात अडकवून ठेवणं हे लक्षात घ्या.

3) अनिश्चिततेचा हात सोडा

जीवनात कोणतेही पाऊल उचलण्या आधीच त्याचा शेवट काय असेल याचं गणित मांडून मनासारखं, थोडंस सेफ असणारं उत्तर आलं तरंच तुम्ही निर्णय घेता का?

असे असेल तर, ही वृत्ती लगेचच सोडा.

अगदी साधंच, पोळी भाजी केंद्र सुरू करायचं आहे तर “माझ्या पोळ्या खपतील का? भाजी खराब झाली तर?” असा बागुलबुवा तुमच्या भोवती नकाराच्या भिंती उभ्या करतो.

मग तुम्ही तिथेच कोंडले जाता. प्रगती थांबते.

याउलट “एखाद्या हॉटेलशी संपर्क साधून बघूया का? एखाद्या कंपनीत आपली भाजी पोळी पोचवली तर ?”

“कदाचित नाही म्हणतील पण विचारून तर बघू” असे विचार तुमच्या कल्पना आणि यश यामध्ये एका उत्तम पुलाची भूमिका करतात.

अनिश्चिततेची भीती दूर करा. थोडंसं धाडस तुमच्यासमोर अनेक पर्यायांना खुलं करू शकतं यावर विश्वास ठेवा.

भीती काढून टाकली की यशाचे मार्ग खुले होतील.

अनिश्चिततेची भीती हा तुमच्या प्रगती मधला मोठा साखळदंड आहे, बंधन आहे त्यातून मुक्त व्हा.

4) स्पर्धेत गुंतू नका.

तुम्हाला कोणासारखं तरी यशस्वी व्हायचं आहे का? तुमच्या जवळच्या व्यक्तीपेक्षा श्रीमंत व्हायचं आहे का?

तर मग तुम्ही स्पर्धेचं बंधन स्वतःच घालून घेत आहात.

मोकळं करा स्वतःला.

एखाद्या व्यक्तीची क्षमता 400 मीटर धावण्याची आहे आणि तुमची क्षमता 1000 मीटर धावण्याची आहे.

पण स्पर्धेत गुंतून तुम्ही एकाच वर्तुळात फिरत राहता.

मोकळे व्हा. कुणासारखं तरी होण्याचा प्रयत्न करू नका, तर स्वतः सारखं, स्वतः साठी जगा.

आनंदी व्हायचं असेल तर स्पर्धेच्या गुंत्यात पाय कधीच अडकवू नका.

5) प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका.

प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची तुमची मनापासून इच्छा असेल तर फुललेल्या फुलांचा सुगंध तुम्हाला प्रसन्नता देऊ शकणार नाही.

कारण काही कळ्या फुलल्या नसतील तर तुम्ही दुःखी व्हाल.

प्रत्येक गोष्ट कशी जिथल्या तिथं आणि तुम्हाला हवी तशी असेल?

आणि असं जर तुम्हाला हवं असेल तर तुमची फक्त धावपळ होईल आणि जीवनातला आनंद नाहीसा होईल.

मित्रांनो, आयुष्यात अनेक गोष्टी ज्यावर आपण कधीच नियंत्रण ठेवू शकत नाही अशा असतात.

त्यामुळे तुम्ही तुमचं कार्य प्रामाणिकपणे करा, मोकळेपणानं करा.

आजूबाजूला जे घडतंय ते घडू द्या फुलांना तुमच्या नाही तर त्यांच्या मनाप्रमाणे फुलू द्या.

तरच तुम्ही त्या फुलांचा सुगंध अनुभवू शकाल.

6) वैभवाचे क्षण सांभाळा.

गंभीरपणे आयुष्य घालवु नका. आनंदाचे अनेक क्षण आपल्या भोवती आहेत, त्यांना ओंजळीत घ्या.

वर्षभरात येणारे सण समारंभ तुम्हाला कटकटीचे वाटत का? त्यातला छोटा छोटा आनंद तुम्ही अनुभवून बघा.

गणपती बाप्पांसाठी मखर करायचं, नवरात्रीला झेंडूच्या माळा करायच्या, पाडव्यासाठी गुढीची सजावट करायची.

या गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आणि आपल्याला आनंद देणाऱ्या असतात.

त्याशिवाय लग्न समारंभ, छोटे-छोटे घरगुती सोहळे यात मिळणारा आनंद पैशात मोजता येत नाही.

असं सगळे तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्यासाठी घडत असतील तर तुम्ही खूप लकी आहात.

भावंडांबरोबर होणारे घरगुती सोहळे मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टी कलिग्स बरोबरचे इव्हेंट हे सगळं जपून ठेवा कारण ते फार अनमोल आहेत.

