तुमच्या घरासाठी वास्तुशास्त्रानुसार रंग निवडा आणि सुख, समाधानाची प्रचीती घ्या

वास्तुशास्त्रानुसार घराचे रंग

आपल्या घराचा रंग आकर्षित असावा असं प्रत्येकाला वाटतं.

तुमच्या घरी कोणी पाहुणे आले तर तुमचं सुंदर घर बघून त्यांनी प्रभावित व्हावं अशी तुमची इच्छा असते.

घराचं सौंदर्य वाढण्यामध्ये रंगाचा मोठा वाटा आहे.

जे रंग तुम्ही इतर लोकांच्या घरात पाहाता किंवा जे तुम्हाला आवडतात, तेच रंग तुम्ही सरसकट तुमच्या घरासाठी निवडता.

पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? रंगांमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा खेचण्याची ताकद असते.

तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा खेळण्यासाठी कोणते रंग निवडावेत हेच सांगण्यासाठी हा आहे आजचा खास लेख !

१) घराचा दर्शनी भाग

घर पाहण्याआधी तुमचे पाहुणे तुमच्या घराच्या दर्शनी भागाला पाहतात.

त्यामुळे या ठिकाणचा रंग उत्तम असला पाहिजे.घरातल्या रंगाशी आणि घराच्या व्यक्तिमत्त्वाशी मिळताजुळता असला पाहिजे.

ऊर्जेचा प्रवेश हा तुमच्या घराच्या मुख्य दारातूनच होतो, म्हणजेच या दर्शनी भागातून ऊर्जा तुमच्या घरामध्ये येणार असते आणि म्हणूनच स्वागत करणारा असा रंग घराच्या दर्शनी भागाला द्या.

यासाठी पांढ-या रंगाच्या छटेतला एखादा रंग निवडा.

त्याला हिरव्या रंगाची जोड देऊन, तुमच्या घराचा दर्शनी भाग खास करा.

त्यासाठी हिरव्यागार मोहक रोपांची प्रवेशद्वाराजवळ मांडणी करायला अजिबात विसरू नका !

वास्तुशास्त्रानुसार घराचे रंग

 

२) लिव्हिंग रूम.

तुमच्या पाहुण्यांची पहिली भेट होते ती लिव्हिंग रुमशी.

तुम्हु आणि तुमचे कुटुंबीय ही बराच काळ या खोलीत वावरत असता.

त्यामुळं लिव्हिंग रूमसाठी रंग निवडताना नीट विचार करूनच रंग निवडा.

पाहुण्यांचं मनापासून स्वागत करणारा, तुम्ही दमून भागून घरी परत आल्यानंतर तुमचं स्वागत करणारा, तुमच्या मनाचा उत्साह वाढवणारा रंग लिव्हिंग रूमसाठी निवडा.

यासाठी तुम्ही पांढरा किंवा बेज कलर म्हणजे साधारण फिकट तपकिरी किंवा पिवळसर तपकिरी निवडू शकता.

तुमचे व्यक्तिमत्व, तुमचा व्यवसाय याचाही विचार करून निळा, लाल, गुलाबी, जांभळा रंग आणि बेज कलर यांचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता.

वास्तुशास्त्रानुसार घराचे रंग

त्याचबरोबर तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेशी पेंटिंग सुद्धा खोलीच्या रंगाचा एक भाग म्हणून वापरायला काहीच हरकत नाही.

३) बेडरूम

दिवसभराच्या धावपळीत नंतर विश्रांती घेण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे तुमची बेडरूम.

त्यामुळे अर्थातच या खोलीचे रंग प्रेम आनंद त्याचबरोबर शांतता आणि विश्रांती देणारे सुद्धा असले पाहिजेत.

दक्षिण-पश्चिम दिशेला असणाऱ्या मास्टर बेडरूम साठी निळा, तपकिरी, फिकट गुलाबी, राखाडी रंग निवडा.

त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेसाठी बेडरूममध्ये फर्निचर कमीत कमी असेल याचीही काळजी घ्या.

वास्तुशास्त्रानुसार घराचे रंग

४) डायनिंग हॉल.

हसत-खेळत एकत्र जेवण झालं की घरातल्या प्रत्येक व्यक्‍तीची प्रकृती कशी उत्तम राहते !

