मानवी स्वभावाचे ‘हे’ ८ पैलू जाणून घ्या आपल्या स्वभावात बदल करा, आणि यशाच्या मार्गाने वाटचाल करा

the laws of human nature

मित्रांनो, व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणत असलो तरी प्रत्येक माणसाच्या स्वभावामागं काही गोष्टी कॉमन असतात.

एकूणच स्वभावाच्या मुळाशी काही समानता असते, आणि या गोष्टी जर आपण ओळखू शकलो, तर आपण माणसं ओळखायला शिकतो…

माणसं ओळखायला शिकलो तर आपल्या आयुष्यात यश अगदी जवळ येऊन ठेपतं..

मानवी स्वभावाचे पैलू नेमके कसे असतात ते आज जाणून घेऊया.

1) तर्कशुद्ध विचार

तर्कशुद्ध विचारांची देणगी प्रत्येकाला मिळत नाही….

ती मुंगसाची गोष्ट तुम्हाला आठवते का?

एका शेतकऱ्याच्या घरी एक मुंगूस पाळलेला होता.

त्याच्या कुटुंबाचा तो महत्त्वाचा हिस्सा होता.

एके दिवशी शेतकरी शेतात गेल्यानंतर घरातलं पाणी संपलं.

शेतकऱ्याची बायको काळजीत पडली कारण त्यांचं छोटसं बाळ होतं, त्याला एकटं सोडून पाणी आणायला कसं जायचं?

घरात मुंगूस आहे आणि बाळ पाळण्यात गाढ झोपलं होतं, तर पटकन जाऊन पाणी आणू असा विचार करून घडा घेऊन ती पाणी आणायला गेले गेली.

पाणी घेऊन आली तर दारात मुंगूसाचं तोंड रक्तानं माखलेलं दिसलं. मुंगुसानं बाळाला काहीतरी केलं असावं, असं वाटून तिनं हातातला घडा त्याच्या डोक्यावर आपटला, बिचारा तिथल्या तिथेच गतप्राण झाला.

शेतकऱ्याची बायको आत गेली तर बाळ पाळण्यात शांतपणे झोपलेलं होतं.

पण पाळण्याखाली साप मरून पडला होता ज्याला मुंगूसानं मारलेलं होतं.

तुम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी भावनेला महत्त्व देत परिस्थितीकडे दुर्लक्ष करता का?

त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात.

मित्रांनो असं म्हणतात,

 • रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये
 • आनंदात कोणाला वचन देऊ नये
 • दुःखात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये

त्यामागं हेच कारण आहे की भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात, ज्याचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो.

पण हा तर मानवी स्वभावच आहे, या मानवी स्वभावाला तसे अनेक कंगोरे असतात, पण व्यक्तिमत्त्वाचं दिसणं आणि स्वभाव यातला फरक ज्याच्या लक्षात आला त्याचं बिझनेस आणि पर्सनल लाईफ यशस्वी होतं.

जो भावनेवरती मात करून परिस्थितीप्रमाणे विचार करू शकतो तोच सातत्याने यश गाठू शकतो.

2) भूमिका

प्रत्येक व्यक्ती प्रत्येकासाठी वेगळी असते

एखाद्या व्यक्तीचा विद्यार्थी म्हणून शिक्षकांसाठीचा स्वभाव वेगळा असतो, आईवडिलांसाठी वेगळा, भावंडांसाठी वेगळं व्यक्तिमत्व असतं, नोकरीधंद्यातलं वेगळं रुप आणि त्यांचं स्वतःचं असं एक वेगळं, खरं रूप असतं .

“रियल” आणि “रील” लाइफ हे शब्द आता तुम्हाला माहिती आहेतच.

रील लाइफचे व्हिलन ख-या आयुष्यात किती चांगले असतात याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत.

अभिनेता प्राण नेहमीच खलनायक रंगवायचे मात्र त्यांच्याविषयी इंडस्ट्रीत नेहमी चांगलंच बोललं जातं.

तर पडद्यावरचा सज्जन हिरो ड्रग्ज, किंवा इतर कुठल्या तरी प्रकरणात रियल लाईफ मध्ये व्हिलन बनत असतो.

आता सोशल मीडियाने तर प्रत्येकाला लाईम लाईटची संधी दिलेली आहे.

तिथे प्रत्येक जण तो किती छान पद्धतीने आयुष्य जगतो आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो.

सतत छान आणि आनंदी दिसण्याचा प्रत्येकाचा अट्टाहास असतो.

माणसाची पारख करताना त्यांच्या भुमिकेमागचा त्यांचा खरा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करणं फार महत्त्वाचं ठरतं.

3) आयुष्याची सक्ती

“दिसतं तसं नसतं” बऱ्याच वेळेला असं होतं ना.

पण सोशल मीडियाने तुम्हांला एका विशिष्ट प्रकारच्या आयुष्याची सक्ती केलेली आहे.

