जास्तीत जास्त होम लोन मिळवण्यासाठी ह्या ४ युक्त्यांचा वापर करा.

jast karj kase milel

होमलोन किंवा इतर कोणत्याही लोनसाठी अर्ज करता आहात का? हा लेख तुमच्यासाठी निश्चितपणे महत्वाचा आहे.

होम लोन किंवा इतर कोणतेही लोन घेताना आपल्याला जास्तीत जास्त लोन मिळावे अशीच आपली इच्छा असते. जितकी जास्त लोनची रक्कम मिळेल तेवढे घर घेताना करावे लागणारे डाऊनपेमेंट कमी होते त्यामुळे जास्तीत जास्त रकमेचे लोन मिळावे अशीच सर्वांची इच्छा असते.

परंतु लोन देणाऱ्या बँका, वित्तीय संस्था मात्र मोजून मापून लोन देण्याच्या बाजूने असतात. सरसकट लोन सॅंक्शन न करता ग्राहकाची लोन फेडण्याची क्षमता किती आहे यावर त्याला किंवा तिला किती रकमेचे लोन मिळू शकेल हे ठरवले जाते. अर्जदारची लोन फेडण्याची क्षमता, त्याचे वय, त्याने आधीपासून घेतली असणारी इतर लोन्स, अर्जदाराचे आर्थिक उत्पन्न ह्या सर्वांचा आत्ता मिळू शकणाऱ्या लोनच्या रकमेवर थेट परिणाम होतो.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा ४ युक्त्या सांगणार आहोत ज्यांच्या वापराने तुम्ही जास्तीत जास्त रकमेचे लोन मिळवण्यात यशस्वी होऊ शकाल.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला घर घेण्यासाठी होम लोन घेण्याची आवश्यकता भासते तेव्हा सदर व्यक्ती होम लोन देणाऱ्या बँक अथवा वित्तीय संस्थेकडे अर्ज करते. ती बँक अथवा वित्तीय संस्था आलेल्या अर्जाची छाननी करून अर्जदाराची होम लोन एलिजिबिलिटी म्हणजेच अर्जदार जास्तीत जास्त किती रकमेचे होम लोन मिळण्यास पात्र आहे हे पाहते.

होम लोन एलिजिबिलिटी ठरवण्यासाठी अर्जदाराचे वय, त्याची नोकरी ( तात्पुरत्या स्वरूपाची आहे का कायमस्वरूपी), अर्जदाराला मिळणारा पगार, अर्जदार आवर आधीपासून असणारी काही कर्जे आणि अर्जदाराचा क्रेडिट स्कोर या सर्व बाबींचा विचार केला जातो.

होम लोन देऊ करणारी बँक अथवा वित्तीय संस्था वरील सर्व बाबींचा विचार करून अर्जदाराला एका ठराविक रकमेचे होम लोन सॅंक्शन करते.

परंतु अर्जदाराची होम लोनची गरज जर सॅंक्शन झालेल्या रकमेपेक्षा जास्त असेल तर मात्र अर्जदारापुढे अडचण निर्माण होते. अशावेळी सॅंक्शन झालेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेचे होम लोन मिळवण्यासाठी काही टिप्स उपयोगी पडतात. त्या खालील प्रमाणे –

१. सहअर्जदार निवडा.

एखाद्या लोन साठी अप्लाय करताना जर एका व्यक्ती ऐवजी दोन व्यक्तींनी एकत्र अर्ज केला तर एका व्यक्तीला मिळू शकणाऱ्या लोनपेक्षा जास्त रकमेचे लोन मिळू शकते.

आपला सहअर्जदार कोण बनू शकतो ते जाणून घ्या. अर्जदाराची पत्नी अथवा पती, आई वडील, सज्ञान असणारा मुलगा किंवा मुलगी ( मुलीच्या बाबतीत ती अविवाहित असणे आवश्यक आहे) अथवा सख्खा भाऊ हे सहअर्जदार बनू शकतात. अर्जदाराबरोबर सहअर्जदार असल्यास लोन फेडण्याची जबाबदारी विभागली गेल्यामुळे जास्त रकमेचे लोन सॅंक्शन होऊ शकते.

२. आधीपासून तुमच्या नावावर असलेले लोन फेडून मगच नव्या लोनसाठी अर्ज करा.

मागितलेले लोन सॅंक्शन करण्यासाठी बँक अथवा वित्तीय संस्था अर्जदारावर नेमकी किती रकमेच्या लोनची जबाबदारी आधीपासून आहे हे तपासते.

