फोन हॅक झालाय का हे कसं ओळखायचं?

तुमचा फोन हॅक झालाय का हे कसं ओळखायचं? अशा वेळी काय करणे आवश्यक आहे? जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

सध्याच्या काळात मोबाईल फोन ही एक महत्वाची वस्तु बनली आहे. फोन करणे ह्या महत्वाच्या उपयोगाबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून ईमेल करणे, बँकेचे व्यवहार करणे, वेगवेगळी बिले भरणे ही कामे देखील फोनवर केली जातात. त्याचप्रमाणे मोबाईल फोनमध्ये कॅमेरा आल्यापासून फोटो आणि व्हिडिओ काढणे हा फोनचा आणखी एक महत्वाचा उपयोग बनला आहे.

पण त्यामुळेच मोबाईल फोनची सुरक्षितता देखील अतिशय आवश्यक बनली आहे. आपल्या संदर्भातली इतकी सगळी गोपनीय आणि महत्वाची संवेदनशील माहिती फोनवर उपलब्ध असताना तो दुसऱ्या कोणा वाईट व्यक्तीच्या हाती लागला तर होणारे नुकसान खूप मोठे असेल.

ह्याच कारणामुळे आपला फोन हॅक होणे हे मोठे नुकसान ठरू शकते.

मोबाईल फोन हॅक होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.

आपला मोबाईल फोन हॅक होण्याची शक्यता नेमकी किती असते? आपला फोन हॅक होतो म्हणजे नेमके काय होते? आपला फोन हॅक झाला आहे हे नेमके कसे ओळखावे? तसेच आपला फोन हॅक झाला असेल तर काय करावे?

आज आपण या बाबतीतील सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

सर्व वाचकांच्या मनात असा प्रश्न असतो की माझा आयफोन किंवा अँड्रॉइड फोन हॅक होऊ शकतो का?

दुर्दैवाने ही बाब खरी आहे. कोणाचाही फोन हॅक होऊ शकतो. सायबर गुन्हे करणारे लोक तसे करण्यात तरबेज बनले आहेत. आयफोन असो अथवा अँड्रॉइड फोन तो हॅक होऊ शकतो.

सायबर गुन्हे करणाऱ्या लोकांना तुमच्या फोनमधील सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जसे की बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड डिटेल्स, फोटो आणि व्हिडिओ या सर्वांमध्ये इंटरेस्ट असतो. आर्थिक अफरातफर, फोटो आणि व्हिडिओचा गैरवापर, क्रेडिट कार्ड वापरून भरमसाठ खरेद्या अशा प्रकारचे गुन्हे फोन हॅक करून केले जातात.

हे होऊ द्यायचे नसेल तर आपला फोन हॅक होण्यापासून सुरक्षित ठेवला पाहिजे.

आपला फोन हॅक झाला आहे हे कसे ओळखायचे?

तुमच्या फोन बाबत काही संशयास्पद गोष्टी घडत आहेत का? आपला फोन हॅक झाला आहे असे तुम्हाला आतून वाटते आहे का?

असे अगदी सहज घडू शकते. एखादे ॲप डाऊनलोड करताना किंवा एखादे सॉफ्टवेअर वापरताना क्षणार्धात तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो. एखाद्यावेळी सिक्युअर नसलेले सार्वजनिक वायफाय वापरले तरी सुद्धा फोन हॅक होऊ शकतो.

एकदा फोन हॅक झाला की त्यात खालील ५ विशिष्ट लक्षणे आढळून येतात.

१. डेटाचा वापर वाढतो.

तुमच्या मोबाईल फोन वरील डेटा जर अचानकपणे जास्त प्रमाणात वापरला जात असेल तर तुमचा फोन हॅक झाला आहे अशी शंका येण्यास जागा आहे. आपल्या नेहमीच्या वापरापेक्षा जास्त प्रमाणात डेटा वापरला जातोय का यावर लक्ष ठेवावे.

तसे होत असल्यास तज्ञांची मदत घेऊन ही समस्या दूर करावी. आपल्या फोनमध्ये settings मध्ये जाऊन नेमका किती मोबाईल डेटा वापरला जातो हे तपासून पाहता येते.

२. फोनमध्ये आपोआप विचित्र गोष्टी घडू लागतात.

आपला मोबाईल फोन जर हॅक झाला असेल, फोनमध्ये एखादा व्हायरस घुसला असेल तर फोनमध्ये एखादे ॲप आपोआप डाउनलोड होणे, एखादे ॲप आपोआप सुरू होणे, फोन अचानक बंद पडून पुन्हा रिस्टार्ट होणे अशासारख्या विचित्र गोष्टी घडू लागतात.

काही वेळा फोन अतिशय धीम्या गतीने सुरु राहतो किंवा अचानक बंद पडतो. अशावेळी आपल्या फोनच्या बाबतीत काहीतरी चुकीचे घडले आहे हे ओळखावे.

३. फोनची क्षमता कमी होणे.