अतिशय मॉडर्न कपडे घातलेल्या व्यक्तीशी तुमचा संपर्क येतो.

त्या व्यक्तीचा तुमच्यावर मोठा प्रभाव पडतो पण सहवास वाढल्यानंतर व्यक्तीचं राहणीमान आणि बुद्धि यामध्ये समतोल नसल्याचं जाणवतं.

याउलट इस्रोच्या साडी नेसणार्‍या, काकूबाई वाटणा-या शास्त्रज्ञांनी मंगळ मोहिमेसाठी किती मोठं योगदान दिले आहे तुम्हाला माहितीच आहे.

त्यामुळे एखाद्या व्यक्तीला समजून घेताना त्याचं चारित्र्य समजून घ्या.

चारित्र्यवान व्यक्ती मेहनती आणि विश्वासार्ह असते .

इतरांना आदरानं वागवण्याची तिची वृत्ती असते.

कठीण प्रसंगात शांत राहून काम करण्याची हातोटी त्यांच्याकडे असते.

अशा व्यक्ती सहज वावरतात त्यांच्याकडे दिखाऊपणा नसतो, अशी माणसं दुर्मिळ असतात, बरीच माणसं खोटं आयुष्य ओढून-ताणून जगत असतात .

कठीण प्रसंगात मात्र त्यांचा मूळ स्वभाव उघडा पडतो.

गुडीगुडी आयुष्य जगणाऱ्या अशा माणसांपासून दूर राहा

 • ज्यांचं प्रत्येक काम निर्दोष करण्याचा अट्टाहास असतो अशा लोकांपासून थोडसं दूरच राहा.
 • ज्यांना कामाचं गांभीर्य कळत नसतं, जे सतत बालिश बडबड करत असतात, त्यांना तुमच्या जवळ फिरकू देऊ नका.
 • जी व्यक्ती प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढून घेते पर्सनली घेते, स्वतःवरती अन्याय झाला आहे असा कांगावा करून समोरच्याला अपराधी ठरवते अशा लोकांना ही दूर ठेवा.
 • प्रत्येक गोष्टीमध्ये ड्रामा क्रिएट करत स्वतःकडे लक्ष वेधून घेणाऱ्या व्यक्तींची संगत अजिबात नको.

मित्रांनो चारित्र्य ही फार मोलाची गोष्ट आहे, दुर्मिळ आहे. पण या चारित्रवान माणसाचा चेहरा खरा असतो.

ठराविक पठडीतलं आयुष्य जगण्याची सक्ती जे मानत नाहीत त्यांच्या कडून तुम्हांला खूप काही शिकायला मिळेल.

4) लोभ

लहान मुलांना नेहमीच खेळण्याच्या दुकानात गेल्यानंतर, आधीची भरपूर खेळणी असतानाही नवं खेळणं हवं असतं.

या नव्या खेळामध्ये त्यांचं एक दोन दिवसच मन रमतं

पुन्हा नव्या खेळण्याचा लोभ त्यांच्या मनात निर्माण होतो.

तर स्वतःविषयी सतत बोलत, सतत आपली चर्चा व्हावी असा लोभ मनात ठेवणारी माणसं कुणालाच नकोशी असतात.

प्रत्येक गोष्टीत त्यांचं, माझं काम कसं महत्त्वाचं? हे सांगण्याचा अट्टाहास चालतो, त्यामुळेच खरंतर ती नकोशी असतात.

या उलट तुम्ही स्वतः विषयी जितकं गूढ ठेवाल तितकं लोकांची तुमच्याविषयीची उत्सुकता वाढेल.

तुमचा कणखर दुर्मिळ आणि निस्वार्थी, प्रामाणिक स्वभाव तुमचं मूल्य वाढवतो.

बघा ना एखाद्या वस्तूचा स्टॉक लिमिटेड असेल तर तो घेण्यासाठी झुंबड उडते.

तुमच्या स्वभावामध्ये लोभ नसेल तर तुम्ही युनिक, लोकप्रिय ठरू शकता, यशस्वी होऊ शकता.

5) दूरदृष्टीचा अभाव

ब्रेकिंग न्यूज चालतात, का बरं चालतात ?

कारण बऱ्याच लोकांकडे दूरदृष्टी नसते.

लोकांना इतरांच्या आयुष्यात डोकावून, सध्या काय चालू आहे हे पाहणं आवडतं.

पण जे लोक स्वतःच्या आयुष्याचा दुरवरचा विचार करू शकतात, ती माणसं प्रामाणिक असतात.

त्यांची स्वप्न भव्य असतात, आणि त्यासाठी त्यांनी अतिशय बारकाईने विचारही केलेला असतो.

ज्या माणसांकडे ध्येय नसतं दूरदृष्टी नसते त्यांच्यापासून दूरच राहा.

जी माणसं सतत तुमचा मुद्दा परतवायला तयार असतात त्यांच्यापासूनही दूर राहा.

