वैवाहिक जीवन किंवा प्रेम यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडतील अशी ७ भाग्यरत्ने

rashi stone in marathi

ज्योतिषशास्त्र म्हणजे थोतांड आहे, भाग्यरत्ने धारण करण्याचा काही फायदा नसतो असे मानणारा एक मोठा वर्ग असतो, तर ह्या गोष्टींचा फायदा झालेले लोकही असतात जे आवर्जून सांगतात की अशी भाग्यरत्ने वापरण्याचा नक्की उपयोग होतो.

आपला विश्वास असो किंवा नसो परंतु काही विशिष्ट रत्ने किंवा खडे धारण करणे आपल्या आयुष्यात बदल घडवून आणू शकते हे निश्चित. अशी काही भाग्यरत्ने असतात जी आपल्या आयुष्यातील काही गोष्टींवर प्रभाव टाकतात. आयुष्यातील अपयश, अशांतता दूर करण्यासाठी ही रत्ने आपल्याला मदत करतात. समजा आपला अशा भाग्यरत्नांवर विश्वास नसेल तरीही एक दागिना म्हणून ही सुंदर दिसणारी रत्ने वापरायला काहीच हरकत नाही.

आपले आरोग्य, आपल्याला मिळणारी संपत्ति याबरोबरच आपले वैवाहिक जीवन किंवा प्रेम ह्यावर प्रभाव पाडणारी रत्ने देखील आहेत. चांगला जोडीदार मिळण्यासाठी ही रत्ने मदत करतात. वैवाहिक जीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. आज आपण अशाच काही रत्नांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

१. गुलाबी स्फटिक (Rose Quartz)

गुलाबी रंगाचा असणारा हा मौल्यवान आणि सुंदर स्फटिक वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी उपयोगी ठरतो. अंगठी किंवा पेंडंटमध्ये हा स्फटिक धारण करण्यामुळे दोन व्यक्तींच्या नात्यामधील प्रेम आणि विश्वास टिकून राहण्यास मदत होते. एकमेकांविषयी वाटणारे प्रेम वाढते. म्हणूनच या रत्नाला ‘प्रेमाचे रत्न’ किंवा ‘प्रेमाचा स्फटिक’ असे देखील म्हटले जाते.

२. माणिक (Ruby)

अत्यंत मौल्यवान असणारे लाल रंगाचे माणिक हे रत्न ज्योतिष शास्त्रानुसार वैवाहिक जीवनासाठी अतिशय भाग्यकारक आहे. हे रत्न धारण केल्यामुळे त्या व्यक्तीकडे विश्वातील सकारात्मक स्पंदने आकर्षित होतात. माणिक धारण करण्यामुळे उत्साह, आनंदीपणा, स्वतः पुढाकार घेऊन कामे करणे या सर्व गुणांमध्ये वाढ झाल्यामुळे अशा व्यक्तींचे वैवाहिक आयुष्य निश्चितपणे सुधारते.

३. चंद्रकांत मणी (Moon Stone)

हे रत्न धारण करण्यामुळे विवाहीत जोडप्यामधील गैरसमज दूर होऊन त्यांचे नाते सुदृढ होण्यास मदत होते. एकमेकांविषयीचे विचार सुधारण्यास मदत होते. एकमेकांविषयी असणारी साशंकता दूर होऊन विश्वासार्हता वाढण्यास मदत होते. हे रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीच्या मनाला शांतता आणि एक प्रकारची स्थिर, वैचारिक बैठक मिळण्यास मदत होते. नात्यातील असुरक्षितता कमी होते.

४. मोती (Pearl)

पांढरा, पिवळा किंवा गुलाबी रंगाची झाक असणारा मोती सर्वांच्याच परिचयाचा आहे. अंगठी अथवा पेंडंटमध्ये घालून किंवा इतरही प्रकारचे दागिने करून वापरता येण्याजोगे हे रत्न वैवाहिक जीवनासाठी अतिशय शुभ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मोती चंद्राशी निगडित असतो. मोती धारण केल्यामुळे सौंदर्य, मनाचे पावित्र्य, इतरांविषयी मनात चांगल्या भावना निर्माण होणे या सर्वांमध्ये वाढ होते. वैवाहिक जीवनात जोडप्यांपैकी कुणा एकाच्या संतापीपणामुळे अडचणी उद्भवत असतील तर मोती धारण करण्याचा सल्ला दिला जातो. मोती धारण केल्यामुळे संतापी स्वभाव कमी होण्यास मदत होते. मोती धारण करणाऱ्या व्यक्तीचे एकूणच व्यक्तिमत्व शांत होण्यास सुरुवात होते. शांत व्यक्तिमत्वामुळे अशा व्यक्तींचे वैवाहिक आयुष्य निश्चितपणे सुधारते.