जर मोबाईल फोन हॅक झाला असेल तर तो पूर्वी इतक्या क्षमतेने काम करत नाही. ॲप्स लोड करण्यासाठी, ई-मेल अथवा बँकेच्या साईट उघडण्यासाठी आधीपेक्षा जास्त वेळ लागू लागतो. फोनची बॅटरी लवकर लवकर संपू लागते.

काहीवेळा आपण डाऊनलोड न केलेले ॲप फोनवर दिसून ते जास्त प्रमाणात बॅटरीचा वापर करत आहेत असे दिसते. असे होत असेल तर फोन हॅक झाला आहे हे नक्की.

४. आपल्या फोनद्वारे क्रेडीट कार्ड अथवा नेट बँकिंग वापरून पैसे खर्च होणे.

आपण जर फोन वापरून डिजिटल पेमेंट करत असू तर आपल्या बँकेच्या आणि पेमेंटच्या सर्व व्यवहारांवर आपले बारीक लक्ष हवे. फोन हॅक करून वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक सायबर गुन्हे करण्याची प्रवृत्ती हल्ली वाढत चालली आहे.

यामध्ये नेट बँकिंगचा वापर करून तुमच्या अकाउंटमधले पैसे चोरणे, क्रेडिट कार्डचा वापर करून तुमच्या नावावर भरमसाठ खरेद्या करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

आपल्या बँकेतील खात्यावर, तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादीच्या वापरावर अतिशय बारीक नजर ठेवणे आवश्यक असते. याबाबतीत थोडी जरी शंका आली तरी बँकेत आणि सायबर गुन्हे शाखेत ताबडतोब तक्रार नोंदवावी.

५. संशयास्पद टेक्स्ट मेसेज अथवा लिंक.

आपल्या फोन मध्ये जर बाहेरून एखादा संशयास्पद टेक्स्ट मेसेज आला किंवा आपल्या फोन मधून दुसऱ्या कोणाला असा टेक्स्ट मेसेज आपोआप पाठवला गेला तर आपला फोन हॅक झाला आहे अशी शंका घेण्यास वाव आहे.

आपल्या फोनमधून आपल्या मित्र अथवा नातेवाईकांच्या फोनवर एखादी संशयास्पद लिंक आपोआप पाठवली जात असेल तर आपला फोन हॅक झाला आहे हे ओळखावे.

अशा पद्धतीचे टेक्स्ट मॅसेज आणि लिंक पाठवून कॉन्टॅक्ट लिस्टमधील इतरांचे फोन हॅक करणे, त्यांच्याकडून पैसे उकळणे असे गुन्हे घडतात.

जर आपला फोन हॅक झाला असेल तर काय करावे?

वरील पाच लक्षणांवरून तसेच एखादी आर्थिक अफरातफर झाल्यास आपला फोन हॅक झाला आहे हे आपल्या लक्षात येते.

अशावेळी आर्थिक अफरातफर झाली असल्यास ताबडतोब बँक आणि सायबर गुन्हे शाखेत तक्रार नोंदवावी.

त्याच प्रमाणे खालील गोष्टी ताबडतोब कराव्यात.

१. संशयास्पद वाटणारे ॲप फोन मधून ताबडतोब अनइन्स्टॉल करावेत.

२. फोनमध्ये असणारा संवेदनशील डेटा इतरत्र सुरक्षितपणे सेव्ह करावा.

३. ई-मेल, नेट बँकिंग आणि इतर महत्त्वाच्या साईडचे पासवर्ड बदलावे.

४. फोनमध्ये वायरसचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले फोन फॅक्टरी रीसेट करावा लागू शकतो. अशावेळी फोन मध्ये आधीपासून असणारा डेटा गमावण्याची भीती असते.

त्यामुळे नेहमीच फोन मधील डेटा नियमितपणे सेव्ह करत राहण्याची सवय लावून घ्यावी.

५. आवश्यकतेनुसार बँक, पोलीस आणि सायबर गुन्हे शाखा यांच्याकडे तक्रार नोंदवावी.

तर या आहेत अशा गोष्टी ज्या आपला फोन हॅक झाल्याची शंका आल्यास ताबडतोब कराव्यात.

परंतु सर्वात महत्त्वाचे असते ते आपल्या फोन बाबत सतत जागरूक राहणे. आपला फोन सहजासहजी कुणाच्या हातात पडणार नाही याची काळजी घेणे, फोनला व्यवस्थित डिजिटल लॉक करणे, ओटीपी, पासवर्ड अशा महत्त्वाच्या गोष्टी कोणाशीही शेअर न करणे, कोणतीही संशयास्पद लिंक डाउनलोड न करणे, अनोळखी व्यक्तींची ऑनलाइन व्यवहार न करणे अशी काळजी घेऊन आपण आपला फोन हॅक होण्यापासून वाचवू शकतो.

तर मित्र-मैत्रिणींनो, तुम्हीही या प्रकारची सर्व काळजी घ्या आणि आपला फोन हॅक होण्यापासून सुरक्षित ठेवा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख जरूर शेअर करा.

सुरक्षित रहा, आनंदी राहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय