या २० स्वयंसूचना रोज पहाटे स्वतःला द्या, आणि जादू अनुभवा!!

prernadayi vichar

तुम्ही तुमच्या आजूबाजूला एखादी यशस्वी व्यक्ती पहाता… तिचं बालपण ही तुम्ही पाहिलेलं असतं.

एखादा मुलगा अभ्यासात “ढ” असतो, कसाबसा पुढच्या, वरच्या वर्गात जात असतो.

लेखन, वाचन या साध्या साध्या गोष्टी त्याच्यासाठी प्रचंड त्रासदायक ठरलेल्या असतात.

मात्र, आज त्याच मुलाला आत्मविश्वासानं एखाद्या उच्च पदावरती काम करताना जेंव्हा तुम्ही पाहता तेव्हा थक्क होऊन जाता….

“असं कसं शक्य आहे?” असा प्रश्न तुम्हाला पडतो…

पण मित्रांनो असे चमत्कार खरंच घडतात!!

आणि हे केवळ शक्य होतं ते ‘स्वयंसूचनेमुळे‘.

एखाद्या मुलावर “भांडकुदळ” “ढ” “मंद”, असे शिक्के सहज मारले जातात.

त्या मुलाला त्या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी स्वतःला अक्षरशः ढकलावं लागतं, त्यासाठी सातत्याने स्वतःला मोटिवेट करावं लागतं, प्रोत्साहित करावं लागतं…

स्वतःला सूचना देऊन धीर कायम ठेवावा लागतो.

तुमचं आयुष्य पुढे नेण्यासाठी घडविण्यासाठी स्वतःला कायम सकारात्मक सूचना द्या….

ऐकायला किंवा वाचायला थोडं विचित्र वाटतं ना? पण जेंव्हढं तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हढं कोणीच तुम्हाला ओळखत नसतं!!

सकारात्मक स्वयंसूचनांचा वापर करून तुमचं आयुष्य तुम्ही उत्तम पद्धतीने घडवू शकता.

शरीराच्या स्नायूंना ताकद मिळवण्यासाठी व्यायाम करावा लागतो तसेच मनाची ताकद वाढवण्यासाठी ही व्यायामाची गरज असतेच की!!

आणि हा व्यायाम म्हणजेच ‘स्वयंसूचना‘.

दशरथ मांझीनं रोज थोडं थोडं काम करत, दगड फोडून रस्ता तयार केला. भले त्याला दहा वर्षं लागली पण काम पूर्ण झालं….

तुम्ही ही तुमच्या मनाला रोज थोडं थोडं समजावलं नाही तर ते गंजायला वेळ लागणार नाही….

सकारात्मक स्वयंसूचनेनं जर मनाला प्रशिक्षित करून योग्य विचारांचं बी रुजवलं, तर तुमच्या यशाचा सुगंध चारी दिशांना पसरू शकतो.

पण या स्वयंसूचना नेमक्या कोणत्या असाव्यात? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर आज आपण काही स्वयंसूचनांची उदाहरणं पाहूया.

१) मी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण ठेवू शकत नाही. जे घडतंय त्याला प्रतिसाद कसा द्यायचा यावर मात्र मी नियंत्रण ठेवू शकते…

माझ्या प्रतिसादातच माझी शक्ती एकवटलेली आहे…

२) गोष्टी कशा घडायला हव्यात? याचा विचार करून मी दु:खी होणार नाही, त्याऐवजी सध्या काय परिस्थिती आहे? आणि तिचा फायदा कसा घ्यायचा यावर मी विचार करेन.

३) माझ्या हातात जे काही येईल त्याचा मी मनापासून स्वीकार करेन, आणि कोणतंही काम मी जीव ओतून पूर्ण क्षमतेने करेन.

४) खोटया किंवा फसव्या यशापेक्षा घडणाऱ्या चुका कधीही चांगल्या यावर माझा विश्वास आहे.

५) जेंव्हा यशाची प्राप्ती होते, तेंव्हा सगळेजण जितकं कौतुक करतात तितकी परफेक्ट किंवा उत्तम मी नसते.

पण एखाद्या वेळी हरल्यानंतर मी जेवढा विचार करते तितकी वाईटही मी नसतेच…

६) माझ्या समोरच्या समस्यांवर किंवा माझ्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मी सकारात्मक गोष्टींवर लक्ष देण्याचा प्रयत्न करेन.

७) एखादं आव्हान तेंव्हाच अडथळे उभे करून प्रगतीचा मार्ग रोखतं, जेंव्हा मी त्याच्यापुढे सपशेल शरणागती पत्करते.