५. पुष्कराज (Yellow Sapphire)

पुष्कराज हे पिवळ्या रंगाचे रत्न गुरु ग्रहाचे मानले जाते. हे रत्न धारण करण्यामुळे विवाह ठरण्यासाठी तसेच ठरलेला विवाह सुरळीतपणे पार पडण्यास खूप मदत होते. योग्य जोडीदार मिळण्यासाठी या रत्नाची मोठ्या प्रमाणात मदत होते. लग्न झालेल्या जोडप्यास मुल होण्यामध्ये काही अडचण येत असल्यास पुष्कराज धारण करण्याचा सल्ला दिला जातो. हे रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीच्या सभोवती सकारात्मक एनर्जीचे कवच तयार होते. ज्याचा उपयोग आयुष्यात सकारात्मकता येण्यासाठी होतो.

६. ओपल (Opal)

निळसर रंगाची झाक असणारे हे रत्न अतिशय मौल्यवान आणि शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार हे रत्न शुक्र या ग्रहाचे आहे असे मानले जाते. हे रत्न प्रेम, मार्दव आणि सौंदर्य यांचे प्रतीक मानले जाते. हे रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीच्या वैवाहिक आयुष्यात असणारे गैरसमज दूर होऊन एकमेकांविषयी वाटणारी खात्री वाढण्यास मदत होते. वैवाहिक नात्याचा पाया असणारे समजूतदारपणा आणि एकमेकांवरील विश्वास हे गुण हे रत्न धारण करण्यामुळे वाढीस लागतात. वैवाहिक नात्यात सुरक्षितता जाणवू लागते.

७. पाचू (Emerald)

हिरव्या रंगाचे हे मौल्यवान रत्न अतिशय शुभ असते. ज्योतिष शास्त्रानुसार हे रत्न बुध ग्रहाचे मानले जाते. वैवाहिक जीवनात अथवा प्रेमात हे रत्न खूप मदत करणारे ठरते. विवाहित जोडप्यामधील संवाद वाढवण्यासाठी आणि एकमेकांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी हे रत्न धारण करण्याचा उपयोग होताना दिसतो. वैवाहिक जीवनातील सुखाच्या आशेत वाढ होते आणि त्यामुळे अशा नात्याचा पाया भक्कम बनतो. पाचू हे रत्न पूर्वापार शुभ मानले गेले असल्यामुळे नववधूला आवर्जून पाचूचा दागिना करण्याची पूर्वी पद्धत होती.

तर ही आहेत अशी ७ मौल्यवान आणि सुंदर रत्ने जी धारण करण्यामुळे वैवाहिक जीवन किंवा प्रेमाचे नाते सुधारण्यास खूप मदत होते. ही रत्ने दागिना या स्वरूपात धारण करण्यामुळे आपल्या सौंदर्यात तर वाढ होतेच शिवाय नात्यामध्ये सुधारणा हा आणखी मोठा फायदा होताना दिसतो. आपल्या पारंपरिक दगिन्यांमध्ये अशा प्रकारची रत्ने वापरण्याचे तेच प्रमुख कारण आहे. असे दागिने वापरण्यामुळे ते धारण करणाऱ्या व्यक्तीला ह्या रत्नांच्या गुणांचा लाभ आपोआपच होत असे.

तर मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही देखील अशी रत्ने अवश्य धारण करा आणि आपल्या वैवाहिक जीवनात जास्त आनंदी आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. याबाबतीत तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 Response

  1. Mangesh sapre says:

    Koni changala jyotish aahe ka mala sanga kiva call kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!