त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही म्हणजे त्यांनी भविष्याचा काही विचारच केलेला नाही.
त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून वावरा.

एका श्रीमंत माणसाला एका मुलाखतीत असा प्रश्न विचारला गेला, की श्रीमंत माणसांकडे असा कोणता गुण असतो, जो त्यांना इतरांपासून वेगळा करतो?

त्यावर ‘त्या’ श्रीमंत माणसानं जे सांगितलं त्यावर विचार करायला हवा,

त्या माणसांनं असं सांगितलं, एखादी उजाड पडकी जमीन दोन माणसांना दाखवली तर सामान्य व्यक्तीला त्यातली पडकी जमीन दिसते, तर श्रीमंत माणसाला त्या जमिनीवरती उभा राहणारा यशस्वी प्रोजेक्ट दिसतो आणि

म्हणूनच दूरदृष्टीने पाहणारा माणूस यशस्वी, श्रीमंत होऊ शकतो

6) बचावात्मक पवित्रा

माणसाला आयुष्यात इतक्या स्पर्धा, इतके ताण-तणाव असतात की बरीच माणसं बचावात्मक पवित्रा घेतात.

अशा माणसांकडून काम करून घेणंं तुम्ही शिकायला पाहिजे.

म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडवायची आहे, पण ती समोरच्या व्यक्तीकडून घडणार आहे, समोरची व्यक्ती स्वतः चा बचाव करायला बघते, जबाबदारी घेणं टाळते, तर तुम्ही अशा खुबीनं ते काम घडवून घ्यायचं की त्याला वाटलं पाहिजे हा निर्णय त्याचा स्वतःचाच आहे.

एक लक्षात ठेवा पूर्वग्रह ठेवणारी माणसं प्रत्येक गोष्टीत नकारात्मक गोष्टी शोधतात, दुसऱ्यांना दोष देत राहतात.

घाबरट व्यक्ती बचाव कसा करायचा ते शोधतात आणि त्यांचं सतत अलर्ट मोडवर असणारं भांडखोर व्यक्तिमत्त्व घडतं, त्यांना समोरची व्यक्तीसुद्धा भांडखोर वाटायला लागते.

तुम्हाला अशा गोष्टी जाणवल्या तर बचावाच्या पातळीवरून दूर व्हा सकारात्मक बना.

7) लोकप्रिय व्यक्तिमत्व

समाजामध्ये असे काही लोक असतात त्यांना फारसं कुणी महत्त्व देत नाही, तर काही लोक असे असतात की जे आपल्या वर्तुळामध्ये लोकप्रिय असतात.

जी माणसं लोकप्रिय असतात ती सतत दुसऱ्यांना मदत करायला तयार असतात.

सतत स्वतःच्या कौतुकात मग्न असणाऱ्या व्यक्तींना लोक टाळायला लागतात.

जी व्यक्ती प्रत्येक सिच्युएशनला, प्रत्येक माणसाला कंट्रोल करायला धावतात त्या लोकांपासून बाकीचे लोक लांब पळतात.

ज्या माणसांना काहीही करून अटेंन्शन मिळवायचं असतं अशाही व्यक्तींना फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही.

ज्यांना काहीही करून वादात जिंकायचं असतं त्या ही व्यक्ती नावडत्या लिस्टमध्ये जातात.

काही लोक मात्र स्वतःचं मूल्य वाढविण्यासाठी इतरांचा आदर आणि सन्मान करतात त्या माणसांची किंमत अमूल्य होते.

त्या व्यक्ती लोकप्रिय ठरतात.

8) पिढीतील अंतर

प्रत्येक पिढीचे विचार वेगवेगळे असतात. नव्या पिढीचे विचार बरेच क्रांतीकारी, बंडखोर असतात.

समाजाला घालून दिलेले नियम आंधळेपणाने फॉलो करण्या ऐवजी नवी पिढी त्यावर विचार करते. जे पटते तेच स्वीकारते, जे पटत नाही ते टाकून देते.

म्हणूनच विचारांना चालना मिळण्यासाठी, नाण्याच्या दोन्ही बाजू समजावून घेण्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे.

पिढी कोणतीही असो वाचन हे गरजेचं आहे.

त्यातून बर्‍याच गोष्टी या सूर्यप्रकाशासारख्या स्वच्छ होतात.

मित्रांनो मानवी स्वभावाचे हे पैलु तुमच्या लक्षात आले तर तुम्ही तुमच्या स्वभावात चांगले बदल घडवू शकता.

समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेऊन आपलं वागणं ठरवणं आणि शांत रहाणं हे जमतं.

स्वभाव नीट समजून घेत, योग्य व्यक्तींशी संपर्क साधत आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता.

तुमच्या स्वभावाचं तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का? कसा आहे तुमच्या स्वभावाचा पैलू आम्हांला नक्की सांगा कमेंट करून!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

 1. S.M.Dandge says:

  Excellent interpretation of
  human nature.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!