7) तुमच्या विषयी आदर निर्माण करायला राबू नका.

दुसऱ्याच्या मनात तुमच्याविषयी आदर निर्माण करण्यासाठी धडपड करणं खरच गरजेचं आहे का हो?

कोणीतरी तुम्हाला चांगलं म्हणावं यासाठी तुम्ही राबत राहता. खरं तर याची काहीच गरज नाही.

ज्या व्यक्तीविषयी तुम्हाला काळजी, जिव्हाळा, आदर आहे त्या व्यक्तीला फक्त मनापासून मदत करा.

त्यांच्याशी हसून, प्रेमानं बोला.

ज्यांच्याशी चांगले संबंध असतील त्यांच्यासाठी तुम्ही हे करताच, पण जे तुमच्या जवळचे आहेत, तुमच्या आसपास आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आदर व्यक्त करा.

तुमचं महत्त्वं दुसऱ्यांना जाणवून देण्यासाठी मोठमोठ्या गिफ्टची, पैशाची अजिबात गरज नसते, किंवा तुमच्या हातातलं तुमचं महत्त्वाचं काम सोडून दुसऱ्या व्यक्तिसाठी वेळ देणं, तिला मदत करणं याचीही अजिबात गरज नसते.

“तशीच वेळ आली तर मी आहे” हा विश्वास तुमच्याविषयी दुसऱ्याच्या मनात आदर निर्माण करतो विश्वास निर्माण करतो.

8) नातेसंबंधात परिपूर्ण सुसंवाद.

तुम्ही नाती जपताना एखादी गोष्ट पटली नाही तर त्या व्यक्तीला तसं स्पष्ट न सांगता आहे ते मान्य करून पुढे जाता का?

मग तुमच्यावर जबाबदार्‍या वाढत जातात.

दरवेळी आपल्याकडून चुकीचं काही बोललं जाऊ नये, आपला राग दिसू नये, याची तुमच्या मनावर जबाबदारी येते आणि मोकळेपणा निघून जातो.

उलट जर नातं टिकवायचं असेल तर सुसंवाद होणे महत्वाचं. तुम्ही मोकळेपणाने बोललात, आणि तितक्याच मोकळेपणाने ऐकून घेतलं तर तोडगा निघतो.

मन मारून, बंधन घालत जगलात तर या बंधनांचा कधीतरी जाच होतो, अशा या बंधनांचा जाच होऊ देऊ नका.

त्यामुळे सुसंवादाला महत्त्व द्या.

9) चांगल्या वेळेची वाट पाहणं.

माणसं दुःखी होतात याचं एक कारण तज्ञ नेहमी सांगतात ते म्हणजे तुम्ही वर्तमानात जगतच नाही.

भूतकाळ कसा छान होता, किंवा भविष्यात अमुक एक मिळालं तर मी किती आनंदी होईन या स्वप्नांमुळे वर्तमानातल्या सुखाचे क्षण अलगद निसटून जातात.

आनंदाची अशी कोणतीच वेळ नसते.

आत्ताचा क्षण आनंदाने जगायचं एवढंच ठरवलंत तर तुमचं आयुष्य आनंदाचे होईल.

10) 24/7 आनंद

आनंद हा कोणत्याही कंपनीचा महिन्याचा किंवा वर्षाचा ठराविक प्लॅन नसतो.

त्यामुळे कोणतीही व्यक्ती कायम आनंदात बुडालेली आपल्याला दिसणार नाही.

काही घटना दुःख देतात, काही वेदना देतात, आणि तेव्हाच आनंदाची किंमत कळते.

आनंदी राहणं ही कला आहे.

कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहणं हे सवयीनं जमतं.

पण त्याचा अट्टाहास धरू नका.

आज घडलेली चांगली गोष्ट कोणती हे जर तुम्ही शोधत गेलात ना तर तुमच्या नजरेला आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींकडे बघायची सवय लागेल आणि हळूहळू तुम्ही कायमच आनंदी असाल.

झाडावर पिकलेलं पान जसं हळुवारपणे अलग होऊन मातीत मिसळतं तसच बंधनं घालणा-या गोष्टींना हळुवारपणे बाजूला करा आणि तुमचं आयुष्य म्हणजे एक आनंदाचं झाड करून टाका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

 1. Sanjay Laddha says:

  All point are very true. 🙏🙏🙏

  • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

   मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

   #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

   व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

   https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

   टेलिग्राम चॅनल👇

   https://t.me/manachetalksdotcom

   मनाचेTalks फेसबुक पेज:

   https://www.facebook.com/ManacheTalks/

   मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

   https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!