जर तुमच्या नावावर आधीच एखादे मोठ्या रकमेचे लोन असेल तर तुम्हाला परत एकदा मिळू शकणाऱ्या लोनची रक्कम कमी होते. त्यामुळे जर तुम्हाला जास्तीत जास्त रकमेचे लोन मिळवायचे असेल तर तुमच्या नावावर आधी असलेले सर्व कर्ज फेडून टाका.

त्यामुळे तुमच्यावर असणाऱ्या जबाबदार्‍या कमी झाल्यामुळे जास्त रकमेचे लोन सॅंक्शन होऊ शकेल.

३. लोन घेताना जास्त कालावधीसाठी घ्या.

होम लोन साठी अर्ज करताना जर ते लोन जास्त कालावधीसाठी घेतले तर भराव्या लागणाऱ्या हप्त्याची रक्कम कमी होते. कमी रकमेचा हप्ता असेल तर कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला देखील तो सहज भरता येऊ शकतो. त्यामुळे बँका अथवा वित्तीय संस्था कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला देखील तेवढ्या रकमेचे लोन सॅंक्शन करू शकतात.

तसेच भविष्यात तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची निश्चित शक्यता असल्यामुळे उत्पन्न वाढले की तुम्ही जास्त रकमेचा ईएमआय भरून लोनची मुदत कमी करून घेऊ शकता. म्हणजेच लोन घेताना ते जास्त कालावधीसाठी घ्यायचे आणि नंतर ते भरभर फेडायचे. असे केल्यामुळे सुरुवातीला जास्त रकमेचे लोन सॅंक्शन होण्याची शक्यता वाढते.

४. आपला क्रेडिट स्कोर वाढवण्याचा प्रयत्न करा.

कोणतीही बँक अथवा वित्तीय संस्था एखाद्या अर्जदाराला किती लोन द्यायचे हे ठरवताना त्या अर्जदाराचा क्रेडिट स्कोर नक्की विचारात घेते.

हा क्रेडिट स्कोर अर्जदाराने आतापर्यंत घेतलेले लोन कशाप्रकारे फेडले आहे आणि क्रेडीट कार्डची बिले योग्य मुदतीत फेडली आहेत ना यावर अवलंबून असतो. त्यामुळे जर तुम्ही आधी एखादे लोन घेतले असेल तर त्याचे हप्ते नियमित भरा, त्याचप्रमाणे तुमच्या क्रेडीट कार्डची बिले योग्य मुदतीत भरा.

क्रेडिट कार्ड बिलाची संपूर्ण रक्कम भरून टाकायची सवय लावून घ्या. त्यामुळे क्रेडिट कार्ड बिलावर भरावे लागणारे व्याज देखील वाचते आणि असे करण्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर वाढून तुम्हाला जास्त रकमेचे नवे लोन देखील सॅंक्शन होऊ शकेल.

तर या आहे अशा चार सहज सोप्या युक्त्या ज्या वापरून तुम्ही योग्य मार्गाने जास्तीत जास्त रकमेचे होमलोन मिळवू शकाल. केवळ लोन मिळवण्याच्या दृष्टीनेच नव्हे तर एकूणच कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता आणि सचोटी या दृष्टीने वरील चार गोष्टी करणे उपयुक्त ठरते.

याव्यतिरिक्त तुम्ही कोणत्या बँक अथवा वित्तीय संस्थेकडे लोनसाठी अर्ज करत आहात ही गोष्ट देखील किती लोन सॅंक्शन होणार यासाठी महत्वाची असते. नेहमी नावाजलेल्या बँक अथवा वित्तीय संस्थेकडे होम लोन साठी अर्ज करावा. अशा बँक अथवा वित्तीय संस्थेकडून तुम्हाला होम लोन संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन मिळते तसेच संपूर्ण प्रोसेसमध्ये बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा एक असिस्टंट तुमच्या बरोबर काम करतो. त्यामुळे लोनचे संपूर्ण काम सहज सोपे होते.

आपण हे जरूर लक्षात घेतले पाहिजे की जास्त रकमेचे होम लोन घेण्यात काहीच गैर नाही परंतु घेतलेले लोन वेळच्यावेळी फेडणे मात्र आवश्यक आहे.

आम्ही वेळोवेळी होम लोन संदर्भातील वेगवेगळे लेख प्रसिद्ध करत असतो. ते लेख तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या संदर्भातील आणखी कोणत्या विषयावरील लेख वाचायला तुम्हाला आवडेल ते देखील आम्हाला जरूर सांगा.

वरील लेखात दिलेली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना ह्या माहितीचा लाभ घेता यावा म्हणून हा लेख नक्की शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!