एकत्र आनंदात वेळ घालवण्यासाठी डायनिंग हॉल पश्चिमेला किंवा उत्तर दिशेला किंवा पूर्वेला सुद्धा चालू शकतो.

ही खोली प्रशस्त, आदरातिथ्य करणारी आणि आरामशीर असावी.

डायनिंग हॉलचा रंग पोपटी, गुलाबी, केशरी क पिवळा, ऑफ व्हाईट, किंवा क्रीम कलर असायला हरकत नाही.

ही जागा जर तुम्हांला फारच मोकळी वाटत असेल तर या रंगाशी मिळतंजुळतं फर्निचर, एखादी कलाकृती, किंवा जेवणाच्या भांड्याची मांडणी इथं करा.

 

वास्तुशास्त्रानुसार घराचे रंग

५) स्वयंपाकघर.

ज्या ठिकाणी सर्वांचे आवडते पदार्थ तयार होतात ते ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर.

स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीसाठी ते आरामशीर असावं.

आग्नेय, पूर्व दिशा ही स्वयंपाकघरासाठी उत्तम दिशा मानली जाते.

तुम्ही वाचलं किंवा ऐकलं असेलच की स्वयंपाकघर ही अग्नीतत्वाची जागा, अग्नीच्या ज्वाळा लाल रंगाच्या असतात हे तुम्हांला माहिती आहेच.

त्यामुळे स्वयंपाक घर सुद्धा लाल किंवा केशरी रंगात रंगवावे.

पूर्ण लाल रंग तुम्हाला भडक वाटत असेल तर लाल रंगाची बॉर्डर तुम्ही आखू शकता.

संपूर्ण लाल रंगाऐवजी पांढरा, हिरवा, पिवळा, गुलाबी किंवा फिकट तपकिरी ही निवडू शकता.

मात्र काळा आणि राखाडी हे रंग स्वयंपाकघरासाठी चुकूनही निवडू नका.

वास्तुशास्त्रानुसार घराचे रंग

६) गेस्ट रूम.

गेस्टरूम शक्यतो उत्तर-पश्चिम दिशेला असावी इथं पाहुण्यांना आरामशीर वाटलं पाहिजे.

त्यांच घरात स्वागत आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे.

त्यासाठी गेस्टरुम पिवळा, नारंगी,लव्हेंडर, निळ्या किंवा पोपटी रंगाच्या फिकट छटांनी रंगवावं.

त्याला पांढऱ्या रंगाची जोड नक्की द्यावी.

हे रंग घरामध्ये आनंद निर्माण करतात आणि प्रत्येक व्यक्तीचं मनापासून स्वागत ही करतात.

७) घरातल्या मुलांसाठी जी खोली असेल ती केशरी, गुलाबी, निळ्या, हिरव्या, लव्हेंडर किंवा अशाच एखाद्या फ्रेश कलरने रंगवा.

८) स्टडी रूमसाठी हिरवा, निळा, लव्हेंडर, बेंज किंवा फिकट जांभळा हे रंग उत्तम ठरतात.

९) देवघरासाठी आवर्जून फिकट पिवळा, पांढरा शुभ्र, क्रीम कलर ,फिकट हिरवा, आकाशी रंग शोभून दिसतात.

देवघरासाठी गडद रंग निवडू नका फिकट रंगामुळे तुम्हाला इथं शांतीची अनुभूती मिळेल.

१०) बाथरूमचा रंग शक्यतो पांढरा, काळा राखडी, गुलाबी असावा.

तुम्ही तुमच्या घरासाठी काळजीपूर्वक, विचारपूर्वक रंग निवडले तर तुमच्या घरात सातत्यानं सकारात्मक ऊर्जा खेळती राहील.

रिनोवेशन करण्याआधी, नव्या घराला रंग देण्याआधी किंवा घर रंगवण्याआधी रंगांची नीट माहिती करून घ्या.

कोणत्या रंगाचा काय प्रभाव पडतो ते नीट समजावून घ्या.

त्यांनंतर वास्तुशास्त्रानुसार रंग निवडा आणि घरामध्ये सुख, समाधानाची प्रचीती घ्या.

वास्तुशास्त्राचे २३ नियम

सकारात्मक उरजेसाठी वास्तु टिप्स

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!