८) हार स्वीकारून मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करेन. कारण जितक्या लवकर मी अडथळ्यांना पार करेन तितक्या लवकर मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचेन.

९) अपयशाची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची भीती वाटली तरी मी मागे हटणार नाही.

कारण ही भीती मला घाबरवण्यासाठी नाही तर मला त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आहे यावर माझा विश्वास आहे.

१०) कारणाशिवाय आलेला थकवा आणि कामाचं समाधान मिळवून देणारा थकवा यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

आयुष्य लहान आहे, मी स्वतःला अशा छोट्या-छोट्या कामात झोकून देईन ज्यामुळं माझ्या जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडेल.

११) महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे जर वेळ उरत नसेल तर, मी फालतू गोष्टीत वेळ घालवणं लगेचच बंद करेन.

१२) मी उद्या कोणत्या टप्प्यावर पोहोचेन याचा विचार करून, त्यासाठी आजच सन्मान मिळवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही.

१३) भविष्य आजच्यापेक्षा सुखद आणि सुंदर असणारच आणि तसं ते असावं यासाठी मला आत्ता या क्षणी प्रयत्न करायला हवेत.

१४) जेव्हा मनातून मी शांत असेन तेंव्हाच माझ्या आयुष्यात शांती वसेल.

१५) आयुष्यात पुढं जाणं कायमच महत्त्वाचं ठरतं.

दुःख, वेदना, आघात यांना मागं टाकून पुढे जात राहिलात, तरच प्रगती होईल.

१६) मी चांगलीच आहे असा अडेलतट्टूपणा न करता माझ्यात आणखीन काय चांगले बदल करायला हवेत ते करायला मी नेहमीच उत्सुक असेन.

१७) मी माझ्या कामात इतकी गुंतलेला असेन की दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसायला, माझ्याकडे वेळच असणार नाही.

१८) मी जशी आहे तसं स्वतःला स्वीकारून स्वतःवर प्रेम करेन.

१९) यशाकडे छोट्या छोट्या टप्प्यांनी वाटचाल करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. यशासाठी दरवेळी एखादी मोठी उडीच मारली पाहिजे असं काही नाही…

२०) “छोट्या छोट्या यशानंतर सेलिब्रेशन तो बनता है ना बॉस!” कारण छोट्या छोट्या गोष्टींनीच तर आत्मविश्वासाची इमारत भक्कम होते.

लक्षात ठेवा आयुष्यात हुलकावणी देणा-या किंवा उशिरा येणाऱ्या यशाला काबूत करणं थोडसं अवघड आहे.

मात्र आयुष्याच्या अडचणींचा सामना करताना तुम्हांला तुमच्या शक्तीचा अंदाज येतो.

याच शक्तीच्या साथीनं जीवनाचे अर्थपूर्ण टप्पे तुम्ही यशस्वीरित्या पार पडू शकता.

आयुष्य कितीही मोठं कोडं तुमच्यासमोर घालू दे, सर्जनशीलता आणि ज्ञान यामुळे ते कोडं तुम्ही नक्कीच सोडवू शकता…. फक्त गरज आहे ती आत्मविश्वासाची….

भाजणाऱ्या वैशाखवणव्यानंतरच, वळवाच्या सरींची किंमत कळते… बरोबर ना!!

तसंच आयुष्यातल्या अडचणींमुळे तुम्हाला तुमच्या जीवनाची, सुखाची किंमत कळते…

आयुष्यात चांगले बदल घडवून तुमची अमीट छाप सोडायला तुम्ही नेहमीच सक्षम असता हे कायम लक्षात ठेवा….

तुम्हाला तुमच्यात बदल घडवण्यासाठी यातलो कोणती स्वयंसूचना महत्त्वाची वाटते?

तुम्ही स्वतःला ती स्वयंसूचना रोज देता का? आम्हाला कमेंट करून जरुर कळवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा.

You may also like...

5 Responses

 1. Gaurav says:

  Khup Sundar mi aaj khup depress hoto but tumcha ya lekh mule mla prerna milalo thank you so much

 2. Pooja Jadhav says:

  Inspiring for me. Thank you 👌👌

 3. J.H. Ghatol says:

  खूप सुंदर. मनाला स्वयंप्रेरणा देवून आळस घालवणारं आणि आत्मविश्वास वाढवणारं लिखाण .

 4. Md Shamshoddin kazi says:

  Good

 5. Swati says:

  👌👌 Thank u so much🙏

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!